2 उत्तरे
2
answers
खडकाचे थोडक्यात प्रकार लिहा?
1
Answer link
खडकांचे उत्पत्तीनुसार वर्गीकरण :
१. अग्निजन्य खडक : पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वी वायूरूपात होती. त्यानंतर तिचे रूपांतर तप्त अशा द्रवरूपात झाले. कालांतराने पृथ्वीचे कवच थंड होऊन जे कठीण खडक तयार झाले, त्यांना ‘अग्निजन्य खडक’ असे म्हणतात.
२. जलजन्य किंवा स्तरीत किंवा गाळाचे खडक : भूपृष्ठाचे अनाच्छादन (झीज) घडवून आणणाऱ्या कारकांच्या रासायनिक व भौतिक क्रियांनी आधीच अस्तित्वात असलेल्या खडकांच्या अपघटनाने (रासायनिक दृष्ट्या घटक अलग झाल्याने) किंवा विघटनाने (तुकडे झाल्याने) तयार झालेला चुरा म्हणजे गाळ सामान्य तापमानाच्या व दाबाच्या परिस्थितीत निक्षेपित होऊन (साचून) तयार झालेल्या खडकांना गाळाचे किंवा अवसादी खडक म्हणतात.
३. रूपांतरित खडक : अग्निज व गाळाचे हे दोन्ही प्रकारचे खडक भूकवचाच्या हालचालींनी खोलवर दडपले जातात; काही जागी त्यांच्यात शिलारसाचे अंतर्वेशन (घुसण्याची क्रिया) होऊन ते तापवले जातात. मूळच्या खडकांवर अशा प्रकारे दाब व उष्णता यांचा वेगवेगळा किंवा एकत्रित परिणाम होऊन त्यांच्या खनिज संघटनात व संरचनांमध्ये बदल होतो आणि त्यांचे रूप पालटते. मूळचे रूप अंशतः किंवा समूळ पालटलेल्या अशा खडकांना रूपांतरित खडक म्हणतात.
अधिक माहिती

0
Answer link
khadkanche thodkyat prakar खालील प्रमाणे:
खडकांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
- अग्निजन्य खडक (Igneous Rocks):
- गाळाचे खडक (Sedimentary Rocks):
- रूपांतरित खडक (Metamorphic Rocks):
हे खडक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लाव्हा रसाच्या घनीभवनामुळे तयार होतात. उदा. ग्रॅनाईट, बेसॉल्ट.
हे खडक नदी, वारा, हिमनदी इत्यादींमुळे तयार झालेल्या गाळाच्या संचयनाने व घट्ट होण्याने बनतात. उदा. वाळूचा खडक, चुनखडी.
अग्निजन्य आणि गाळाच्या खडकांवर दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन त्यांचे स्वरूप बदलते आणि रूपांतरित खडक तयार होतात. उदा. संगमरवर, स्लेट.