2 उत्तरे
2
answers
भीमकुंडाचे रहस्य काय आहेत?
2
Answer link
भीमकुंडाचे रहस्य अजुनही संशोधकांना उलगडलेले नाही
http://bit.ly/31OXxyZ
____________________________
🌀 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌀
____________________________
भारत भूमी अनेक अद्भुत रहस्यमय ठिकाणांनी भरलेली भूमी मानली जाते. आता विज्ञानाच्या कसोटीवर अनेक रहस्ये उलगडल्याचा दावा केला जात असला तरी अजून अश्या अनेक जागा आहेत ज्यामागाचे रहस्य अत्याधुनिक संशोधनानंतरही उलगडले गेलेले नाही. असेच एक ठिकाण आहे मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील भीमकुंड. या ऐतिहासिक कुंडाची खोली अजून कुणालाही मोजता आलेली नाही. तसेच त्यातील पाण्याचे रहस्यही उलगडलेले नाही.

*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ *
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
या कुंडातील पाणी स्वच्छ आहेच पण ते पिण्यालायक आहे. येथील पाण्याची पातळी कधीही कमी होत नाही. या कुंडात कुठून पाणी येते त्याचा उगम कळत नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,मात्र सर्वात नवलाची गोष्ट अशी कि कुठलेही नैसर्गिक संकट येणार असेल तर या पाण्याची पातळी अचानक वाढते. हे प्रसिद्ध तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते आणि अनेक साधू संतांची ही तपोभूमी मानली जाते.या ठिकाणी वैज्ञानिक शोध केंद्र आहे. पाणबुड्यानि अनेकदा या कुंडाची खोली मोजण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा तळ कुणालाच गाठता आलेला नाही. डिस्कवरी चॅनलच्या टीम ने इकडे अत्याधुनिक उपकरणांच्या आणि पाणबुडीच्या साहाय्याने ह्या कुंडाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला. तळ शोधण्यापेक्षा इथे असलेल्या जलस्त्रोत्राचा आणि भारताच्या आसपास होणाऱ्या पृथ्वीच्या भूभागांच्या हालचालीचा काय संबंध लागतो का? ह्या प्रश्नांचं उत्तर ते शोधत होते. कुंडाच्या पाणाच्या पातळीतील वाढ किंवा कमी होणं ह्याचा सबंध जर आपण भूकंपाशी किंवा त्सुनामीशी लावू शकलो तर कदाचित भूकंपांची आणि त्सुनामीची पूर्वसूचना मिळायला मदत होईल जे कि आज विज्ञानाला शक्य झालेलं नाही. पण डिस्कवरी चमू ला इकडून रिकाम्या हातांनी परतावं लागल. असं असल तरी त्यांना ह्या पाण्यात खोलवर वेगळेच जलचर आणि वनस्पती दिसून आल्या. दिसायला अतिसामान्य असलेल्या या कुंडाचे पाणी पंप लावून उपसण्याचा प्रयत्न झाला तरी त्याची पटली घटली नाही. नोइडा तसेच गुजराथेत भूकंप झाले तेव्हा अगोदरच या कुंडातील पाण्याची पातळी वाढली होती. तसेच त्सुनामी आली तेव्हा ही पातळी १५ फुटांनी वाढली होती असे समजते. या कुंडाची पाणी पातळी वाढू लागली कि कोणतेतरी नैसर्गिक संकट येणार असे नक्की समजले जाते.भारतीय पुराणानुसार पांडव अज्ञातवासात असताना येथे आले तेव्हा भीमाला खूप तहान लागली. जवळ कुठे पाणी नसल्याने भीमाने याजागी त्याच्या गदेचा प्रहार करून खड्डा केला तेथेच हे कुंड तयार झाले आहे.
____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*🏉 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ™ 🏉*_
______________________________
0
Answer link
भीमकुंड हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेले एक नैसर्गिक कुंड आहे. या कुंडाशी संबंधित अनेक रहस्ये आणि आख्यायिका प्रचलित आहेत:
- अगाध खोली: या कुंडाची खोली आजपर्यंत कोणालाही मोजता आलेली नाही. अनेक प्रयत्न करूनही शास्त्रज्ञांना याची खोली निश्चित करता आलेली नाही.
- पाण्याचा रंग: भीमकुंडात पाण्याचा रंग बदलतो, असा दावा केला जातो.
- नैसर्गिक आपत्तीचा अंदाज: स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, जेव्हा कोणती मोठी नैसर्गिक आपत्ती येणार असते, तेव्हा या कुंडातील पाण्याची पातळी वाढते.
- भीमाशी संबंध: आख्यायिकेनुसार, महाभारतातील भीम यांनी द्रौपदीची तहान भागवण्यासाठी आपल्या गदेने प्रहार करून हे कुंड तयार केले. त्यामुळे याला भीमकुंड असे नाव पडले.
- वैज्ञानिक दृष्टिकोन: भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हे कुंड एका मोठ्या भूमिगत जलस्रोताशी जोडलेले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी बदलते आणि खोली मोजणे कठीण आहे.
या रहस्यांमुळे भीमकुंड एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: