मतदान
मतदान याद्या तयार करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स:
-
नवीनतम माहितीचा वापर:
मतदान यादी तयार करताना, नेहमी नवीनतम आणि अद्ययावत माहितीचा वापर करा. यासाठी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वेबसाइटला भेट द्या. निवडणूक आयोग
-
नोंदणी प्रक्रिया:
नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी योग्य प्रक्रिया पार पाडा. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असते.
-
जुनी यादी अद्ययावत करणे:
जुन्या यादीतील नावे तपासा आणि त्यात काही बदल असतील (उदा. पत्ता बदलणे, नाव वगळणे) तर ते अपडेट करा.
-
दुबार नोंदी टाळा:
एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी नोंदवले जाणार नाही याची काळजी घ्या. यासाठी डेटा फिल्टरिंग (Data filtering) आणि पडताळणी करा.
-
मतदान केंद्रानुसार वर्गीकरण:
मतदारांची यादी मतदान केंद्रानुसार (Polling booth) वर्गीकृत करा, ज्यामुळे निवडणुकीच्या दिवशी व्यवस्थापन करणे सोपे जाईल.
-
ऑनलाइन डेटाबेस:
मतदारांचा डेटा ऑनलाइन डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवा. यामुळे माहिती अद्ययावत करणे आणि शोधणे सोपे होते.
-
त्रुटी तपासणी:
यादी तयार झाल्यावर, त्यात काही त्रुटी आहेत का ते तपासा. नावांमध्ये किंवा पत्त्यांमध्ये चुका असू शकतात, त्या सुधारण्याची खात्री करा.
-
प्रशिक्षण:
यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य प्रशिक्षणाची व्यवस्था करा, जेणेकरून त्यांना अचूकपणे काम करता येईल.
या टिप्स वापरून तुम्ही अचूक आणि अद्ययावत मतदान याद्या तयार करू शकता.
आपल्या मतदार संघातील गावनिहाय पडलेली मते पाहण्यासाठी, निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) वेबसाइटवर किंवा संबंधित राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर माहिती उपलब्ध होऊ शकते. खालीलप्रमाणे तुम्ही माहिती मिळवू शकता:
-
निवडणूक आयोगाची वेबसाइट:
भारताच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ([https://eci.gov.in/](https://eci.gov.in/)) निवडणुकीच्या निकालांची माहिती दिली जाते.
-
संबंधित राज्याच्या निवडणूक आयोगाची वेबसाइट:
उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील असाल, तर महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर माहिती मिळू शकते.
-
निवडणूक निकाल पोर्टल:
Election Commission of India च्या वेबसाइटवर Constituency Wise Result चा पर्याय असतो. त्यावर क्लिक करून तुम्ही गावनिहाय निकाल पाहू शकता.
टीप:
- निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी ही माहिती वेबसाइटवर अपडेट केली जाते. त्यामुळे, निकालानंतर तुम्ही वेळोवेळी वेबसाइट चेक करत राहा.
- तुम्हाला हवी असलेली माहिती मिळत नसेल, तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात संपर्क साधून देखील माहिती मिळवू शकता.
अंध व्यक्तींसाठी गुप्त मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने काही योजना तयार केल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे:
- ब्रेल लिपीतील मतपत्रिका: अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाते. यामुळे त्यांना स्वतःच्या मतानुसार उमेदवार निवडता येतो.
- सहाय्यक: अंध व्यक्तीला मतदान करण्यासाठी सहाय्यकाची मदत घेता येते. सहाय्यक त्यांची निवड गुप्त ठेवतो.
- ईव्हीएम मशीनवर ब्रेल लिपी: ईव्हीएम (EVM) मशीनवर ब्रेल लिपीमध्ये उमेदवारांची नावे दिली जातात, ज्यामुळे अंध मतदारांना त्यांची निवड करणे सोपे होते.
- ऑडिओ सहाय्य: काही ठिकाणी ऑडिओच्या माध्यमातून मतदारांना मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे त्यांना योग्य उमेदवार निवडता येतो.
संदर्भ: भारतीय निवडणूक आयोग
संदर्भ: भारतीय निवडणूक आयोग
संदर्भ: भारतीय निवडणूक आयोग
संदर्भ: भारतीय निवडणूक आयोग
या योजनांमुळे अंध व्यक्तीसुद्धा गुप्तपणे मतदान करू शकतात आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊ शकतात.
◼निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊन तुमचे मतदान केंद्र नेमके कोणते आहे, हे पाहू शकता. तिथे सीईओ, डीईओ, ईआरओ आणि बीएलओंना संपर्क करण्यासाठी त्यांचे फोन नंबर मिळू शकतात. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्येही मतदान केंद्राची माहिती मिळू शकते.
◼मतदान केंद्रावर गेल्यानंतर केंद्राबाहेर तुम्हाला विविध पक्षांचे वेगवेगळे डेस्क आढळतील. कोणत्याही डेस्कवर तुम्ही तुमचे मतदार यादीतील नाव तपासू शकता. नाव पाहिल्यानंतर आत जा आणि रांगेत उभे राहा.
◼तुमचा नंबर आल्यानंतर तुम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे नाव सांगा. त्यानंतर तेथील कर्मचारी तुमच्या बोटाला शाई लावेल.
◼मतदानाच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर तेथे ईव्हीएम दिसेल. ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्या उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबा.
◼बटन दाबल्यानंतर लगेच पुढे जाऊ नका. व्हीव्हीपॅटची वाट पाहा. व्हीव्हीपॅटमधून आलेली स्लीप पाहा. तुमचे मत योग्य उमेदवाराला गेले का, याची खात्री करा.
◼निवडणूक आयोगाने दिलेली मतदार स्लीप घेऊन मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. जर मतदार स्लीप मिळालेली नसेल, तर तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र किंवा मग सरकारने वितरित केलेले इतर कोणतेही ओळखपत्र सोबत नेऊ शकता.
*_📍आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान नक्की करा_*
*_🤔तुम्ही तुमचे मतदान केंद्र कसे शोधाल?_*
__________________________
_देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. आता आपलं नाव मतदार यादीत नाव असून देखील बऱ्याच वेळेला मतदारांला त्यांचे मतदान केंद्र सापडत नाही आणि पंचाईत होते. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं मतदान केंद्र कुठे आहे हे आताच पाहा._
*_💁असे शोधा तुमचे मतदान केंद्र_*
◼https://electoralsearch.in/ या लिंकवर क्लिक करत तुम्ही मतदान केंद्र शोधू शकता.
◼‘मतदार हेल्पलाइन अॅप’चा वापर करुनसुद्धा मतदान केंद्र शोधू शकता.
◼मतदार https://electoralsearch.in/ वर जाऊ शकतात किंवा मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार हेल्पलाईन अॅप वापरू शकतात.
◼1950 या मतदार हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकता. पण हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्याआधी तुम्हाला तुमचा एसटीडी कोड टाकावा लागणार आहे.
◼तसेच तुम्ही मेसेजच्या सहाय्यानेही मतदान केंद्र शोधू शकता. मतदाराने <ECIPS> space <EPIC No> टाइप करत 1950 या नंबरवर पाठवत तुम्ही मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता.

माझे वरील प्रमाणे मतदार ओळखपत्र आहे समजा,
तर मला माझा EPIC ID NO.- YJH6706477 वरील प्रमाणे मेसेज करावे लागेल.
उदा,ECIPS YJH6706477 हा मेसेज मला 1950
नंबर वर पाठवल्या नंतर पुढीलप्रमाणे मेसेज प्राप्त होईल.
"PollingStation: z.p.primery marathi school room no 1 boragaon"
◼राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (एनव्हीएसपी) National Voters' Service Portal (NVSP) च्या वेबसाइटवर जाऊन देखील मतदान केंद्र शोधू शकता.
*_📍 आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान करा._*
- पोस्टल मतदान (Postal Voting): जर तुम्ही काही विशिष्ट कारणांमुळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नसाल, तर पोस्टल मतदानासाठी अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला मतपत्रिका पोस्टाने पाठवली जाते आणि तुम्ही ती भरून परत पाठवू शकता.
- नोकरी किंवा शिक्षणानिमित्त घरापासून दूर असलेले नागरिक.
- ज्येष्ठ नागरिक (80 वर्षांपेक्षा जास्त वय).
- दिव्यांग व्यक्ती.
- अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी.
- प्रतिनिधीद्वारे मतदान (Proxy Voting): काही विशिष्ट परिस्थितीत, तुम्ही तुमच्या वतीने मतदान करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करू शकता.
- नोंदणी बदलणे: जर तुम्ही कायमस्वरूपी शहरात स्थायिक झाला असाल, तर तुमचे मतदार नोंदणी शहरात बदलून घ्या.
पात्रता:
अर्ज कसा करावा: तुमच्या निवडणुकीच्या संबंधित निवडणूक कार्यालयात अर्ज करावा लागतो.
*⚡आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान*
💫तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तरी तुम्हाला मतदान करता येणार आहे. निवडणूक आयाेगाने विविध 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.
🤔मतदान ओळखपत्र हरवले तर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडताे. तसेच मतदान करता येईल का याबाबतही संभ्रमावस्था असते. अशा मतदारांसाठी निवडणुक आयाेगाने संकेस्थळावर मतदार ओळखपत्र नसल्यास काेणती 11 ओळखपत्रे मतदान केंद्रावर घेऊन जाता येतील याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही त्यांनाही मतदान करता येणार आहे. परंतु यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.
🔘 सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. ते नसल्याच कुठलं ओळखपत्र चालेल याची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
*💁♂निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती*
१. पासपोर्ट
२. वाहन चालक परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )
३. छायाचित्रे असलेले कर्मचारी ओळखपत्र ( केंद्र्/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र )
४. छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
५. पॅनकार्ड
६. एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड
७. मनरेगा कार्यपत्रिका
८. कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
१०. खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
११. आधारकार्ड
👆🏻🔹 _*मतदानासाठी या 11 पैकी कुठलंही ओळखपत्र चालणार निवडणूक आयोगाने दिली यादी*_
🔊 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे. मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसेल तर मतदाराने खालील पैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदार केंद्रावर सादर करावे.
केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. याबाबत मतदारांनी आपले नाव नोंदणी अथवा पडताळणीसाठी https://www.nvsp.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.
🔊 *यंत्रणा सज्ज*
सोमवारी 21 ऑक्टोबरला (Maharashtra polling day) होणाऱ्या मतदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीची व्यवस्था (Counting day) वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलही सज्ज आहे.
*मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा*
▪ मतदारांना मतदार यादीत नाव आहे की नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल.
▪ या वेबसाईटवर इथे क्लिक करा. स्वतःचे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या नावाची माहिती मिळते. मतदाराचं नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या गोष्टी दिलेल्या कॉलममध्ये भरल्यानंतर माहिती मिळू शकते.
▪ याशिवाय मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचं नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याचा दुसरा पर्यायही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
_*⁉👤मतदार यादीत नाव शोधायचे आहे?*_
*खालील लिंकवर फक्त नुसती टिचकी मारा*
_*आपले नांव टाका,*_
_*तुमचे नांव,*_
_यादी भाग क्रमांक व क्रमांक येईल._
*तुम्ही लाभ घ्या, इतरांनाही पाठवा*
https://t.co/hPKnChwABZ

अधिक माहितीसाठी: *मतदान-निवडणूक विशेष माहिती?मतदार नोंदणी करण्यासाठी.....*
https://www.uttar.co/answer/5bb6ec7b419f1512e9a8f38e
#RASUL_KHADAKALE
_____________________________
_*🇮🇳रसुल खडकाळे🇮🇳*_
_बोरगांव(देशमुख)ता.अक्कलकोट जि.सोलापूर_
_______________________________