भाषा संस्कृती व्याकरण संस्कृत भाषा

संस्कृत मध्ये किती प्रकार पडतात?

2 उत्तरे
2 answers

संस्कृत मध्ये किती प्रकार पडतात?

2
संस्कृत ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले वेदवाङ्‌मय हे सर्वात प्राचीन वाङ्‌मय आहे. असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

संस्कृत भाषेला लेखकांची, कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-

कवी कालिदास : या कवीची मेघदूत खंडकाव्य, रघुवंशम्, कुमारसंभवम् ऋतुसंहार ही काव्ये, तसेच विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.



उत्तर लिहिले · 10/7/2019
कर्म · 5510
0

संस्कृत भाषेचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात:

  1. वैदिक संस्कृत: हा संस्कृत भाषेचा प्राचीन प्रकार आहे. वेदांमध्ये ह्या भाषेचा उपयोग केला गेला आहे.
  2. लौकिक संस्कृत: हा संस्कृत भाषेचा दुसरा प्रकार आहे, जो पाणिनीच्या अष्टाध्यायी नंतर विकसित झाला. याचा उपयोग साहित्य, शास्त्र आणि कला यांमध्ये केला जातो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1440

Related Questions

भाषा आणि बोली यातील साम्यभेद स्पष्ट करा?
प्रमाणभाषा म्हणजे काय ते स्पष्ट करा?
मराठी आणि महाराष्ट्री मध्ये काय अंतर आहे?
संस्कृत- हल संधी, विसर्गसंधी, दुर्जनपद्धती, कर्म पद्धती?
सम्राट अलेक्झांडर कसे लिहावे?
वाक्याचे चार प्रकार लिहा?
वाक्याचे चार प्रकार कोणते?