भूगोल कुतूहल गूढ

असं ऐकलं आहे व पाहिलं आहे की 'बर्म्युडा ट्रँगल'वरून जहाजे किंवा विमाने गेली तर गायब होतात, हे कितपत खरे आहे?

3 उत्तरे
3 answers

असं ऐकलं आहे व पाहिलं आहे की 'बर्म्युडा ट्रँगल'वरून जहाजे किंवा विमाने गेली तर गायब होतात, हे कितपत खरे आहे?

29
बर्मुडा ट्रँगल ला (डेविल्स ट्रँगल) पण म्हणतात,हे प्रथमता कोलंबस ने सांगितले होता,
हा त्रिकोण बर्मुडा-फ्लोरिडा-पुरतो रिको या तीन जागा एकत्रित येऊन तयार झाला आहे
त्यांच्या म्हणण्यानुसार या ट्रँगलमध्ये प्रवेश केल्यास तेथे कोणतीही इलेक्ट्रॉनिक device काम करणे बंद करते,
या जागेविषयी भरपूर बोलले जाते, त्यामध्ये ५ सप्टेंबर १९४५ रोजी अमेरिकेचे ५ तारपिडो विमान अचानक गायब झाले ते आपले रुटीन ट्रेनिंग करण्यासाठी निघाले होते  ते त्या त्रिकोण मध्ये घुसले आणि गायब झाले,
आता पाहू याचा वैज्ञानिक दृष्टीकोण रसायनशास्त्राच्या माहिती नुसार त्या त्रिकोनांमध्ये मिथेन हायड्रेट जास्ती मात्रामध्ये आहे,
या मिथेन हायड्रेट चे स्फोट होतात व हा इतका भयानक असतो जे या एरिया मध्ये येईल त्याला आपल्यामध्ये सामावून घेते,
या स्फोटा मुळे आकाशा मधील विमान पण या मध्ये येऊ शकते, भरपूर लोकांनी या विषयी आपले मत मांडले आहे त्याच्या मते
तेथे इलेक्ट्रॉनिक फॉग तयार होतात,या नुसार तेथे हेक्सागॉन चे ढग तयार होतात, ज्याची शक्ती एका स्फोट प्रमाणे असते, याचा जोडीला शक्तीशाली हवा पण असते जेकी १७० मैले/तास इतक्या  वेगाने वाहते, यामुळे विमान आपापले नियंत्रण बिघडते, आणि या इलेक्ट्रॉनिक फॉग मुळे तेथे इलेक्ट्रॉनिक device काम करणे बंद करते, अश्या भरपूर गोष्टी आहेत जे या त्रिकोणा मध्ये घडल्या आहेत, खाली बरमुडा त्रिकोण याचा pic टाकला आहे
                       *****धन्यवाद*****

उत्तर लिहिले · 11/3/2018
कर्म · 12270
0
प्लोरिडा आणि बर्मूडा या भूभागाच्यामध्ये असणा-या कांहीशा त्रिकोणी सागरी प्रदेशाला बर्मूडा ट्रँगल असे म्हणतात. भूतांचा त्रिकोण किंवा हुडू सागर असेही भयंकर नांव या भागाला आहे. गेल्या सहा दशकात शेकडोंनी अपघात झालेल्या या बर्मूडा ट्रँगलच्या ५ विचित्र घटना.
१. 🕧कोलंबसचा खराब झालेली दिशा दर्शक :🕧
सन १४९२ मध्ये प्रसिध्द दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने भूतांच्या त्रिकोणातील (बर्मूडा ट्रँगल) आपल्या प्रवासाची नोंद डायरीमध्ये केली आहे. तो म्हणतो की या प्रदेशात कांही गूढ मॅग्नेटीक ओढ आहे. बोटीवरील दिशादर्शक यंत्रे विचित्रपणे वागू लागली आहेत. आणि हो, एक आगीचा लोळ देखील नुकताच समुद्रात पडलेला खलाशांनी पाहिला आहे. http://bit.ly/321Rt6a

२. ⛴शांत, गूढ एकही मनुष्य नसलेले ‘सेलेस्टे’ जहाज🚢 :
सन १८७२ आणखी एक भयंकर चक्रावणारीघटना समोर आली. नोव्हेंबर ७, जिनीव्हाला जाण्यासाठी ‘मेरी सेलेस्टा’ हे जहाज प्रवासी व खलाशीघेवून निघाले, एक महिन्यांनी बर्मुडा ट्रँगलमध्ये ‘मेरी सेलेस्टा’ इतर जहाजांना दिसली, परंतू एकाही मनुष्याविना. संपूर्ण जहाज त्यावरील साहित्य, मौल्यवान वस्तू अगदी जशाच्या तश्या होत्या. त्या शांत जहाजाला समुद्रात कमी होती ती फक्त मनुष्यांची.सर्वजण अगदी सागरात जणू दडून बसले होते..
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖_*
३. ✈प्लाईट १९ विमानांचे अचानक नाहिसे होणे :✈
५ डिसेंबर १९४५ ला बर्मूडा ट्रँगलने एकाच वेळी पांच विमानांना गिळंकृत केले. रुटीन ट्रेनिंगला निघालेली तज्ञ पायलटची टीम असणारी पाच ऍव्हेंजर जातीची विमाने दुदैवाने परत येऊ शकली नाहीत. पायलटांचा प्रमुख चार्लस् टेलर, ज्याला त्या भागाची पूर्ण माहिती होती त्याने दिलेला शेवटचा संदेश फारच भयावह होता. तो म्हणतो, ‘सर्व कांही चुकलेले, वेगळे वाटत आहे. समुद्रसूध्दा नेहमीसारखा नाही. अगदी वेगळा,’ पांच विमानांचे अदृश्य होणे कमी होते की काय कारण या विमानांना शोधण्यास गेलेल्या मार्टीन मरीनरया मोठया विमानाचा देखील २३ मिनिटांनी स्फोट झाला. आज अखेर त्या पाच विमानांचा शोध लागलेला नाही.
४.⛴ नाहीशी झालेली १२,००० टनी यू.एस.एस. सायक्लोप्स🚢 :
बर्मूडा ट्रँगलने घेतलेला हा १२,००० टनी घास. सुमारे ५२२ फूटांची प्रचंड ‘सायक्लोप्स’ नांवाची अमेरिकन नौदलाची ही बोट. ८ जानेवारी १९१८ ला १०,००० टन माल व३०१ सैनिक घेवून बाल्टीमोरला जाणरी ही बोट अचानक बर्मूडा ट्रँगलला वळल्याची नोंद झाली. खरेतर हे सारे प्लॅन प्रमाणे नव्हते.कारण बर्मूडा ट्रँगल प्रवासातील मार्गात येतच नव्हते. १३ मार्चला जेंव्हा ही प्रचंड बोटकांहीच संदेश देईना तेंव्हा सा-या अमेरिकेने आपली सर्व सैनिकी ताकद लावून शोधमोहिम राबविली, परंतु तोपर्यंत १२,००० टनी घास घेवून बर्मूडा गुपचूप बसला होता.
______________________________
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖_*  
*✆ ░9░8░9░0░8░7░5░4░9░8░*
______________________________
0

बर्म्युडा ट्रँगल विषयी समज आणि वास्तव:

बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle), ज्याला 'डेव्हिल्स ट्रँगल' (Devil's Triangle) म्हणूनही ओळखले जाते, हा उत्तर अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. या भागात अनेक जहाजे आणि विमाने रहस्यमयरीत्या गायब झाल्याच्या कथा आहेत.

दाव्यांमधील सत्यता:

  • अतिशयोक्ती: बर्म्युडा ट्रँगल विषयी अनेक दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत. अनेक घटनांचे रहस्य उलगडलेले नाही, परंतु त्यामागे नैसर्गिक कारणे असण्याची शक्यता आहे.
  • नैसर्गिक कारणे: या भागात खालील नैसर्गिक कारणे घडू शकतात:
  • वादळे आणि समुद्री प्रवाह: बर्म्युडा ट्रँगलमध्ये अचानक येणारी वादळे आणि ശക്ത समुद्री प्रवाहामुळे जहाजे भरकटू शकतात.
  • मिथेन वायू: समुद्राच्या तळाशी मिथेन वायूचे मोठे साठे आहेत. हे वायू अचानक बाहेर आल्यास पाण्याची घनता कमी होते आणि जहाजे बुडू शकतात.
  • चुंबकीय क्षेत्र: या भागातील चुंबकीय क्षेत्र compass reading मध्ये बदल घडवू शकते, ज्यामुळे नेव्हिगेशनमध्ये समस्या येतात.

संशोधन आणि निष्कर्ष:

  • US Navy: अमेरिकन नौदलाने (US Navy) बर्म्युडा ट्रँगलला धोकादायक भाग मानण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मते, या भागात जहाजे गायब होण्याची शक्यता इतर भागांपेक्षा जास्त नाही. US Navy FAQ about Bermuda Triangle
  • NOAA: नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन (NOAA) नुसार, बर्म्युडा ट्रँगल हे नाविन्यपूर्ण किंवा रहस्यमय घटनांचे क्षेत्र नाही. जगात इतरत्र जेवढ्या दुर्घटना घडतात, तेवढ्याच इथेही घडतात. NOAA explains Bermuda Triangle

निष्कर्ष:

बर्म्युडा ट्रँगल एक रहस्यमय आणि धोकादायक क्षेत्र आहे या दाव्याला ठोस वैज्ञानिक आधार नाही. जहाजे आणि विमाने गायब होण्यामागे नैसर्गिक कारणे असण्याची शक्यता जास्त आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

वाकळ घालून पोकळ केलं दार लावून दणके दिले?
मुंबईत भुताटकी कोठे आहे?
एका रात्री बारा वाजता साक्षात्कार झाला . तो धुरंधर कोण ? साक्षात्कार होते वेळी त्याच्या अंगावर वाळवी लागली होती त्याचे कारण काय?
बर्म्युडा त्रिकोणात विमाने कोसळणे, बोटी बुडणे, घड्याळे थांबणे इत्यादी घटनांमागील विज्ञान काय आहे? या रहस्यमय घटनांमागे कोणती प्रेरक शक्ती काम करत असावी? तिथे परकीय जीवांचा हस्तक्षेप होतो का?
भीमकुंडाचे रहस्य काय आहेत?
काळी जादू कशी करतात?
इल्युमिनाटी बद्दल तुम्हाला काही संपूर्ण माहिती असेल तर सांगा?