3 उत्तरे
3 answers

इंजिन मध्ये स्ट्रोक म्हणजे काय?

11


​सामान्यपणे आपण वापरत असलेल्या इंजिनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल ही दोन इंधने वापरली जातात.

रासायनिक ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर करणे. ही प्रक्रिया इंधनाला उच्च दाबाच्या स्थितीत आणून, त्याचे तापमान वाढवून अथवा बाहेरून त्यात स्फुल्लिंग/ ठिणगी टाकून इंधनाचे ज्वलन केले जाते आणि त्यामुळे उष्णता तयार होते, तसेच उच्च दाबातील वायू तयार होतो.

ही प्रक्रिया सामान्यपणे चार टप्प्यांत घडते.

* हवा इंजिनात खेचली जाते.

* हवा आणि इंधन यांच्या अतिसूक्ष्म आकाराच्या रेणूंचे मिश्रण तयार होते.

* हे मिश्रण पेट्रोल इंधन असताना विद्युत स्फुल्लिंगाच्या (spark) साहाय्याने, तर डिझेल इंधन असताना या मिश्रणाच्या उच्च दाबामुळे तयार झालेल्या तापमानामुळे पेट घेते.

* या ज्वलनामुळे उष्णता तयार होते.


२. उष्णता ऊर्जेचे यांत्रिकी ऊर्जेत रूपांतर करणे- या क्रियेसाठी बाह्य ज्वलन इंजिनामध्ये तयार झालेली उष्णता पाण्याला देऊन त्याची वाफ करून, त्या वाफेच्या दाबामुळे यांत्रिकी हालचाल केली जाते. अंतर्गत ज्वलन इंजिनमध्ये इंधनाचे ज्वलन होऊन तयार झालेल्या उच्च दाबातील वायूमुळे यांत्रिकी हालचाल घडते.

यांत्रिकी हालचाल कशामुळे घडते-.

दट्टय़ा (piston) वायूच्या दाबातील फरकामुळे मागे-पुढे हलू लागतो. त्याच्या या हालचालीमुळे त्याला जोडलेल्या दांडय़ाची (crank) दुसरी बाजू क्रँकशाफ्टला वर्तुळाकार फिरवू लागते.



सामान्यपणे आपण वापरत असलेल्या इंजिनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल ही दोन इंधने वापरली जातात. पेट्रोलसाठी दोन धावी (Two stroke )आणि चार धावी (Four Stroke )अशी दोन प्रकारची इंजिने उपलब्ध आहेत. तर डिझेल इंधनासाठी फक्त चार धावी इंजिनेच वापरली जातात. इंजिनाचे कार्य समजून घेण्यासाठी आपण चार धावी इंजिन कसे चालते ते पाहू.

१. आत घेणारी धाव (Intake)- या धावेमध्ये दट्टय़ा खालच्या दिशेने प्रवास करतो. त्यामुळे तयार झालेल्या इिंजनाच्या दंडगोलाकृती पोकळीमध्ये हवा आणि इंधनाचे मिश्रण (जे कार्बुरेटरमध्ये तयार होते.) आत घेतले जाते.

२. दबाव धाव (Compression)- दट्टय़ा वरच्या दिशेने प्रवास चालू करताना मिश्रण आत आणणारी झडप बंद होते आणि दंडगोलाकृती पोकळीमधील आकारमान कमी होत असल्याने मिश्रणावरील दाब वाढत जातो.

३. शक्ती धाव (Power)- दट्टय़ा दंडगोलाच्या उच्चतम बिंदूपर्यंत पोचताक्षणी spark plug स्फुल्लिंग सोडतो आणि दाबातील मिश्रणाचा स्फोट होतो. उष्णता तयार होते आणि आतील वायूचे प्रसरण (Expansion) व्हायला लागते आणि दट्टय़ा खाली येऊ लागतो.

४. उच्छ्वास धाव (Exhaust)- दट्टय़ा परत वर जायला लागतो, उच्छ्वास झडप उघडली जाते आणि अतिरिक्त वायू बाहेर पडतो. आणि हे आवर्तन चालू राहते.

डिझेल इंजिन: यामध्ये होणारे चार धाव पेट्रोल इंजिनाप्रमाणेच असतात. यामध्ये पहिल्या धावेमध्ये फक्त हवा आत घेतली जाते, तिच्यावरील दाब वाढवला जातो आणि दाबाखालील हवेचे तापमान वाढलेले असताना त्यात डिझेल मिसळले जाते. डिझेलचा स्वयंविस्फोटक (Self Explosion) बिंदू २१००ू (पेट्रोलचा हाच बिंदू २४६०ू असतो.) असल्याने त्याला बाहेरच्या स्फुल्लिंगाची गरज भासत नाही. स्फोट होऊन वायू प्रसरण पावतो आणि उत्सर्जित होतो आणि आवर्तन चालू राहते.

दोन धावी इंजिनमध्ये हीच प्रक्रिया दोन धावांत होते. पेट्रोलचे दोन धावी इंजिन आणि चार धावी इंजिन यांची तुलना सोबतच्या तक्त्यात केली आहे.

ही झाली आपण वापरत असलेल्या इंजिनांची प्राथमिक माहिती. सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे स्वयंचलित वाहन उद्योगाचे हृदय असलेले हे यंत्र अधिकाधिक कार्यक्षम बनविण्यासाठी त्यावर सातत्याने प्रयोग करून सुधारणा होतच आहेत. आपल्याला माहीत असलेली अगदी ढोबळ सुधारणा म्हणजे स्वयंचलित होण्याआधी इंजिन चालू करताना त्याला बाहेरून बल देऊन क्रँकशाफ्ट फिरवावा लागतो. दुचाकीला किक् मारणे (आणि काही दुचाक्या तिरक्या करून!), जुन्या चारचाकी गाडय़ांना असलेला दांडा फिरवणे, किंवा बोटीला असलेल्या इंजिनाची दोरी ओढणे या जुन्या पद्धती होत्या. आता हे काम बॅटरीवर चालणाऱ्या स्टार्टरने होते. आता नुसते बटन दाबून इंजिन चालू होते. मनुष्य आपल्या आरामासाठी सतत नवीन शोध लावतोच आहे.
उत्तर लिहिले · 27/6/2019
कर्म · 740
1
       इंजिनचे स्ट्रोक म्हणजे इंजिनची कार्यक्षमता, तुमच्या गाडीचे वेग नियंत्रित करणारे ब्लॉक व पिस्टन यांच्यात निर्माण होणारे कंपन. थोडक्यात सांगायचे तर इंजिन मधील स्ट्रोक इंजिन सुस्थितीत असल्याचे निदर्शक आहे. इंजिनचे स्ट्रोक जर व्यवस्थित असेल तर तुमची गाडी सुस्थितीत आहे समजावी, पण स्ट्रोक व्यवस्थित नसेल तर तिला डॉक्टरची गरज आहे असे समजावे.
उत्तर लिहिले · 29/6/2019
कर्म · 12245
0

इंजिनमध्ये स्ट्रोक म्हणजे काय?

इंजिनमध्ये, स्ट्रोक म्हणजे पिस्टन (piston) सिलेंडरच्या आतमध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरळ रेषेत केलेले अंतर. हे अंतर crankshaft च्या फिरण्यामुळे तयार होते.

मुख्य स्ट्रोक खालीलप्रमाणे आहेत:

  1. इनटेक स्ट्रोक (Intake Stroke): पिस्टन सिलेंडरमध्ये खाली सरळ रेषेत येतो आणि हवा आणि इंधनाचे मिश्रण आत ओढले जाते.
  2. कॉम्प्रेशन स्ट्रोक (Compression Stroke): पिस्टन सिलेंडरमध्ये वर सरळ रेषेत जातो आणि हवा आणि इंधनाचे मिश्रण दाबले जाते.
  3. पॉवर स्ट्रोक (Power Stroke): दाबलेल्या मिश्रणला स्पार्क प्लगने (spark plug) पेटवले जाते, ज्यामुळे पिस्टन खाली सरळ रेषेत जोरात ढकलला जातो आणि पॉवर तयार होते.
  4. एग्झॉस्ट स्ट्रोक (Exhaust Stroke): पिस्टन सिलेंडरमध्ये वर सरळ रेषेत जातो आणि जळलेले वायू बाहेर टाकले जातात.

हे चार स्ट्रोक वारंवार फिरतात आणि इंजिन चालू राहते.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2480

Related Questions

कमीत कमी किमतीचा चांगला लॅपटॉप कोणता?
सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी कोणता लॅपटॉप वापरावा व कमीत कमी किमतीचा?
तुम्हाला काय माहिती आहे?
सांगली महानगरपालिकेचे संकेतस्थळ काय आहे?
DC चे पूर्ण रूप काय आहे?
एसी (AC) चे पूर्ण रूप काय आहे?
एसी चे फुल फॉर्म काय आहे?