जिल्हा जिल्हा माहिती इतिहास

उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना कधी झाली?

2 उत्तरे
2 answers

उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना कधी झाली?

1
उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. हैदराबादच्या ७ व्या निजाम मीर उस्मान अली खान च्या सन्मानार्थ उस्मानाबादचे नाव देण्यात आले. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 230
0

उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना इ.स. 1907 मध्ये झाली.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2020

Related Questions

भारतात कृषी क्रांती सुरू झाली, तेव्हा कोण कृषी मंत्री होते?
उकेडे आडनावाचे लोक काही वर्षांपूर्वी कोकणात स्थायिक झाले होते का आणि नंतर ते जाधव आडनाव लावू लागले?
जाधव कुळातील उपकुळे कोणती, त्यांची नावे सांगा?
उकडे आडनावांचा इतिहास?
उकेडे हे मराठा आडनावातील कोणत्या कुळात येतात?
उकेडे आडनावाचा इतिहास?
रत्नागिरी जिल्ह्यातील आड मराठा कोण आहेत?