2 उत्तरे
2
answers
वडाच्या झाडाला आयुष्य किती असते?
2
Answer link
भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजरातमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवपूर बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. शिवपूर वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड एकर परिसरात पसरलेला आहे.
0
Answer link
वडाच्या झाडाला खूप जास्त आयुष्य असते.
सामान्यतः वडाचे झाड 900 वर्षांपेक्षा जास्त जगू शकते.
काही वडाची झाडे तर 3000 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत.
भारतामध्ये काही ठिकाणी खूप मोठी वडाची झाडे आहेत, जी अनेक शतकांपासून उभी आहेत.
अधिक माहितीसाठी हे पहा: