वनस्पतीशास्त्र झाडे वैद्यकशास्त्र आरोग्य

जळू (Leech) याविषयी काही माहिती असेल तर शेअर करा?

2 उत्तरे
2 answers

जळू (Leech) याविषयी काही माहिती असेल तर शेअर करा?

5
     जळू/Leech हा परजीवी, रक्तशोषक,segmented worm किडा आहे. प्राणिशास्त्रानुसार वर्णन..
वर्ग - clitellata
उपवर्ग - Hirudinea
प्रवर्ग/संघ - Annelid                                जळू सततओलसर,दमट,चिखल,दलदल पालापाचोळा,कुजलेली पाने,गवत असलेल्या जमिनीत जगते. सदाहरित वने,अतिपाऊस,उंचावरील डोंगरदऱ्याक्षेत्र,अभयारण्य,नदी उगमस्थान येथे वावर अधिक.पावसाळा ते ऑक्टो-नोव्हेबर पर्यंत त्रास अधिक,उष्ण,गरम वातावरणात त्या जगत नाहीत, सुप्तावस्थेत जातात व पुन्हा ओल किंवा पावसाळ्यात नव्याने जिवन्त/डोके वर काढतात!!
  परजीवी असलेने माणूस,जनावरे,जगलीप्राणी यांचे शरीरावर चढून ,त्याचे सोंडवजा अवयवाच्या  सहाय्याने रक्त शोशते.परंतु त्याचे भक्ष्यास याचा पत्ताही लागत नाही.रक्त पिऊन ,फुगून परत स्व निवासात, जमिनीवर पडतात! जळू चिकटल्याचे लक्षात येताच सावधानता बाळगून ती काढावी,यासाठी स्थानिक  तंबाखूचा वापर करतात, वनातील काही वनस्पती,पानेही उपयोगी. जळू लागलेल्या ठिकाणी खाज सुटून, जखमही होऊ शकते.जळवांची संख्या अत्याधिक, अगणित,दिसायला किळसवाणी असलेने मनुष्य घाबरतो हे नक्की. चालताना शरीर विशेषतः पाय हात कोरडे राखणे गरजेचे.
  जळूचे अनेक प्रकार आहेत,आपले वनवासी जळूला कानिट असेंहि म्हणतात. रक्तशोषण गुणा मूळे वैद्य, डॉकटर मंडळी कांही विशिष्ट उपचारात वापरतात,यामुळे यांची तस्करी देखील होते. परंतु हे जीव निसर्ग साखळीचा एक दुवा/भाग आहेत तेंव्हा कसेही असो त्यांचे जीवन बिघडविणे योग्य नाही.
उत्तर लिहिले · 3/4/2019
कर्म · 4010
0
जळू (Leech) विषयी माहिती:

जळू हा अनमोल प्राण्यांपैकी एक आहे. जळू साधारणपणे ओल्या ठिकाणी तसेच गोड्या पाण्यात आढळतात. जळू हा परोपजीवी प्राणी आहे आणि तो इतर जीवांच्या शरीरातून रक्त शोषून घेतो.

जळूची काही वैशिष्ट्ये:

  • जळूचा रंग तपकिरी किंवा काळा असतो.
  • त्यांचे शरीर लांब आणि सपाट असते.
  • जळूंच्या तोंडाला आणि मागच्या बाजूला चूषक असतात, ज्यामुळे ते पृष्ठभागावर चिकटून राहू शकतात.
  • जळू रक्त गोठू नये म्हणून 'हिरुडीन' नावाचा एक रासायनिक पदार्थ स्त्रावतात.

जळूचे उपयोग:

  • जळू प्राचीन काळापासून औषधोपचारासाठी वापरले जात आहेत.
  • जळू रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात.
  • जळू त्वचेच्या रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत.

जळू विषयी काही अतिरिक्त माहिती:

  • जगात जळूच्या सुमारे ६५० प्रजाती आढळतात.
  • जळू काही महिने अन्नाशिवाय जगू शकतात.

टीप: जळू चावल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी: विकिपीडिया

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1780

Related Questions

वैद्यकीय दृष्ट्या मनुष्य म्हातारा होतो म्हणजे काय होतं?
वैद्यकीय दृष्ट्या माणूस म्हातारा होता म्हणजे काय?
वैद्यकीय माणूस मात्र होतो म्हणजे काय?
वैद्यकीय दृष्ट्या माणूस म्हातारा होतो म्हणजे काय?
बंगालमध्ये देवीच्या रोगावरील देवीच्या लशी कधी उपलब्ध झाल्या?
What is blood? Name different blood cells with normal values.
शरीराचे पोस्टमार्टम म्हणजे काय व ते का करतात?