4 उत्तरे
4 answers

अभिप्राय म्हणजे काय?

9
अभिप्राय म्हणजे - आपण कोणत्याही व्यक्ती, वस्तू, घटक किंवा काहीही असो (गाणं, घटना इत्यादी ) यावर नोंदवलेले मत. असा हा अभिप्राय व्यक्त केला जातो. जसे कि ही 1 प्रकारची कमेंट असते.
उदा. मी एखादा पदार्थ केला त्यावर इतरांनी - पदार्थ छान आहे, ठीक आहे, उत्तम आहे, असे नोंदवलेले मत म्हणजे अभिप्राय. 🙂🙏
उत्तर लिहिले · 5/6/2019
कर्म · 11485
4
एखाद्या गोष्टीवर, वस्तूवर, क्रियेवर, विचारांवर मांडलेले मत, किंवा केलेली टिप्पणी अथवा दिलेली सूचना याला अभिप्राय देणे म्हणतात.

अभिप्राय सकारात्मक अथवा नकारात्मकही असू शकतो.

सकारात्मक अभिप्राय म्हणजे प्रशंसा, सूचना, समीक्षा असे म्हणू शकतो.
तर
नकारात्मक अभिप्राय म्हणजे टीका, विरोध दर्शवण्यासाठी केलेले अयोग्य शब्दप्रयोग असे म्हणू शकतो.
उत्तर लिहिले · 6/6/2019
कर्म · 11720
0

अभिप्राय म्हणजे एखाद्या घटनेबद्दल, कामाबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा अन्य कोणत्याही गोष्टीबद्दल व्यक्त केलेले मत किंवा प्रतिक्रिया.

अभिप्राय दोन प्रकारचे असू शकतात:

  • सकारात्मक अभिप्राय: यातून सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
  • नकारात्मक अभिप्राय: यातून त्रुटी निदर्शनास आणून सुधारणा करण्याची संधी मिळते.

अभिप्राय देणे आणि घेणे दोन्ही महत्त्वाचे आहे. योग्य अभिप्राय दिल्याने समोरच्या व्यक्तीला त्याच्या कामात सुधारणा करता येते आणि चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.

उदाहरण: एका विद्यार्थ्याने परीक्षेत चांगले गुण मिळवले, तर शिक्षक त्याला 'उत्कृष्ट' असा अभिप्राय देतात. याउलट, जर एखाद्या विद्यार्थ्याने कमी गुण मिळवले, तर शिक्षक त्याला अधिक अभ्यास करण्याचा सल्ला देतात.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2200

Related Questions

आशा टीपा लिहा?
माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?
सामाजिक परिपक्वता कशी निर्माण करावी?
हजरजबाबीपणा नसल्यामुळे दुसऱ्यांसमोर कमजोर ठरतो का?
आपण शिस्त का पाळत नाही?
मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?