भूगोल जिल्हा जिल्हा माहिती

भंडारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

भंडारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती मिळेल का?

9
भंडारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. भंडार्‍याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदुळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. याला तलावाचा जिल्हा म्हटले जाते. भंडार्‍यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत.



हा जिल्हा वनसंपत्तीत व खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. भंडारा शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

◆भौगोलिक

जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २४४ मीटर (८०० फूट) आहे.

भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा(मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूरतर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे.  या जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात असून येथील प्रमुख पिके पुढीलप्रमाणे- तांदूळ, गहू, मिलेट (एक तृणधान्य). तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, काळी कमोद या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत. भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही.

या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत.

◆अर्थव्यवस्था

भंडार्‍यातील अर्थव्यवस्था मिश्र असून ती शेती आणि जंगले यांपासून मिळणार्‍या उत्पन्नावर आधारित आहे.

★सामाजिक

नोर्गालिंग तिबेटन हा तिबेटी समाज महाराष्ट्रमध्ये १९७२ पासून भंडारा जिल्ह्यात राहतो आहे. जवळपास १००० तिबेटी लोक जिल्ह्यातील नोर्गेलिंग येथे राहतात.

■प्रेक्षणीय स्थळे

जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे - अंबागड किल्ला, कोरांबी देवीचे मंदिर, इंदिरा सागर प्रकल्प

■जिल्ह्यातील तालुके

भंडारा तालुका,

साकोली,

तुमसर,

पवनी,

मोहाडी,

लाखनी व

लाखांदूर

उत्तर लिहिले · 8/6/2018
कर्म · 123540
0
sicher! भंडारा जिल्ह्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

भंडारा जिल्हा: संपूर्ण माहिती

भंडारा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो.

भौगोलिक माहिती

  • स्थान: भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.
  • क्षेत्रफळ: 3,890 चौरस किलोमीटर
  • हवामान: उष्ण आणि दमट
  • नद्या: वैनगंगा, बावनथडी, चुलबंद

लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या (2011): 12,00,000
  • लोकसंख्या घनता: 310 प्रति चौरस किलोमीटर

प्रशासन

  • उपविभाग: भंडारा, तुमसर, साकोली
  • तालुके: 7 (भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, लाखांदूर, लाखनी, मोहाडी)

अर्थव्यवस्था

  • शेती: भात हे मुख्य पीक आहे.
  • उद्योग: तांदूळProcesssing mill, विडी उद्योग, Paper Mill

पर्यटन

  • अंबhard: येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
  • Goregaon Lake: हे एक सुंदर तलाव आहे, जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
  • Nagzira Wildlife Sanctuary: विविध वन्यजीव आणि वनस्पती येथे आढळतात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

शिक्षण

  • महाविद्यालये: भंडारा जिल्ह्यात अनेक महाविद्यालये आहेत, ज्यात कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांचे शिक्षण उपलब्ध आहे.

टीप: ही माहिती संकलित असून यात बदल होऊ शकतात.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याची स्थापना कधी झाली?
भंडारा जिल्ह्याची माहिती स्पष्ट करा?
अकोला जिल्ह्याविषयी माहिती मिळेल का?
नांदेड जिल्ह्यातील क्षेत्रफळ किती आहे?
उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना कधी झाली?
धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती द्या, म्हणजेच भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक माहिती मराठीत देण्याचा प्रयत्न करा.
सोलापूर जिल्ह्या विषयी माहिती मिळेल का?