प्रवास तालुका भूगर्भशास्त्र खडक

तरंगणारा दगड कोकणात सापडला त्याची माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

तरंगणारा दगड कोकणात सापडला त्याची माहिती द्या?

3
* आचरा : येथे सापडला तरंगणारा दगड
---------------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव --------------------------------------
श्रीलंकेत रामसेतु बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला,त्या प्रकारातील दगड
------------------------------------
दि. १० आॅगष्ट २०२०
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/08/blog-post_98.html
मालवण तालुक्यातील आचरा गावच्या समुद्र किनाऱयावर चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडला आहे. किनाऱयावर सकाळी फिरण्यासाठी गेलेले स्थानिक मच्छीमार नारायण कुबल यांना पाण्यात तरंगणारा हा दगड सापडला आहे. किनाऱयालगतच्या पाण्यात हा दगड तरंगत किनाऱयावर येताना कुबल यांना आढळला. कुतूहलाने सापडलेला दगड कुबल यांनी आपल्या घरी आणला.
सापडलेला दगड हा सुमारे 5 किलो वजनाचा आणि 1 फूट लांबीचा असा चौरस आकाराचा आहे. समुद्र किनारी फिरताना सापडलेल्या दगडाला माती, शेवाळ लागलेला होता. सापडलेला दगड कुबल यांनी स्वच्छ करून पुन्हा पाण्यात टाकला असता दगड पाण्यावर तरंगू लागला. या दगडाचे वजन अंदाजित 5 किलोपर्यंत असले तरी हा दगड पाण्यात टाकला की एखादे प्लास्टिक किंवा थर्माकोल जसे हलके असते तसे त्याचे वजन होते व तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागतो.एखादे प्लास्टिक किंवा थर्माकोलप्रमाणे तो पाण्याच्या प्रवाहात तरंगत वाहू लागतो.
या दगडाबाबत कुबल यांनी इंटरनेटवर सर्च केले असता, श्रीलंकेत रामसेतु बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला, तो दगड याच प्रकारातला असल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचे दगड दक्षिण भारतासोबतच श्रीलंका आणि जपान या भागातही आढळत असल्याचे त्यांना नेटच्या माध्यमातून समजले.
आचरा येथे सापडलेला दगड हा प्युमायस स्टोन (pumice stone) असून ज्यावेळी पाणी आणि लाव्हारस एकत्र येतात, तेव्हा असे दगड तयार होतात. त्याला प्युमायस स्टोन (pumice stone) असे म्हणतात. दगड तयार होताना त्यामध्ये हवा अडकलेली असते. ज्यावेळी तापमान वाढलेले असते, त्यावेळी दगडातील हवा प्रसरण पावते. त्याने हे दगड पाण्यात तरंगतात, अशी माहिती अभ्यासक नागेश दफ्तरदार यांनी दिली.
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/08/blog-post_98.html

0

तरंगणारा दगड कोकणात सापडला याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

≈ काही वर्षांपूर्वी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात दावा करण्यात आला होता की कोकणात तरंगणारा दगड सापडला आहे.
≈ वास्तविक, हे दगड 'प्युमिस' (Pumice) नावाचे ज्वालामुखी खडक आहेत. हे खडक ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होतात आणि ते अत्यंत सच्छिद्र असल्यामुळे पाण्यावर तरंगू शकतात.

प्युमिस दगडाची वैशिष्ट्ये:

  • हे दिसायला हलके आणि खडबडीत असतात.
  • ते पाण्यात तरंगू शकतात कारण त्यांच्यामध्ये वायू भरलेले अनेक छोटे छिद्र असतात.
  • प्युमिसचा वापर अनेकदा सौंदर्य उत्पादने आणि औद्योगिक कामांमध्ये केला जातो.

निष्कर्ष:

कोकणात सापडलेले तरंगणारे दगड हे प्युमिस प्रकारचे खडक असण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स:


उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

जमीन म्हणजे काय?
स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात चूक की बरोबर?
कोणत्या खडकांचा इंधन म्हणून वापर केला जातो?
स्त्री समुद्र तोय प्रतिवाहन म्हणजे काय ते स्पष्ट लिहा?
काही विदारण म्हणजे काय?
जमिनीचे प्रकार कोणते?
खडाची निर्मिती कोणत्या थरापासून होते?