Topic icon

जागतिक शांतता

0

जगात शांतता नांदेल का? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे, कारण ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

सकारात्मक दृष्टिकोन:

  • जागतिक स्तरावर शांतता: अनेक देश आणि संस्था जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
  • सामंजस्य: लोकांमध्ये सामंजस्याची भावना वाढत आहे, ज्यामुळे संघर्ष कमी होण्यास मदत होते.
  • तंत्रज्ञान: तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना एकमेकांशी जोडले जात आहे, ज्यामुळे संवाद वाढतो आणि गैरसमज कमी होतात.

नकारात्मक दृष्टिकोन:

  • युद्ध आणि संघर्ष: जगात अजूनही अनेक ठिकाणी युद्ध आणि संघर्ष सुरू आहेत, ज्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे.
  • गरीबी आणि असमानता: गरीबी आणि असमानता ह्या समस्यांमुळे असंतोष वाढतो आणि लोक हिंसक मार्गांचा अवलंब करू शकतात.
  • राजकीय अस्थिरता: काही देशांमध्ये राजकीय अस्थिरता आहे, ज्यामुळे तेथील परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते.

त्यामुळे, जगात शांतता नांदेल की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र, जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले, तर निश्चितच जगात शांतता प्रस्थापित होऊ शकते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040
3
भाऊ, आपण खूप छान आणि एक वेगळा असा प्रश्न विचारला आहे, त्यामुळे तुमचे आभिनंदन.

कायदा हा आपल्याला शिस्त लावत असतो, कायदा किंवा त्याचे नियम सर्वांना आवडतीलच असे नाही,
उदा. नुकताच तिहेरी तलाख चा विषय पाहा काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी विरोध झाला, थोडक्यात असे की कायद्याने शांतता निर्माण करणे कदाचित कठीण होऊ शकते.

लढाई , युद्ध करून फायदा कमी आणि नुकसानच जास्त होते त्यामुळे शांतता प्रस्तापित करायला युद्ध , लढाई हा पर्याय असु शकत नाही.


वेद, उपनिषद, श्रीमद भगवत गीता, विचार हे मानवी मुल्य तसेच जगण्याचे महत्त्व समजावतात.

त्यामुळे माणूस घडतो, त्यापाठोपाठ त्याचे कुटुंब घडते कुटुंब नंतर समाज विकसित होत जातो समाजाचा विकास झाला तर गावाचा विकास होतो गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होतो आणि देशाचा विकास झाला तर विश्वात बदल होतो हे एक सूत्र आहे (वसुधैव कुटुम्बकम).

श्रीमद भगवत गीता दुसर्‍या धर्माचा देखील आदर करायला शिकवते आणि ही फार मोठी गोष्ट आहे, गीतेची व्याप्ती वैश्विक आहे. तिची शिकवण जातीधर्माच्या बंधनापलीकडील आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथां पैकी मानली जाणारी गीता, ही आयुष्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी नैतिक दिशादर्शक आहे. गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे. कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच ही गीता..
गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. आपल्या राष्ट्र पित्यांपासून ते एॅल्डस हक्स्ली ते अलबर्ट आइनस्टाइन यांनाही गीतेने भारावून टाकले आहे.

गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते.

गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. आपल्या राष्ट्र पित्यांपासून ते एॅल्डस हक्स्ली ते अलबर्ट आइनस्टाइन यांनाही गीतेने भारावून टाकले आहे. महात्मा गांधींनी म्हटले आहे, ‘जेव्हा शंकांचे काहूर माजते, जेव्हा समोर फक्त नराश्यच दिसते, आणि दूर क्षितिजापर्यंत आशेचा एकही किरण दृष्टीस पडत नाही, तेव्हा मी वळतो भगवद्गीतेकडे, आणि एक असा श्लोक शोधतो ज्याचा मला आधार वाटतो, आणि अतीव शोकातही माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलू लागते. जे रोज गीतेबरोबर ध्यान करतात त्यांना रोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो.’

आइनस्टाइन काय म्हणतो पहा, ‘मी जेव्हा भगवदगीता वाचतो आणि विश्वाची निर्मिती कशी झाली याचा विचार करतो तेव्हा बाकी सगळे अगदी निर्थक भासते.’

एॅल्डस हक्स्ली म्हणतात, ‘गीता ही शाश्वत तत्त्वज्ञानाचा सर्वात सरळ आणि सुलभ सारांश आहे. म्हणूनच फक्त भारतीयांसाठीच नाही तर पूर्ण मानवजातीसाठीच अमूल्य ठेवा आहे. गीता ही बहुतेक शाश्वत तत्त्वज्ञानाचा सर्वात पद्धतशीर आध्यात्मिक सारांश आहे.’

सत्तेची, प्रसिद्धीची, ऐश्वर्याची नशा मनुष्याला एकप्रकारच्या भोवऱ्यात अडकवतात. या उलट अध्यात्म मनाला आनंद देतो. ते तुम्हाला फुलवू शकते. तुमच्यातल्या सकारात्मक बाबी खुलवू शकते. म्हणूनच तुमच्या मनाची दिशा यामुळे बदलू शकते. पण तरीही मनावर पूर्णत स्वामित्व मिळवणे, कठीण वाटत आहे ना? हो. पण हे नक्की करता येते. सर्व काही आपल्या मनात असते. थोडक्यात वेद, उपनिषद, श्रीमद भगवत गीता विचारांनी विश्वशांती शक्य आहे.
उत्तर लिहिले · 17/4/2019
कर्म · 2920