2 उत्तरे
2 answers

भूसंपादन म्हणजे काय?

3
भू म्हणजे जमिन व संपादन करणे/ग्रहण करणे म्हणजे ताब्यात घेणे.भूसंपादन म्हणजे जमिन ताब्यात घेणे/जमिन ग्रहण करणे.
जर एकाद्या शासकिय प्रकल्पासाठी/जनतेच्या  भल्यासाठी होणाऱ्या प्रकल्पासाठी जागेची म्हणजे जमिनीची गरज भासली तर किंवा असा प्रकल्प मनुष्य वस्तीतून जात असेल तर तेथे रहाणारी माणसे, दुकानदार आपली जागा जाईल, आपले नुकसान होईल अशा कारणांसाठी प्रकल्पाला विरोध करतात, शासनाला आपली जागा प्रकल्पासाठी देत नाहीत.अशावेळी या सगळ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना रहाण्याच्या, दुकानाच्या जागेच्या बदल्यात पर्यायी जाग तसेचनुकसान भरपाईची म्हणून काही रक्कम देऊ करतात.अर्थात या सर्वाचा निर्णय दोघांमधील अधिक्रुत बोलण्यानंतर लेखीने कागदपत्र बनवून घेतला जातो.दरम्यान याला खूप काळ लागला तर प्रकल्पाची किंमत आधिच्या गणितापेक्षा कित्येक पटिने वाढू शकतो.याचे एक उदाहरण म्हणजे "मेट्रो प्रकल्प" जो काही ठिकाणी दोघांच्या चर्चेनंतर, समजोत्यानंतर सुरदेखील झाला आहोत. तर काही ठिकाणी दोघांमधे असा समजोता यशस्वी होत नसल्याने अजूनही रेंगाळत राहिला आहे.
उत्तर लिहिले · 28/1/2019
कर्म · 91065
0

भूसंपादन म्हणजे सार्वजनिक कामांसाठी किंवा इतर शासकीय योजनांसाठी खाजगी मालकीची जमीन सरकारद्वारे कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेणे.

या प्रक्रियेत खालील गोष्टींचा समावेश असतो:

  • जमिनीची निवड
  • जमीन मालकांना नोटीस देणे
  • नुकसान भरपाई निश्चित करणे
  • जमीन सरकारकडे हस्तांतरित करणे

भूसंपादन कायदा, 2013 नुसार, सरकारला विकास कामांसाठी खाजगी जमीन मालकांकडून जमीन घेण्याचा अधिकार आहे. यामध्ये, जमीन मालकांना योग्य भरपाई दिली जाते आणि त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1240

Related Questions

सहकारी चळवळीला कोणकोणत्या विविध क्षेत्रांतून यश मिळाले ते लिहा?
व्यावसायिक गतिशीलता ही संकल्पना उदाहरणासह विशद करा.
शेतमजुरांच्या जीवनात असुरक्षितता का निर्माण होते?
आधुनिक काळातील बेरोजगाराची कारणे सांगा?
किमान वेतन कायद्याच्या अंमलबजावणीची स्थिती कशी आहे?
रोहयोच्या संयुक्त मूल्यांकन अहवालावर माहिती लिहा?
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय होते? या कार्यक्रमात कोणकोणत्या तरतुदी होत्या?