2 उत्तरे
2
answers
मुख्यमंत्र्यांची कार्ये सांगा?
5
Answer link
मुख्यमंत्र्यांचे अधिकार व कार्ये
०१. राज्यपालांना शिफारस करून मंत्र्यांची नियुक्ती करणे, मंत्र्यांमध्ये खातेवाटप व खात्यांची पुनर्रचना करणे, मंत्रीमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवणे आणि तिच्या निर्णयावर प्रभाव टाकणे, सर्व मंत्र्यांच्या कार्यामध्ये मार्गदर्शन व सूचना तसेच नियंत्रण व समन्वयन साधणे.
०२. एखाद्या मंत्र्याशी मतभेद झाल्यास त्याला राजीनामा देण्यास सांगणे किंवा त्याला बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपालकडे करणे.
०३. राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालाची नेमणूक करतात. मुख्यमंत्री राज्यपाल व मंत्रीमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात.
०४. आपल्या पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करणे. मुख्यमंत्र्याच्या म्राजीनाम्यामुळे किंवा मृत्यूमुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते. याउलट इतर मंत्र्याचा राजीनामा किंवा मृत्यू यामुळे केवळ त्याचे पद रिक्त होते, जे मुख्यमंत्री दुसऱ्या व्यक्तीची निवड करून भरू शकतात.
०५. राज्याचा महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य लोकसेवा अध्यक्ष व इतर सदस्य यांच्या नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला देतात.
०६. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलावणे व तहकूब करणे, कोणत्याही क्षणी विधानसभा बरखास्त करणे याबाबत मुख्यमंत्री राज्यपालाकडे शिफारस करतात.
०७. सभागृहाच्या पटलावर शासनाची धोरणे निश्चित करतात.
०८. राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष, विभागीय परिषदांचे उपाध्यक्ष, आंतरराज्य परिषद तसेच राष्ट्रीय विकास परिषद यांचा सदस्य, राज्य शासनाचा मुख्य प्रवक्ता हि पदे मुख्यमंत्री भूषवतात.
०९. सर्व शासकीय सेवांचे मुख्यमंत्री राजकीय प्रमुख असतात. तसेच ते आणीबाणीच्या प्रसंगी व संकट काळात प्रमुख आपत्ती व्यवस्थापक असतात.
१०. राज्याचा प्रमुख या नात्याने समाजातील अनेक घटकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारणे.
११. मुख्यमंत्री विधानसभेत सरकारी धोरणांची घोषणा करतात. विधानसभेत चालणाऱ्या चर्चेत योग्य वेळी हस्तक्षेप करून शासनाची बाजू त्यांना मांडतात येते.
मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये (कलम १६७)
०१. राज्याचे प्रशासन आणि विधेयकांचे प्रस्ताव या संदर्भातील मंत्रीमंडळाचे सर्व निर्णय व विधीविधानाचे सर्व प्रस्ताव राज्यपालाना कळविणे.
०२. राज्यपालाने विचारणा, आवाहन केल्यास राज्याचे प्रशासन आणि विधेयाकांचे प्रस्ताव याबाबतची माहिती राज्यपालाला देणे.
०३. एखाद्या मंत्र्याने एखाद्या विषयाबाबत निर्णय घेतलेला असेल पण मंत्रिमंडळाने तो विषय विचारार्थ घेतलेला नसेल तर राज्यपालाला आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री तो विषय मंत्रीमंडळाच्या विचारार्थ ठेवतात.

0
Answer link
मुख्यमंत्र्यांची कार्ये:
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि त्यांची कार्ये खालीलप्रमाणे आहेत:
- राज्याचा कारभार चालवणे: मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख असतात. राज्याचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी ते धोरणे ठरवतात आणि निर्णय घेतात.
- मंत्रिमंडळाचे नेतृत्व: मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. ते मंत्र्यांची निवड करतात आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवतात.
- विधानसभेचे नेतृत्व: मुख्यमंत्री विधानसभेचे नेते असतात. ते विधानसभेमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करतात आणि धोरणे मांडतात.
- राज्यपाल आणि सरकार यांच्यातील दुवा: मुख्यमंत्री हे राज्यपाल आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. ते राज्यपालांना सरकार करत असलेल्या कामांची माहिती देतात.
- आपत्कालीन परिस्थितीत नेतृत्व: नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात आणि लोकांना मदत करतात.
- राज्याच्या विकासासाठी योजना: मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी विविध योजना तयार करतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात.
- सामाजिक न्याय: मुख्यमंत्री समाजातील गरीब आणि दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करतात.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: