अंधश्रद्धा मांजर समजुती-गैरसमजुती

मांजर आडवी गेल्यास अपशकुन का मानतात?

4 उत्तरे
4 answers

मांजर आडवी गेल्यास अपशकुन का मानतात?

9
.अहो साहेब,तुम्ही कुठल्या जगात आहात. विज्ञान खूप पुढे गेलं आहे.लोक चंद्रावर पोहोचली बरं असो....
या सगळ्या भाकड गोष्टी आपल्या वाड वाडीलांपासून चालत आल्या आहेत आणि त्याच अनुकरण आपण करत असतो आणि पुढच्या पिढीला पण करण्यास भाग पाडतो.शकुन अपशकुन असं काही नसत या सगळ्या बुरसटलेल्या गोष्टी आहेत.संत गाडगे महाराज,संत तुकाराम, संत तुकडोजी इ. आपल्या वाणीतून कडाडून विरोध केला आहे. शेवटी एकच सांगेन," विज्ञान वादी बना".
उत्तर लिहिले · 4/9/2017
कर्म · 2690
8
काही जुन्या मंडळींकडून या बद्दल माहिती घेतली असता.

जुन्या काळी प्लेगच्या साथी पसरत असतं. प्लेग हा मुख्यत्वे उंदिरा मार्फत पसरतो. जेथे उंदीर तेथे हा रोग आणि मांजर. मांजर जरी उंदरांना मारून खायचे तरी उंदराच्या शरीरावरील जीवजंतू जसे पिस्सु हे मांजराच्या अवती भोवती राहायचे. त्या काळी मांजर दिसणे म्हणजे तिथे त्या जीव जंतू हवेत राहायचे त्यामुळे ज्या दिशेला मांजर त्या दिशेला जायचे जुने लोक टाळायचे.

या गोष्टीला काहीही पुरावा नाही, त्यामुळे ही एक दंतकथा सुध्धा असू शकते
उत्तर लिहिले · 5/9/2017
कर्म · 240
0

मांजर आडवी गेल्यास अपशकुन मानण्यामागे काही सामाजिक आणि पारंपरिक कारणे आहेत:

  • प्राचीन मान्यता: पूर्वीच्या काळी मांजर हा प्राणी रहस्यमय मानला जाई. अनेक कथा-कहाण्यांमध्ये मांजरांना नकारात्मक शक्तींशी जोडले गेले. त्यामुळे मांजर आडवी जाणे म्हणजे काहीतरी अशुभ घडणार आहे, असा समज रूढ झाला.
  • शिकार करण्याची पद्धत: मांजर शिकार करताना अत्यंत सावध असते. ती दबा धरून बसते आणि अचानक हल्ला करते. त्यामुळे मांजर आडवी गेल्यास एखादा धोका निर्माण होऊ शकतो, असा विचार लोकांच्या मनात येतो.
  • अंधश्रद्धा: काही लोकांमध्ये मांजर आडवी जाणे ही केवळ अंधश्रद्धा आहे. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही.
  • सामाजिक संकेत: समाजामध्ये काही गोष्टी अपशकुन मानल्या जातात. त्यापैकीच मांजर आडवी जाणे ही एक गोष्ट आहे. त्यामुळे अनेक लोक मांजर आडवी गेल्यास नकारात्मक विचार करतात.

या समजुती आजही काही लोकांमध्ये प्रचलित असल्या तरी, आधुनिक युगात याला फारसे महत्त्व दिले जात नाही.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1080

Related Questions

रात्री नखे काढायची नाही असं का म्हणतात?
मांजर आडवे गेल्यामुळे काम होत नाही असे म्हणतात. हे खरे आहे का?
शनिवारी नखे किंवा केस कापू नयेत, असे म्हणतात का?
पाल अंगावर पडली तर ते अशुभ समजतात, याबाबत कोणी विस्ताराने सांगेल का?
चप्पल उलटी पडू नये असे का म्हणतात? आणि त्या मागचे अंधश्रद्धेचे कारण काय?
हातातले घड्याळ बंद पडले तर ते खरंच फेकून द्यायचे का, ते हातात ठेवल्यास काही अपशकुन होतो का?
लहान बाळाची नजर काढण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे काय?