नैतिकता युद्ध तत्त्वज्ञान जागतिक शांतता

विश्वशांती कशाने? शस्त्रानें (कायद्याने, लढाई, युद्ध) की शास्त्रानें (वेद, उपनिषद, श्रीमद भगवत गीता, विचार)?

3 उत्तरे
3 answers

विश्वशांती कशाने? शस्त्रानें (कायद्याने, लढाई, युद्ध) की शास्त्रानें (वेद, उपनिषद, श्रीमद भगवत गीता, विचार)?

3
भाऊ, आपण खूप छान आणि एक वेगळा असा प्रश्न विचारला आहे, त्यामुळे तुमचे आभिनंदन.

कायदा हा आपल्याला शिस्त लावत असतो, कायदा किंवा त्याचे नियम सर्वांना आवडतीलच असे नाही,
उदा. नुकताच तिहेरी तलाख चा विषय पाहा काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी विरोध झाला, थोडक्यात असे की कायद्याने शांतता निर्माण करणे कदाचित कठीण होऊ शकते.

लढाई , युद्ध करून फायदा कमी आणि नुकसानच जास्त होते त्यामुळे शांतता प्रस्तापित करायला युद्ध , लढाई हा पर्याय असु शकत नाही.


वेद, उपनिषद, श्रीमद भगवत गीता, विचार हे मानवी मुल्य तसेच जगण्याचे महत्त्व समजावतात.

त्यामुळे माणूस घडतो, त्यापाठोपाठ त्याचे कुटुंब घडते कुटुंब नंतर समाज विकसित होत जातो समाजाचा विकास झाला तर गावाचा विकास होतो गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होतो आणि देशाचा विकास झाला तर विश्वात बदल होतो हे एक सूत्र आहे (वसुधैव कुटुम्बकम).

श्रीमद भगवत गीता दुसर्‍या धर्माचा देखील आदर करायला शिकवते आणि ही फार मोठी गोष्ट आहे, गीतेची व्याप्ती वैश्विक आहे. तिची शिकवण जातीधर्माच्या बंधनापलीकडील आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथां पैकी मानली जाणारी गीता, ही आयुष्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी नैतिक दिशादर्शक आहे. गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे. कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच ही गीता..
गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. आपल्या राष्ट्र पित्यांपासून ते एॅल्डस हक्स्ली ते अलबर्ट आइनस्टाइन यांनाही गीतेने भारावून टाकले आहे.

गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते.

गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. आपल्या राष्ट्र पित्यांपासून ते एॅल्डस हक्स्ली ते अलबर्ट आइनस्टाइन यांनाही गीतेने भारावून टाकले आहे. महात्मा गांधींनी म्हटले आहे, ‘जेव्हा शंकांचे काहूर माजते, जेव्हा समोर फक्त नराश्यच दिसते, आणि दूर क्षितिजापर्यंत आशेचा एकही किरण दृष्टीस पडत नाही, तेव्हा मी वळतो भगवद्गीतेकडे, आणि एक असा श्लोक शोधतो ज्याचा मला आधार वाटतो, आणि अतीव शोकातही माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलू लागते. जे रोज गीतेबरोबर ध्यान करतात त्यांना रोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो.’

आइनस्टाइन काय म्हणतो पहा, ‘मी जेव्हा भगवदगीता वाचतो आणि विश्वाची निर्मिती कशी झाली याचा विचार करतो तेव्हा बाकी सगळे अगदी निर्थक भासते.’

एॅल्डस हक्स्ली म्हणतात, ‘गीता ही शाश्वत तत्त्वज्ञानाचा सर्वात सरळ आणि सुलभ सारांश आहे. म्हणूनच फक्त भारतीयांसाठीच नाही तर पूर्ण मानवजातीसाठीच अमूल्य ठेवा आहे. गीता ही बहुतेक शाश्वत तत्त्वज्ञानाचा सर्वात पद्धतशीर आध्यात्मिक सारांश आहे.’

सत्तेची, प्रसिद्धीची, ऐश्वर्याची नशा मनुष्याला एकप्रकारच्या भोवऱ्यात अडकवतात. या उलट अध्यात्म मनाला आनंद देतो. ते तुम्हाला फुलवू शकते. तुमच्यातल्या सकारात्मक बाबी खुलवू शकते. म्हणूनच तुमच्या मनाची दिशा यामुळे बदलू शकते. पण तरीही मनावर पूर्णत स्वामित्व मिळवणे, कठीण वाटत आहे ना? हो. पण हे नक्की करता येते. सर्व काही आपल्या मनात असते. थोडक्यात वेद, उपनिषद, श्रीमद भगवत गीता विचारांनी विश्वशांती शक्य आहे.
उत्तर लिहिले · 17/4/2019
कर्म · 2920
0
सोप्या शब्दांत,,,,,

महाकरुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध
उत्तर लिहिले · 21/1/2021
कर्म · 20
0

तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. विश्वशांती कशाने प्रस्थापित होऊ शकते, हा एक गहन आणि गुंतागुंतीचा विषय आहे. यावर अनेक विचारकांनी आणि अभ्यासकांनी आपले विचार मांडले आहेत.

शस्त्र (कायदा, लढाई, युद्ध):

  • युद्धाने शांती प्रस्थापित करणे शक्य आहे का?, यावर अनेक मतभेद आहेत. काहीजण मानतात की शस्त्रांचा वापर केवळ तात्पुरती शांतता देऊ शकतो, परंतु दीर्घकाळ टिकणारी शांती निर्माण करू शकत नाही. कारण युद्धामुळे हिंसा, विनाश आणि द्वेष वाढतो.

  • कायद्याच्या साहाय्याने शांती, काही प्रमाणात प्रस्थापित होऊ शकते. परंतु कायदा हा समाजाचा एक भाग आहे आणि जर समाजात अन्याय आणि विषमता असेल, तर केवळ कायद्याने शांती प्रस्थापित करणे कठीण आहे.

शास्त्र (वेद, उपनिषद, श्रीमद भगवत गीता, विचार):

  • शास्त्र म्हणजे ज्ञान. वेद, उपनिषद, भगवत गीता यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये शांती आणि सद्भावनेचे महत्त्व सांगितले आहे. हे ग्रंथ आपल्याला प्रेम, करुणा, आणि समजूतदारपणा शिकवतात, जे शांतीपूर्ण जगासाठी आवश्यक आहेत.

  • विचार: सकारात्मक आणि रचनात्मक विचार शांती निर्माण करू शकतात. सहनशीलता, आदर आणि संवाद हे शांतीपूर्ण संबंधांचे आधारस्तंभ आहेत.

निष्कर्ष:

माझ्या विचारानुसार, केवळ शस्त्रांनी किंवा केवळ शास्त्रांनी नव्हे, तर दोघांच्या एकत्रित प्रयत्नांनी जगात शांती प्रस्थापित होऊ शकते. शस्त्रांचा वापर फक्त आत्म-संरक्षणासाठी आणि अत्यावश्यक परिस्थितीतच केला पाहिजे. त्याच वेळी, शास्त्रांचे ज्ञान समाजात पसरवणे आवश्यक आहे, जेणेकरून लोकांमध्ये प्रेम, करुणा आणि समजूतदारपणा वाढेल.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

विश्‍व मे शांती फैलेगी?