अंधश्रद्धा स्थळे गूढ

मुंबईत भुताटकी कोठे आहे?

2 उत्तरे
2 answers

मुंबईत भुताटकी कोठे आहे?

6
मुंबईतिल या १०  जागा भुताटकीच्या अफवांमुळे प्रसिद्ध आहेत  ‼༆*
 विश्वास ठेवा अगर ठेवु नका, पण या जागा याच कारणासाठी प्रसिध्द आहेत.*
             *_☬ म्हणजे, भुतांना कसं घनदाट जंगलातील एकाकी वाडा, विहीर, जुनं झाड असं सगळं आवडतं. गजबजलेल्या मुंबईत ☠भुतं कुठून येणार?_*
पण मुंबईत देखील भुतांच्या बऱ्याच कथा प्रचलित आहेत…! एवढंच नाही तर काही जागा भुताटकीच्या अफवांमुळे प्रसिद्ध झाल्यात!
*☠❗मुंबई उच्च न्यायालय ☠❗*
या बाबतीत किती तथ्य आहे ते माहित नाही, पण म्हणतात की, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा कधी खुनाच्या खटल्याची सुनावणी असते, तेव्हा हे भूत शिवीगाळ करते आणि आपली दहशत निर्माण करते.

*❗☠मुकेश मिल्स, कुलाबा❗ ☠*
मुकेश मिल्स मुंबईमधील झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. १८७० मध्ये या मिलला आग लागली होती. तेव्हापासून ही संपूर्ण मिल निर्जन आहे. हे ठिकाण बॉलीवुड चित्रपटांच्या शूटसाठी खूप प्रसिद्ध आहे.
पण येथे अनेक कलाकारांना विचित्र आकृत्या दिसल्याने बहुतांश शूट मध्येच बंद करावे लागले होते.
*☠❗ आरे मिल्क कॉलनी ☠❗*
आरे मिल्क कॉलनी ही दुतर्फा झाडांनी आच्छादलेली आहे. हे ठिकाण दिसायला जरी खूप सुंदर असले तरी येथे रस्त्यावर खूप अपघात झाले आहेत. काही वाहन चालकांचे म्हणणे आहे की, त्यांना एक साडी घातलेली बाई लहान मुलासह दिसली, तिने त्यांना गाडी थांबवण्यास सांगितले आणि नंतर गायब झाली.
*काहीजण सांगतात की, जर गाडी थांबवली तर ती बाई गाडीचा पाठलाग करते. काहीजणांनी असेही सांगितले आहे की, त्यांना लहान मुलगा आणि म्हातारा माणूस दिसला आणि ते काहीवेळाने गायब झाले. त्यामुळे रात्रीच्यावेळी चालक या ठिकाणा वरून प्रवास करणे टाळतात.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ*  *☠❗ग्रँड पॅरडी टॉवर्सचा आठवा मजला☠❗*
ग्रँड पॅरडी मुंबईच्या उच्चभ्रू भागामध्ये स्थित आहे. ग्रँड पॅरडी टॉवरमुळे अनेक लोकांवर दुर्दैव ओढवले आहे. पहिली घटना इथे अशी घडली की, एका जोडप्याने या टॉवरच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली.
त्याच्या पुढीलवर्षी देखील तसेच घडले. दुसऱ्या एका कुटुंबातील लोकांनी सुद्धा त्यांच्या फ्लॅटमधून उडी मारली. अश्या अनेक घटना घडल्या.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, त्यामुळे ह्या टॉवरचा आठवा मजला झपाटलेला आहे असे मानले जाते. हा या टॉवर शहरातील सर्वात भीतीदायक ठिकाणांपैकी एक मानला जातो.
*❗☠ टॉवर ऑफ सायलंस ☠❗*
ही पारसी लोकांची जागा आहे. या ठिकाणावर पारसी लोकांचे मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी लटकवले जातात. गजबजलेल्या मुंबईतील ही जागा खूप निर्जन असून मलबार टेकडीवर स्थित आहे.
या ठिकाणी कोणत्याही अप्रिय घटना घडलेल्या नाहीत. पण तरीही या ठिकाणा जवळून जाताना अस्वस्थ वाटते असं अनेकदा नमूद केलं जातं.
*❗☠ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ☠❗*
मुंबईतील हा भाग निसर्गवेड्यांच्या अतिशय पसंतीचा आहे. येथे असलेली वनसंपदा देखील पाहण्याजोगी आहेत. पण हा भाग अजून एका कारणामुळे चर्चेत असतो – भुताटकी!
येथे येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांना खूप वेळा अडवणारा आत्मा दिसला आहे आणि त्यामुळे हा भाग झपाटलेला आहे असे असा दावा वारंवार केला जातो.
*❗☠ डिसोझा चाळ, माहीम ☠❗*
या चाळीमध्ये एका बाईचा आत्मा दिसतो असे म्हटले जाते. एक दिवस ही बाई चाळीतील विहिरीमधून पाणी भरत असताना अचानक त्या विहिरीची भिंत तुटली आणि ती विहिरीत पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून ती रात्रीची चाळीमध्ये दिसते असा दावा अनेकांनी केला आहे.
*❗☠ वृंदावन सोसायटी ☠❗*
वृंदावन सोसायटी ही ठाणे खाडीच्या अगदी पुढे स्थित आहे. येथील एका इमारतीवरून काही वर्षापूर्वी एका माणसाने आत्महत्या केली होती असे सांगितले जाते. या सोसायटीमधील भूत थोडे गमतीशीर आहे. हे भूत लोकांना कानाखाली मारते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर येथील सुरक्षा रक्षकांबरोबर अश्या कितीतरी घटना घडल्या आहेत. रात्री कधी या सुरक्षा रक्षकांचा डोळा लागल्यास हे भूत त्यांना कानाखाली वाजवून झोपेतून जागे करते किंवा गळा दाबते असे म्हणतात.
*❗☠ पूनम चेम्बर्स ☠❗*
मुंबईमध्ये १९९३ साली झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर १९९७ मध्ये येथे बी विंगची पडलेली भिंत या दोन्ही घटनांमध्ये मृत पावलेल्या माणसांचे आत्मा येथे भटकत असल्याचे सांगितले जाते.
*💀 बी विंगमध्ये जे लोक मध्यरात्रीपर्यंत काम करतात, त्यांना घरी जाताना पायऱ्यांचा वापर करू नये असे सक्तीने सांगितले आहे.💀*
इमारतीच्या वॉचमेन आणि कंपनींच्या सुरक्षा रक्षकांनी रात्रीचे दारे, खिडक्या हलून चित्रविचित्र आवाज येतात अशी तक्रार खूप वेळा केली आहे.
*❗☠नासेरवंजवाडी, माहीम ☠❗*
हे ठिकाण माहीम स्थानकाच्या जवळ आहे. येथे राहणाऱ्या मालकाची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून त्याचा आत्मा येथे भटकत असल्याचे सांगितले जाते.
त्या मालकाला जाळण्यात आले होते. त्यामुळे तो मध्यरात्रीनंतर त्याच्या मार्गात येणाऱ्याला खूप यातना देतो. त्याला जिथे जाळण्यात आले होते, तेथील विहीर आता झाकून टाकण्यात आली आहे.

0
मी तुम्हाला मुंबईतील काही कथित भुताटकी असलेल्या ठिकाणांची माहिती देऊ शकेन, पण हे लक्षात ठेवा की भूतांवरचा विश्वास व्यक्तिपरत्वे बदलतो आणि या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. मुंबईतील काही कथित भुताटकी असलेली ठिकाणे: * संजय गांधी राष्ट्रीय उद्यान: काही लोकांच्या मते, या उद्यानात रात्रीच्या वेळी विचित्र आवाज ऐकू येतात आणि काही लोकांना भयावह अनुभव आले आहेत. * व्ही.पी. नगर: व्ही.पी. नगर, अंधेरी येथे एका विहिरीच्या जवळ काही लोकांना रात्रीच्या वेळी विचित्र अनुभव येतात असे म्हटले जाते. * डी'सौझा चाळ: डी'सौझा चाळ, माहीम येथे एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता, आणि त्यानंतर तिची सावली तिथे दिसते, असा दावा काही लोक करतात. * मुकेश मिल: मुकेश मिल हे अनेक वर्षांपासून बंद पडलेले ठिकाण आहे. येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. काही लोकांच्या मते, येथे रात्रीच्या वेळी असामान्य घटना घडतात. * मरिन ड्राइव्ह: मरिन ड्राइव्हवर रात्रीच्या वेळी काही लोकांना नकारात्मक ऊर्जा जाणवते, असा अनुभव आहे. * आरे कॉलनी: आरे कॉलनीच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करताना काही लोकांना विचित्र अनुभव आले आहेत. हे सर्व दावे आहेत आणि यामागे कोणतेही वैज्ञानिक सत्य नाही. अंधश्रद्धाळू गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा तर्कशुद्ध विचार करणे महत्त्वाचे आहे.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारतातील अजबगजब ठिकाणे कोणती?
जटायु मंदिर कोठे आहे?
काशी विश्वनाथ कॉरिडॉर बद्दल माहिती सांगा?
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
शिवाजी महाराज यांची समाधी आहे त्या जागेचे नाव काय?
भारतातील धबधबे कोणते आहेत?
औरंगाबाद विषयी सर्व माहिती मिळेल का?