2 उत्तरे
2
answers
मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येते का?
1
Answer link
*⚡आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान*
💫तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तरी तुम्हाला मतदान करता येणार आहे. निवडणूक आयाेगाने विविध 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.
🤔मतदान ओळखपत्र हरवले तर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडताे. तसेच मतदान करता येईल का याबाबतही संभ्रमावस्था असते. अशा मतदारांसाठी निवडणुक आयाेगाने संकेस्थळावर मतदार ओळखपत्र नसल्यास काेणती 11 ओळखपत्रे मतदान केंद्रावर घेऊन जाता येतील याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही त्यांनाही मतदान करता येणार आहे. परंतु यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.
🔘 सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. ते नसल्याच कुठलं ओळखपत्र चालेल याची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
*💁♂निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती*
१. पासपोर्ट
२. वाहन चालक परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )
३. छायाचित्रे असलेले कर्मचारी ओळखपत्र ( केंद्र्/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र )
४. छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
५. पॅनकार्ड
६. एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड
७. मनरेगा कार्यपत्रिका
८. कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
१०. खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
११. आधारकार्ड
👆🏻🔹 _*मतदानासाठी या 11 पैकी कुठलंही ओळखपत्र चालणार निवडणूक आयोगाने दिली यादी*_
🔊 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे. मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसेल तर मतदाराने खालील पैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदार केंद्रावर सादर करावे.
केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. याबाबत मतदारांनी आपले नाव नोंदणी अथवा पडताळणीसाठी https://www.nvsp.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.
🔊 *यंत्रणा सज्ज*
सोमवारी 21 ऑक्टोबरला (Maharashtra polling day) होणाऱ्या मतदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीची व्यवस्था (Counting day) वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलही सज्ज आहे.
*मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा*
▪ मतदारांना मतदार यादीत नाव आहे की नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल.
▪ या वेबसाईटवर इथे क्लिक करा. स्वतःचे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या नावाची माहिती मिळते. मतदाराचं नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या गोष्टी दिलेल्या कॉलममध्ये भरल्यानंतर माहिती मिळू शकते.
▪ याशिवाय मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचं नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याचा दुसरा पर्यायही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
_*⁉👤मतदार यादीत नाव शोधायचे आहे?*_
*खालील लिंकवर फक्त नुसती टिचकी मारा*
_*आपले नांव टाका,*_
_*तुमचे नांव,*_
_यादी भाग क्रमांक व क्रमांक येईल._
*तुम्ही लाभ घ्या, इतरांनाही पाठवा*
https://t.co/hPKnChwABZ

अधिक माहितीसाठी: *मतदान-निवडणूक विशेष माहिती?मतदार नोंदणी करण्यासाठी.....*
https://www.uttar.co/answer/5bb6ec7b419f1512e9a8f38e
#RASUL_KHADAKALE
_____________________________
_*🇮🇳रसुल खडकाळे🇮🇳*_
_बोरगांव(देशमुख)ता.अक्कलकोट जि.सोलापूर_
_______________________________
0
Answer link
जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तरी तुम्ही खालीलपैकी कोणत्याही ओळखपत्राचा वापर करून मतदान करू शकता:
- आधार कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- फोटोसहित पेन्शन डॉक्युमेंट
- केंद्र सरकार/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेले ओळखपत्र
- बँक/पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेले फोटोसहित पासबुक
- नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) अंतर्गत आरजीआयद्वारे (RGI) जारी केलेले स्मार्ट कार्ड
- आमदार, खासदार यांचे ओळखपत्र
यापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट द्या: निवडणूक आयोग (Elections Commission of India)