जीवशास्त्र
प्राणी
प्राणीशास्त्र
प्राणी ओळख
विज्ञान
चित्ता आणि बिबट्या एकच प्राणी आहे का, वेगवेगळे प्राणी आहेत?
3 उत्तरे
3
answers
चित्ता आणि बिबट्या एकच प्राणी आहे का, वेगवेगळे प्राणी आहेत?
8
Answer link
बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरूपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्वार पेक्षा आकारमानाने लहान असतो. जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी, त्याच्या छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, तसे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात.
याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे, तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
चित्याचे ठिपके हे मुखत्वे भरीव असतात व बिबट्याचे ठिपके हे पोकळ असतात.
चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची बहुधा मांजराप्रमाणेच भरीव असते.
बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात. चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो.
चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून हिंदीत चिता व मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.

6
Answer link
चित्ता आणि बिबट्या हे मार्जार कुळातील प्राणिजाती आहेत.
साधारणतः एकच वाटणाऱ्या या दोन प्रजाती सखोल अध्ययन केल्यास भिन्न आहेत हे समजते.

चित्र: चित्ता
चित्र: बिबट्या/बिबळ्या
साधारणतः एकच वाटणाऱ्या या दोन प्रजाती सखोल अध्ययन केल्यास भिन्न आहेत हे समजते.
- चित्त्याच्या त्वचेवर भरीव गोलाकार ठिपके असतात तर बिबट्याच्या त्वचेवर पोकळ काहीसे गोलाकार ठिपके असतात.

- चित्ता हा दिनचर प्राणी असून बिबट्या हा निशाचर प्राणी आहे.
- चित्ता हा चपळ, लवचिक आणि सडपातळ शरीरयष्टीचा प्राणी असू याउलट बिबट्या हा शक्तिशाली, भरीव आणि जाड शरीरयष्टीचा असतो.

- वयस्क नर चित्ता साधारणपणे ५५ - ५६ किलो वजनाचा असतो. तर वयस्क नर बिबट्या ६० - ७० किलो वजनाचा असतो.
- चित्ता हा चपळता आणि गतीसाठी प्रसिद्ध आहे तर बिबट्या हा ताकदीसाठी प्रसिद्ध आहे.
- चित्ता त्याची शिकार जागच्या जागी भक्षण करतो तर बिबट्या शिकार केल्यावर ती झाडावर नेऊन मग भक्षण करतो.
- बिबट्याचे पंजे इतर मार्जार कुलीन प्राण्यांप्रमाणे दुमडले जातात तर चित्त्याचे पंजे दुमडले जात नाहीत.
0
Answer link
नाही, चित्ता आणि बिबट्या हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत. ते दोन्ही फेलिडे (Felidae) कुटुंबातील असले तरी त्यांच्यात अनेक फरक आहेत.
चित्ता (Cheetah):
- चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे. तो ताशी 110-120 किलोमीटर वेगाने धावू शकतो.
- त्याच्या अंगावर काळे ठिपके असतात, जे पूर्णपणे गोल (solid spots) असतात.
- चित्त्याचे डोळे आणि नाकाच्या बाजूला काळ्या रंगाच्या अश्रूंसारख्या रेषा (tear marks) असतात.
- त्याचे शरीर अधिक पातळ आणि aerodynamic असते, ज्यामुळे त्याला धावताना गती मिळते.
बिबट्या (Leopard):
- बिबट्या चित्त्यापेक्षा कमी वेगाने धावतो, पण तो झाडावर चढण्यात आणि शिकार करण्यात अधिक तरबेज असतो.
- बिबट्याच्या अंगावर असलेले ठिपके (rosettes) हे मधोमध उघडे आणि irregular आकाराचे असतात.
- बिबट्या अधिक শক্তিশালী असतो आणि तो मोठ्या शिकारलाही सहजपणे मारू शकतो.
अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: