Topic icon

जिल्हा माहिती

0
१८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
उत्तर लिहिले · 24/7/2023
कर्म · 9415
0

भंडारा जिल्हा: माहिती

भंडारा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो. भंडारा जिल्हा पूर्वी ' Brandara ' म्हणून ओळखला जात होता. भंडारा जिल्ह्याला ' तलावांचा जिल्हा ' म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक माहिती:

  1. भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.
  2. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या पूर्वेकडील सीमेवरून वाहते.
  3. जिल्ह्याचे हवामान उष्ण आणि दमट असते.

प्रशासन:

  1. जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत: भंडारा, साकोली, तुमसर, पवनी, लाखांदूर, लाखणी आणि मोहाडी.
  2. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासक असतात.
  3. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था काम करतात.

अर्थव्यवस्था:

  1. भंडारा जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे.
  2. भात हे येथील प्रमुख पीक आहे.
  3. जिल्ह्यात तांदळाच्या अनेकprocess process आहेत.
  4. एमएसएमई (MSME) क्षेत्रात जिल्ह्यात अनेक लहान उद्योग आहेत.

पर्यटन:

  1. अंबगड किल्ला: हा किल्ला भंडारा शहराच्या जवळ आहे.
  2. Goregaon Lake: हे एक सुंदर तलाव आहे, जे पर्यटकांना आकर्षित करते.
  3. गायमुख: हे पवनी तालुक्यातील एक धार्मिक स्थळ आहे.

शिक्षण:

  1. जिल्ह्यात अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालये आहेत.
  2. महाविद्यालये विविध विषयांमध्ये उच्च शिक्षण देतात.

संस्कृती:

  1. भंडारा जिल्ह्यात मराठी आणि गोंडी संस्कृतीचा प्रभाव आहे.
  2. येथील लोक विविध सण आणि उत्सव साजरे करतात.

** अधिक माहितीसाठी:

  1. भंडारा जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ: bhandara.nic.in
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
2
💁‍♂  *जिल्हा विशेष - अकोला जिल्हा विषयी महत्वाची माहिती*

📍  *जिल्ह्याचे मुख्य ठिकाण*   – अकोला
📍  *क्षेत्रफळ*   – 5,429 चौ.कि.मी.

📍  *लोकसंख्या*   – 18,18,617 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

📍  *तालुके*  – 7 – अकोट, बाळापूर, तेल्हारा, अकोला, मूर्तीजापूर, पातुर, बार्शी टाकळी.

📍  *सीमा* – उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा असून पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

🙋‍♂  *अकोला जिल्हयाची वैशिष्ट्ये*

◼  मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम असलेली पूर्णा नदी ही अकोल्या जिल्ह्याची प्रमुख नदी होय.

◼  अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली.

◼  अकोला जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते – धुळे-कोलकत्ता (6)

◼  अकोला जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्थेच्या जास्त शाळा आहेत.

◼  अकोला हे शहर अकोलसिंग नावांच्या रजपूत सरदाराने वसविले असल्याचे सांगितले जाते. या शहराचा ‘आईन-ए-अकबरी’ यामध्ये नरनाळ्याच्या सुभ्याचा

◼  अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख आढळतो. कापसाचे आगार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो.

◼  22 किमी. क्षेत्रावर पसरलेला, 67 बुरूज व 27 दरवाजे असलेला किल्ला इतिहास प्रसिद्ध असू गाविलगडच्या पर्वतरांगेत वसला आहे.

⛳ *अकोला जिल्ह्यातील प्रमुख स्थळे*

✒   *अकोला*  – मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.

✒   *बाळापूर*  – बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.

✒   *नरनाळा*  – येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.

✒   *मूर्तीजापूर*  – येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.

✒   *पातुर*  – हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.

✒   *पारस*  – औष्णिक वीज निर्मिती केंद्र.

✒   *अकोट*  – सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.

✒   *आडगाव* – ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.
उत्तर लिहिले · 5/6/2019
कर्म · 569225
0

नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,528 चौरस किलोमीटर आहे.

( हे क्षेत्रफळ कमी-जास्त হতে शकते. )

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980
1
उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. हैदराबादच्या ७ व्या निजाम मीर उस्मान अली खान च्या सन्मानार्थ उस्मानाबादचे नाव देण्यात आले. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 230
14
धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला, शिरपुरचे बालाजीचे मंदीर, नकाणे तलाव, राजवाडे संशोधन मंडळ हि धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत.

धुळे जिल्हा कापूस, मिरची, ज्वारी, ऊस ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे.तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे परंतु ती केवळ पावसाळ्यातच खळाळत वाहते.

 
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ: ८०६१ चौ. किमी.इतके असून लगतचे प्रदेश पुढील प्रमाणे जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा व मध्यप्रदेश राज्य

●जिल्ह्याची लोकसंख्या २०,४८,७८१ इतकी असून त्यात पुरुष: १०,५५,६६९ महिला: ९,९२,११२ असे प्रमाण आहे जिल्ह्याची साक्षरता ७४.६१% आहे. धुळे जिल्ह्यात मराठीव अहिराणी बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिद्ध आहेत जिल्ह्याचे सरासरी तापमान कमाल: ४५ डिग्री. सेल्सिअस तर किमान: १६ डिग्री. सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ५९२ मिमी. इतका पडतो.

■शेती■

पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. शासनाच्या ११ मध्यमवर्गीय जलसिंचन प्रकल्पामुळे ५१,५९७ हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. प्रमुख पिके- ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, मूग, उडीद, कापूस, मिरची, गहू, ऊस

●जिल्ह्यात २ मोठे उद्योग आहेत तर ९ मध्यम उद्योग व १३२ लघुद्योग संस्था आहेत. दळणवळणाची साधने-रेल्वे स्थानकांची संख्या: १२ (मध्य रेल्वे.-५, पश्चिम रेल्वे-७),रस्ते: राष्ट्रीय महामार्ग:

■पर्यटनाची स्थळे■

लळिंग किल्ला, लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी मंदिर, धरणे, बिजासन देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ, नगांवचे दत्त मंदिर,तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण.

धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात येत असून धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटण्यास मदत होईल. तसेच अनेक उद्योग धंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होण्याची शक्यता त्यामुळे वाढण्यास मदत होईल. काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होईल. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.


उत्तर लिहिले · 8/7/2018
कर्म · 123540
9
भंडारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. भंडार्‍याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदुळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. याला तलावाचा जिल्हा म्हटले जाते. भंडार्‍यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत.



हा जिल्हा वनसंपत्तीत व खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. भंडारा शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

◆भौगोलिक

जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २४४ मीटर (८०० फूट) आहे.

भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा(मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूरतर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे.  या जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात असून येथील प्रमुख पिके पुढीलप्रमाणे- तांदूळ, गहू, मिलेट (एक तृणधान्य). तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, काळी कमोद या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत. भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही.

या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत.

◆अर्थव्यवस्था

भंडार्‍यातील अर्थव्यवस्था मिश्र असून ती शेती आणि जंगले यांपासून मिळणार्‍या उत्पन्नावर आधारित आहे.

★सामाजिक

नोर्गालिंग तिबेटन हा तिबेटी समाज महाराष्ट्रमध्ये १९७२ पासून भंडारा जिल्ह्यात राहतो आहे. जवळपास १००० तिबेटी लोक जिल्ह्यातील नोर्गेलिंग येथे राहतात.

■प्रेक्षणीय स्थळे

जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे - अंबागड किल्ला, कोरांबी देवीचे मंदिर, इंदिरा सागर प्रकल्प

■जिल्ह्यातील तालुके

भंडारा तालुका,

साकोली,

तुमसर,

पवनी,

मोहाडी,

लाखनी व

लाखांदूर

उत्तर लिहिले · 8/6/2018
कर्म · 123540