अंधश्रद्धा प्राणी समजुती-गैरसमजुती

मांजर आडवे गेल्यामुळे काम होत नाही असे म्हणतात. हे खरे आहे का?

5 उत्तरे
5 answers

मांजर आडवे गेल्यामुळे काम होत नाही असे म्हणतात. हे खरे आहे का?

6
खरंच, जग विज्ञान युगाकडे झेप घेत आहे आणि आपण अजून अंधश्रद्धेचे पाढे गिरवत बसलो आहोत. शनिवारी लिंबू-मिरच्या बांधणे, अंगात देवी येणे, भुताटकी, भानामती, पशुंचे बळी देणे आणि मांजर आडवी गेल्यावर काम होत नाही, याउलट मांजर सांगत असेल, 'माणूस आडवा गेला तर माझे काम होत नाही.' सगळा मनाचा खेळ आहे. धन्यवाद!
उत्तर लिहिले · 26/11/2019
कर्म · 2285
3
काय मित्रा, कुठल्या जगात जगतोय? असं काही नसतं. तुला वाटलंच तर एकदा अनुभव घे.
उत्तर लिहिले · 17/4/2019
कर्म · 70
0

मांजर आडवे गेल्यामुळे काम होत नाही, ही एक अंधश्रद्धा आहे. याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

अंधश्रद्धा अनेक वर्षांपासून समाजात रूढ आहेत. त्यामागे कोणतेही तर्कशास्त्र किंवा तथ्य नसते. मांजर आडवे जाणे हा त्यापैकीच एक प्रकार आहे. कोणतीही गोष्ट शुभ-अशुभ मानणे हे व्यक्तिपरत्वे बदलू शकते. त्यामुळे, मांजर आडवे गेल्याने काम होत नाही, असे मानणे योग्य नाही.

टीप: अंधश्रद्धाळू गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1080

Related Questions

रात्री नखे काढायची नाही असं का म्हणतात?
शनिवारी नखे किंवा केस कापू नयेत, असे म्हणतात का?
पाल अंगावर पडली तर ते अशुभ समजतात, याबाबत कोणी विस्ताराने सांगेल का?
चप्पल उलटी पडू नये असे का म्हणतात? आणि त्या मागचे अंधश्रद्धेचे कारण काय?
हातातले घड्याळ बंद पडले तर ते खरंच फेकून द्यायचे का, ते हातात ठेवल्यास काही अपशकुन होतो का?
लहान बाळाची नजर काढण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे काय?
मांजर आडवी गेल्यास अपशकुन का मानतात?