निवडणूक मतदान कार्ड मतदान

तुमचे मतदान केंद्र कसे शोधाल?

2 उत्तरे
2 answers

तुमचे मतदान केंद्र कसे शोधाल?

2
*_🤔पहिल्यांदा मतदान करत आहात? मग 'हे' लक्षात ठेवा!_*

◼निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊन तुमचे मतदान केंद्र नेमके कोणते आहे, हे पाहू शकता. तिथे सीईओ, डीईओ, ईआरओ आणि बीएलओंना संपर्क करण्यासाठी त्यांचे फोन नंबर मिळू शकतात. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्येही मतदान केंद्राची माहिती मिळू शकते.

◼मतदान केंद्रावर गेल्यानंतर केंद्राबाहेर तुम्हाला विविध पक्षांचे वेगवेगळे डेस्क आढळतील. कोणत्याही डेस्कवर तुम्ही तुमचे मतदार यादीतील नाव तपासू शकता. नाव पाहिल्यानंतर आत जा आणि रांगेत उभे राहा.

◼तुमचा नंबर आल्यानंतर तुम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे नाव सांगा. त्यानंतर तेथील कर्मचारी तुमच्या बोटाला शाई लावेल.

◼मतदानाच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर तेथे ईव्हीएम दिसेल. ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्या उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबा.

◼बटन दाबल्यानंतर लगेच पुढे जाऊ नका. व्हीव्हीपॅटची वाट पाहा. व्हीव्हीपॅटमधून आलेली स्लीप पाहा. तुमचे मत योग्य उमेदवाराला गेले का, याची खात्री करा.

◼निवडणूक आयोगाने दिलेली मतदार स्लीप घेऊन मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. जर मतदार स्लीप मिळालेली नसेल, तर तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र किंवा मग सरकारने वितरित केलेले इतर कोणतेही ओळखपत्र सोबत नेऊ शकता.

*_📍आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान नक्की करा_*

*_🤔तुम्ही तुमचे मतदान केंद्र कसे शोधाल?_*
__________________________
_देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. आता आपलं नाव मतदार यादीत नाव असून देखील बऱ्याच वेळेला मतदारांला त्यांचे मतदान केंद्र सापडत नाही आणि पंचाईत होते. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं मतदान केंद्र कुठे आहे हे आताच पाहा._

*_💁असे शोधा तुमचे मतदान केंद्र_*

https://electoralsearch.in/ या लिंकवर क्लिक करत तुम्ही मतदान केंद्र शोधू शकता.

◼‘मतदार हेल्पलाइन अॅप’चा वापर करुनसुद्धा मतदान केंद्र शोधू शकता.

◼मतदार https://electoralsearch.in/ वर जाऊ शकतात किंवा मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार हेल्पलाईन अॅप वापरू शकतात.

◼1950 या मतदार हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकता.  पण हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्याआधी तुम्हाला तुमचा एसटीडी कोड टाकावा लागणार आहे.

◼तसेच तुम्ही मेसेजच्या सहाय्यानेही मतदान केंद्र शोधू शकता. मतदाराने  <ECIPS> space <EPIC No> टाइप करत 1950 या नंबरवर पाठवत तुम्ही मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता.


​माझे वरील प्रमाणे मतदार ओळखपत्र आहे समजा,
तर मला माझा EPIC ID NO.- YJH6706477 वरील प्रमाणे मेसेज करावे लागेल.
उदा,ECIPS YJH6706477 हा मेसेज मला 1950
नंबर वर पाठवल्या नंतर पुढीलप्रमाणे मेसेज प्राप्त होईल.
"PollingStation: z.p.primery marathi school room no 1 boragaon"

◼राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (एनव्हीएसपी) National Voters' Service Portal (NVSP) च्या वेबसाइटवर जाऊन देखील मतदान केंद्र शोधू शकता.

*_📍 आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान करा._*
उत्तर लिहिले · 22/4/2019
कर्म · 569265
0

तुम्ही तुमचे मतदान केंद्र खालील प्रकारे शोधू शकता:

  1. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट द्या:

    भारताच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ( https://eci.gov.in/) तुम्ही तुमचे मतदान केंद्र शोधू शकता.

  2. Voter Helpline ॲप:

    Voter Helpline ॲप डाउनलोड करा आणि माहिती भरा.

  3. SMS द्वारे माहिती मिळवा:

    1950 या क्रमांकावर SMS पाठवून माहिती मिळवा. तुमचा Voter ID क्रमांक टाका.

  4. जवळच्या निवडणूक कार्यालयात संपर्क साधा:

    तुम्ही तुमच्या शहरातील निवडणूक कार्यालयात संपर्क साधून तुमच्या मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5280

Related Questions

मतदान याद्या तयार करण्याच्या टिप्स लिहा?
आपल्या मतदार संघातील गावनिहाय पडलेली मते कशी पाहता येतील?
अंध व्यक्तीसाठी गुप्त मतदान करण्यासाठी काय योजना असते?
आपण जेव्हा मतदान करतो, पण आपल्याला एखाद्याला मत द्यायचं आहे, पण तिथे तो उमेदवार उभा नाही राहिला आहे, तर त्यालाच मत कसं द्यावं?
माझं मतदान गावाकडे आहे पण मी मतदान करण्यासाठी गावी जाऊ शकत नाही, तर मी मतदान कसे करावे? लवकर सांगा?
मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येते का?
उत्तर नावडते ठरवण्यासाठी किती कर्म असणे आवश्यक आहे?