भूगोल जिल्हा जिल्हा माहिती

अकोला जिल्ह्याविषयी माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

अकोला जिल्ह्याविषयी माहिती मिळेल का?

2
💁‍♂  *जिल्हा विशेष - अकोला जिल्हा विषयी महत्वाची माहिती*

📍  *जिल्ह्याचे मुख्य ठिकाण*   – अकोला
📍  *क्षेत्रफळ*   – 5,429 चौ.कि.मी.

📍  *लोकसंख्या*   – 18,18,617 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

📍  *तालुके*  – 7 – अकोट, बाळापूर, तेल्हारा, अकोला, मूर्तीजापूर, पातुर, बार्शी टाकळी.

📍  *सीमा* – उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा असून पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

🙋‍♂  *अकोला जिल्हयाची वैशिष्ट्ये*

◼  मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम असलेली पूर्णा नदी ही अकोल्या जिल्ह्याची प्रमुख नदी होय.

◼  अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली.

◼  अकोला जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते – धुळे-कोलकत्ता (6)

◼  अकोला जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्थेच्या जास्त शाळा आहेत.

◼  अकोला हे शहर अकोलसिंग नावांच्या रजपूत सरदाराने वसविले असल्याचे सांगितले जाते. या शहराचा ‘आईन-ए-अकबरी’ यामध्ये नरनाळ्याच्या सुभ्याचा

◼  अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख आढळतो. कापसाचे आगार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो.

◼  22 किमी. क्षेत्रावर पसरलेला, 67 बुरूज व 27 दरवाजे असलेला किल्ला इतिहास प्रसिद्ध असू गाविलगडच्या पर्वतरांगेत वसला आहे.

⛳ *अकोला जिल्ह्यातील प्रमुख स्थळे*

✒   *अकोला*  – मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.

✒   *बाळापूर*  – बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.

✒   *नरनाळा*  – येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.

✒   *मूर्तीजापूर*  – येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.

✒   *पातुर*  – हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.

✒   *पारस*  – औष्णिक वीज निर्मिती केंद्र.

✒   *अकोट*  – सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.

✒   *आडगाव* – ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.
उत्तर लिहिले · 5/6/2019
कर्म · 569225
0
नक्कीच! तुम्हाला अकोला जिल्ह्याविषयी विस्तृत माहिती देतो:

अकोला जिल्हा: एक संक्षिप्त माहिती

अकोला जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात आहे. ह्या जिल्ह्यामध्ये अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे आहेत.

भौगोलिक माहिती

  • स्थान: महाराष्ट्र, भारत
  • विस्तार: 5,431 वर्ग किलोमीटर
  • समुद्रसपाटीपासून उंची: सरासरी 305 मीटर
  • हवामान: उष्ण आणि कोरडे

लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या (२०११ नुसार): 18,13,906
  • पुरुष: 9,36,349
  • महिला: 8,77,557

प्रशासन

  • उपविभाग: अकोला, अकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर, वाशीम
  • तालुके: अकोला, अकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी

अर्थव्यवस्था

अकोला जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. येथे कापूस, ज्वारी, तेलबिया आणि डाळींचे उत्पादन घेतले जाते.

प्रमुख शहरे

  • अकोला
  • अकोट
  • मुर्तिजापूर
  • तेल्हारा

शैक्षणिक संस्था

अकोला जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालये आणि तंत्रनिकेतन आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आहे, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याचे महत्त्व वाढले आहे.

पर्यटन

अकोला जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत:

  • राज राजेश्वर मंदिर: अकोला शहरात असलेले हे प्राचीन शिव मंदिर आहे.
  • नरनाळा किल्ला: ऐतिहासिक किल्ला जोData Source: Maharashtra Times (म टा) अकोला जिल्ह्याच्या इतिहासाची साक्ष देतो.
  • अकोला किल्ला: शहराच्या मध्यभागी असलेला हा किल्ला एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.

संदर्भ

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याची स्थापना कधी झाली?
भंडारा जिल्ह्याची माहिती स्पष्ट करा?
नांदेड जिल्ह्यातील क्षेत्रफळ किती आहे?
उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना कधी झाली?
धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती द्या, म्हणजेच भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक माहिती मराठीत देण्याचा प्रयत्न करा.
भंडारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती मिळेल का?
सोलापूर जिल्ह्या विषयी माहिती मिळेल का?