संगणक व मशीनवर टायपिंग कीबोर्ड तंत्रज्ञान

माझ्या कीबोर्डमध्ये 'ळ' (ळ) दाखवत नाही, मग काय करावे?

2 उत्तरे
2 answers

माझ्या कीबोर्डमध्ये 'ळ' (ळ) दाखवत नाही, मग काय करावे?

3
कॉम्पुटर वर मराठी टाइपिंग:

कॉम्पुटर वर मराठी टाईप करण्यासाठी गुगल चे फ्रीसॉफ्टवेअर आहे. ते इन्स्टॉल करून तुम्ही कॉम्पुटर/लॅपटॉप वर मराठी टाईप करू शकता.

विंडोज कॉम्पुटरवर मराठी टाईप करण्यासाठी स्टेप्स:


१. गुगल चे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लीक करा:  Google Input Tools

२. लिंक ओपन झाल्यावर मराठी भाषा सिलेक्ट करा आणि डाउनलोड बटनावर क्लिक करा.

३. डाउनलोड झालेले सॉफ्टवेअर इंस्टाल करा, इन्स्टॉलेशन नंतर मराठी भाषेचा ऑप्शन तुमच्या कॉम्पुटर वर आलेला असेल.

४. Windows Key + Space Bar दाबून तुम्ही मराठी भाषा सिलेक्ट करा.

५. आणि मराठी टाईप करायला सुरवात करा. जसे कि "नमस्ते" लिहायचे असेल तर "Namaste" असे टाईप केल्यास ते आपोआप मराठीत "नमस्ते" असे कन्व्हर्ट होईल.


मोबाईल वर मराठी टाइपिंग:

अँड्रॉइड फोन वर मराठी टाइपिंग करण्यासाठी Google Indic Keyboad हे अधिकृत अँप गुगल ने डेव्हलप केलेले आहे.

१. या लिंक वर क्लीक करून ते अँप इन्स्टॉल करा: Google Indic Keyboard

२. इन्स्टॉल केलेले अँप ओपन करा

३. त्यात तुम्हाला हे अँप कीबोर्ड म्हणून सेट करायचा ऑप्शन येईल. तो ऑप्शन सेट करा

४. नंतर जेव्हा तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्ड वरती येईल तेव्हा कीबोर्ड मध्ये "ळ" किंवा दुसऱ्या देवनागरी अक्षराची टॅब दिसेल.

५. यातून मराठी भाषा सिलेक्ट करा 


६. आता तुम्ही "Namaste" टाईप केले कि ते "नमस्ते" असे टाईप झालेले असेल.

ईथुनच तुम्हाला अर्धा र् , ल, अ, इत्यादी टाईप करता येईल

जसे : "दुसऱ्या"

कॉम्प्युटर मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇
https://rajbhasha.net/drupal514/google+input+offline+Microsoft+hindi+installer

मोबाईल फोन वर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.inputmethod.hindi
उत्तर लिहिले · 5/8/2019
कर्म · 28530
0

तुमच्या कीबोर्डमध्ये 'ळ' (ळ) दिसत नसल्यास, तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  1. alt कोड वापरणे:
    • 'ळ' टाइप करण्यासाठी, Num Lock चालू करा.
    • Alt की दाबून ठेवा आणि 0933 टाइप करा.
    • Alt की सोडा. यामुळे 'ळ' टाइप होईल.
  2. मराठी इनपुट पद्धत सक्षम करा:
    • तुमच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये (Windows, macOS, Android) मराठी भाषेसाठी इनपुट पद्धत सक्षम असल्याची खात्री करा.
    • Windows मध्ये, Language Settings मध्ये जाऊन मराठी भाषा जोडा.
    • Android मध्ये, Keyboard Settings मध्ये मराठी भाषेचा कीबोर्ड निवडा.
  3. ऑनलाइन टाइपिंग टूल्स:
    • जर तुम्हाला फक्त काही अक्षरे टाइप करायची असतील, तर ऑनलाइन मराठी टाइपिंग टूल्सचा वापर करा. जसे की Google Input Tools (https://www.google.com/inputtools/ ).
  4. कीबोर्ड लेआउट तपासा:
    • तुम्ही योग्य मराठी कीबोर्ड लेआउट वापरत आहात का ते तपासा. Inscript किंवा Phonetic लेआउट वापरून पहा.
  5. सिस्टम अपडेट करा:
    • कधीकधी, ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केल्याने भाषे संबंधित समस्या सुटू शकतात. त्यामुळे तुमची सिस्टम अपडेटेड असल्याची खात्री करा.

हे उपाय वापरून तुम्ही 'ळ' टाइप करू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2000

Related Questions

कीबोर्ड किसे कहते हैं?
कीबोर्ड वर गुणाकार भागाकार चिन्हे कशी शोधावी?
अजूनपर्यंत कलरमध्ये कीबोर्ड का तयार करीत नाही?
की बोर्ड मध्ये सेव्ह केलेले शब्द कसे डिलीट करायचे?
कॉम्प्युटरसाठी मराठी कीबोर्ड कोणता चांगला आहे?
कीबोर्ड व कीबोर्डचे भाग कोणते?
मी टायपिंगची परीक्षा देतोय, तर कीबोर्ड कुठला वापरू?