व्यवसाय मार्गदर्शन सामान्य ज्ञान कुतूहल उद्योग स्टार्टअप

अशा कंपन्या कोणत्या आहेत ज्यांची सुरुवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती?

2 उत्तरे
2 answers

अशा कंपन्या कोणत्या आहेत ज्यांची सुरुवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती?

9
*_👉ह्या कंपन्यांची सुरवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती_*


_आपण नेहेमी तक्रार असतो की, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, फक्त ती संधी मिळत नाहीये. पण तुम्हाला माहित आहे का, आज जगात ज्या अनेक बड्या कंपन्या आहेत, त्यांची सुरवात ही अगदी छोट्या ठिकाणांपासून झाली आहे. हे अरबोंचे व्यवसाय हे एका छोट्याश्या गॅरेजपासून सुरु झाले आहेत. म्हणजे ह्या मोठ-मोठ्या कंपन्या आहेत ना, त्यांचं पहिलं कार्यालय म्हणजे छोटी अडगळीची खोली होती._

*_◼गुगल :_*
गुगल शिवाय तर आज आपले जीवनच अपूर्ण आहे. आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गुगलकडे असतं. जवळजवळ जगभरातील सर्वच लोक ह्या गुगलचा वापर करतात. आज गुगलचे कार्यालय हे जगातील सर्वात मोठ्या आणि पसरलेल्या कार्यालयांपैकी एक आहे. तर ह्या गुगलची सुरवात देखील एका छोट्याश्या ठिकाणावरुनच झाली आहे. गॅरेज पासून ह्याची सुरवात केली.एवढचं नाही तर गुगलची निर्मिती केल्यानंतर त्यांना वाटले की याचा वाईट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे म्हणून त्यांनी गुगलला विकण्याचा देखील प्रयत्न केला.

*_◼अॅमेझॉन :_*
ही कंपनी आज जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी ऑनलाईन रिटेलर कंपनी आहे. १९९४ साली जेव्हा ह्या कंपनीचा सुरवात झाली तेव्हा ह्या कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस ह्यांच्याकडे कुठलं मोठं ऑफिस नव्हतं. त्यांनी त्यांच्या स्टोर रूममध्ये मध्येच एक ऑनलाईन बुक स्टोर उघडले आणि ह्या कंपनीने १९९५ साली आपली पहिली पुस्तक विकली. १९९७ साली जेफ ह्यांनी आपलं हे छोटसं बुक स्टोर लोकांकरिता खुले केले आणि ह्या Amazon.comवर आपल्याला गरजेची प्रत्येक वस्तू उपलब्ध आहे. आज जेफ हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात.

*_◼अॅप्पल :_*
जगभरातील इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस प्रेमींसाठी अॅप्पल ही सर्वात आवडती कंपनी आहे. ती एक स्टेटस सिम्बॉल आहे. आज अॅप्पलची मार्केट वॅल्ह्यू ही १ ट्रिलियन डॉलर एवढी आहे. आज अॅप्पल ही क अतिशय यशस्वी कंपनी आहे, पण ह्या कंपनीची सुरवात देखील एका गॅरेज पासूनच झाली होती. १९७६ साली स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोजनिएक ह्या दोघांनी मिळून अॅप्पल कंपनीची स्थापना केली होती. ह्यांनी त्यांच्या ह्या कंपनीची सुरवात कॅलिफोर्निया येथील एका गॅरेजमधून केली होती. तेथेच त्यांनी पहिला अॅप्पल कम्प्युटर तयार केला होता.

*_◼डिजनी :_*
लहान तसेच मोठ्यांना देखिल वेड लावेल असे प्रसिद्ध थीम पार्क डिजनी हा सुरवातीला एवढा सुंदर नव्हताच. वॉल्ट डिजनी आणि त्यांच्या भावाने त्यांच्या काकाच्या गॅरेज मध्ये पहिले डिजनी स्टुडीओ सुरु केले. येथेच एलिस कॉमेडीजची शुटींग करण्यात आली होती.एका गॅरेजपासून सुरु झालेला हा प्रवास आज इथवर येऊन पोहोचला आहे की, आज डिजनी जगातील सर्वात जास्त कमाई करणारी मनोरंजन कंपनी बनली आहे.

*_हार्ले डेव्हीडसन :_*
बाईक प्रेमींसाठी हार्ले डेव्हीडसन चालवणे हे त्याचं स्वप्न असतं. १९०१ साली २१ वर्षांच्या विलियम हार्ले ह्याने त्याच्या सायकलची क्षमता वाढविण्यासाठी त्यात एक छोटासा इंजन बसविण्याचे ठरवले. त्याच्या दोन वर्षानंतर त्यांनी त्यांच्या बालपणीचा मित्र अर्थर डेव्हिडसन ह्याच्या सोबत गॅरेजमध्ये पहिल्यांदा एक मोटारसायकल बनवली. तर हार्ले डेव्हिडसन कंपनीची आधिकारिक स्थापना १९०३ साली झाली. आणि आज ही जगातील सर्वात प्रसिद्ध मोटारसायकल कंपन्यांपैकी एक आहे.

*_◼मायक्रोसॉफ्ट_*
बिल गेट्स आणि पॉल एलेन यांनी १९७५ साली अगदी थोड्याश्या संसाधनांच्या मदतीने एका गॅरेजमध्ये ह्या कंपनीची सुरवात केली होती. मायक्रोसॉफ्ट अॅप्पल प्रमाणेच हार्डवेअर हे नाही बनवत तर त्याच्या कल हा केवळ सॉफ्टवेयर मार्केटकडे होता. आईबीएम सोबत काम करताना कंपनीने आपल्या पहिल्या ऑपरेटिंग सिस्टीमचा लायसेन्स घेण्यासाठी केवळ ८० हजार डॉलर द्यावे लागले होते.

*_📍आज ह्या सर्व कंपन्या यशाच्या शिखरावर येऊन पोहोचल्या आहेत.  आपण हे विसरायला नको की यांची सुरवात ही मात्र एका छोट्याश्या गॅरेज पासून झाली होती. त्यामुळे सुरवात ही मुळात महत्वाची, त्यानंतर आपल्या मेहनतीवर यश हे अवलंबून असते._*
उत्तर लिहिले · 11/6/2019
कर्म · 569245
0

अशा अनेक प्रसिद्ध कंपन्या आहेत ज्यांची सुरुवात एका छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती. त्यापैकी काही प्रमुख कंपन्या खालीलप्रमाणे:

  • ऍपल (Apple):

    ऍपल कंपनीची सुरुवात स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) आणि स्टीव्ह वोझ्नियाक (Steve Wozniak) यांनी त्यांच्या मित्राच्या घराच्या गॅरेजमध्ये केली. त्यांनी तिथेच ऍपलचे पहिले कॉम्प्युटर बनवले.

    संदर्भ: ऍपल लीडरशिप

  • ऍमेझॉन (Amazon):

    ऍमेझॉनची सुरुवात जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या गॅरेजमध्ये केली. सुरुवातीला ऍमेझॉन फक्त पुस्तके ऑनलाइन विकायची.

    संदर्भ: ऍमेझॉन इतिहास

  • डिस्ने (Disney):

    वॉल्ट डिस्ने (Walt Disney) यांनी त्यांच्या भावाबरोबर मिळून डिस्ने कंपनीची सुरुवात एका छोट्याशा ऑफिसमध्ये केली.

    संदर्भ: डिस्ने कंपनी

  • गूगल (Google):

    गूगलची सुरुवात लॅरी पेज (Larry Page) आणि सर्गे ब्रिन (Sergey Brin) यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील (Stanford University) एका विद्यार्थ्याच्या वसतिगृहातील (Dorm room) खोलीत केली.

    संदर्भ: गुगल कंपनी

या कंपन्यांनी लहान जागेत सुरुवात करून आज जागतिक स्तरावर मोठे यश मिळवले आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2220

Related Questions

नवउद्यमी वर योग्य विधान?
नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी किती खर्च येतो?
स्टार्टअप व्यवसाय आणि छोटे व्यवसाय यात काय फरक आहे?
स्टार्टअप म्हणजे काय?
मी कोणता धंदा करू, माझ्याकडे भांडवल नाही?
मला वर्कशॉप सुरू करायचा आहे, साधारणतः किती खर्च येईल?
स्टार्टअप व्यवसायाबद्दल माहिती द्याल का?