मला व्हीएनआर जातीची पेरू लागवड करायची आहे, तरी पण मला रोपांची खरेदी, लागवडीबद्दल संपूर्ण माहिती, जमिनीची मशागत याविषयी माहिती हवी आहे?
मला व्हीएनआर जातीची पेरू लागवड करायची आहे, तरी पण मला रोपांची खरेदी, लागवडीबद्दल संपूर्ण माहिती, जमिनीची मशागत याविषयी माहिती हवी आहे?
खत : लागवडीनंतर लहान झाडांची जोमाने वाढ करण्याच्या हेतूने पहिले ४ वर्षे फळे घेण्यास सुरुवात करेपर्यंत द्यावीत. त्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे.
१) एक वर्षाच्या झाडास ५ ते ६ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.
२) दुसऱ्या वर्षी झाडास १० ते १२ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.
२) दुसऱ्या वर्षी झाडास १० ते १२ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.
३) तिसऱ्या वर्षी १५ ते १८ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि ७५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.
४) चौथ्या वर्षी २० ते २५ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.
५) पाचव्या वर्षी तसेच त्यापुढील प्रत्येक वर्षी २५ ते ३० किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि १ ते १.५ किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे.
वरील खते वापरताना ती खोडाभोवती बांगडी पद्धती ने गाडून द्यावीत. खत दिल्यानंतर बागेस पाणी द्यावे.
पाणी - पेरूची झाडे लहान असताना पाण्याच्या पाळीतील अंतर कमी ठेवावे. पाण्याच्या पाळीतील अंतर वाढल्यास एकदम जादा पाणी देण्यापेक्षा अंतर कमी ठेवून बेताने पाणी द्यावे. दिलेल्या पाण्याचा झाडांना योग्य उपयोग व्हावा. याकरीता खोडाभोवती आळी किंवा वाफे बांधून घ्यावेत. वाफ्यात किंवा आळ्यात दिलेले पाणी खोडाला लागू नये म्हणून खोडाभोवती मातीचा उंचवटा करावा. बागेस उन्हाळ्यामध्ये १० ते १५ दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे. याप्रमाणे माल चालू होईपर्यंत ४ वर्षापर्यंत पाणी द्यावे. बहार धरल्यानंतर फुले निघाल्यापासून फळे तयार होईपर्यंत आणि विशेषत: फळे पोसण्याच्या काळामध्ये बागेस पाणी वेळेवर नियमित द्यावे. फळांची काढणी झाल्यानंतर दुसऱ्या बहाराची फुले लागेपर्यंत गरजेपुरतेच पाणी द्यावे.
नवीन बागेची निरोगी, लवकर, जोमदार वाढ होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.
१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ दिवसांनी ) :जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर १ ते १॥ महिन्यांनी ) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.
नंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी वरील प्रमाणात पहिली फवारणी जून - जुलैच्या दरम्यान आणि दुसरी फवारणी ऑगस्ट - सप्टेंबरच्या दरम्यान करावी, म्हणूजे तीन वर्षानंतर बहार धरता येईल.
बहार धरणे - पेरूला वर्षातून ३ वेळा बहार येतो. बहाराची फुले जून, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात येतात. जूनमध्ये फुले येणार्या बहाराला मृग बहार तर जानेवारी महिन्यात फुले येणाऱ्या बहाराला आंबेबहार म्हणतात.
स्थानिक परिस्थिती आणि मार्केटचा अभ्यास करून वर्षातून एकच बहार घेतल्याने उत्पादन अधिक चांगल्या प्रतिचे मिळते. तसेच पाणी तोडणे, पाणी देणे, मशागत करणे रोगराईचा बंदोबस्त करणे इ. गोष्टी सुलभतेने करता येतात. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला असता 'मृग बहार' धरणे किफायतीशीर ठरते. मृग बहाराची फळे धरण्यासाठी बागेस फेब्रुवारी ते मे मध्ये ताण द्यावा. फेब्रुवारी ते मे उन्हाळाच असल्याने बागेस ताण देणे सोपे होते. मृग बहाराची फळे हिवाळ्यात तयार होतात. त्यामुळे फळमाशीचा उपद्रव कमी होतो. तसेच फळे चांगल्या प्रतीची मिळतात.
भारी जमिनीत ४० ते ६० दिवसांचा ताण द्यावा. हलक्या जमिनीस ३० ते ३५ दिवसांचा ताण द्यावा. पाणी तोडल्यामुळे झाडाची वाढ थांबते व पाणगळ होते. त्यामुळे झाडांना संपूर्ण विश्रांती मिळून झाडांमध्ये अन्नद्रव्याची साठवण होते आणि ह्या अन्नद्रव्याचा पुढे पाणी दिल्यानंतर फुलोरा तयार होण्यास चांगला फायदा होतो. अर्धवट पानगळ झाल्यानंतर बागेतील जमिनीची मशागत करण्याकरीता हलकीशी खाणणी किंवा नांगरणी करावी. भारी जमिनीत पानांची गळ लवकर होत नाही. म्हणून खोल नांगरणी करावी. बागेतील तण पुर्णपणे काढून जमीन भुसभुशीत करावी.
ताण देताना काळजीपुर्वक द्यावा, जर जास्त ताण दिल्यास पानगळ अधिक होऊन फुले धरणाऱ्या काड्यांची मर होते व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मे महिन्यात खत देऊन खोडाभोवती मातीची हुंडी करून आळी किंवा वाफे बांधणी करावी.
छाटणी (झाडांना आकार देणे) - झाड लहान असल्यापासून त्याला वळण देणे गरजेचे असते. सुरुवातीला मुख्य खोडावरच झाडाची वाढ करून घ्यावी. त्यासाठी १ ते १।। फुटापर्यंत होणारी फूट काढून टाकावी. त्यानंतर झाडाचा गोलाकार घेर होईल अशा पद्धतीने ३ ते ४ फांद्या वाढवाव्यात. किडलेल्या किंवा वाळलेल्या फांद्या छाटाव्यात. तसेच गर्दी करणाऱ्या फांद्या आणि जमिनी लगतची फूट काढावी. जुन्या झाडांची छाटणी केल्यानंतर त्याच्यावर नवीन फूट येते व त्यामुळे त्यांना नवजीवन मिळते.
पेरूच्या झाडाला नवीन फुटीवर फुले व फळे येतात. या नवीन फुटी येण्यासाठी छाटणी करणे आवश्यक आहे. झाडांची छाटणी एप्रिल - मे महिन्यात करावी. झाडांची जास्त छाटणी केली तर उत्पादन कमी येते. मात्र फळांचा आकार, वजन व फळाची प्रत चांगली मिळते.
- Enter your code here
- Vnr पेरूची लागवड सघन पद्धतीने 8*10 फुटा वरती करन योग्य आहे या नुसार 510रोपे एकरी बसतात जमिनीची निवड करताना हलक्या मुरमाड जमिनीपासून काळ्या कसदार जमिनीत पण vnr पेरूची उत्तम वाढ होते परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. मी स्वतः गेले 4 वर्ष vnr पेरूच उत्पन्न घेतोय इतर पेरूच्या तुलनेत या पेरूची टिकाऊ शमता चांगली असल्याने निर्यात होणारी पेरूची जात आहे. व इतर पेरूच्या तुलनेत बाजार भाव पण चांगले मिळतात . मी स्वतच्या बागेत गेली 3 वर्ष फळ बहार घेऊन रोपे तयार करतो खात्रीशीर रोपे 90 रुपये या दराने खात्रीशीर मिळतिल संपर्क क्रमांक 7588212631. 9284653921
व्हीएनआर (VNR) पेरू लागवड
तुम्ही व्हीएनआर जातीच्या पेरूची लागवड करू इच्छित आहात, हे ऐकून आनंद झाला. या जातीच्या लागवडी विषयी माहिती खालीलप्रमाणे:
रोपांची खरेदी:
-
अधिकृत रोपवाटिका: व्हीएनआर जातीची रोपे खरेदी करताना ती अधिकृत रोपवाटिकांमधूनच खरेदी करा. यामुळे तुम्हाला खात्रीशीर आणि दर्जेदार रोपे मिळतील.
-
रोपांची निवड: रोपे निवडताना ती सशक्त, निरोगी आणि रोगमुक्त असावीत. तसेच, रोपांची उंची योग्य असावी.
-
खरेदीची वेळ: रोपांची खरेदी शक्यतोवर लागवडीच्या वेळेनुसार करावी, जेणेकरून ती जास्त दिवस रोपवाटिकेत ठेवण्याची गरज पडणार नाही.
लागवडी विषयी माहिती:
-
लागवडीचा हंगाम: पेरूची लागवड साधारणतः जून-जुलै किंवा फेब्रुवारी-मार्चमध्ये करावी.
-
जमीन: पेरूची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येते, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी उत्तम असते.
-
लागवड अंतर: व्हीएनआर पेरूची लागवड करताना दोन रोपांमधील अंतर 5 x 5 मीटर ठेवावे.
-
खड्डे खोदणे: लागवडीपूर्वी 60 x 60 x 60 सेंमी आकाराचे खड्डे खोदावेत.
-
खत व्यवस्थापन: खड्ड्यांमध्ये शेणखत, सुपरफॉस्फेट आणि पोटॅश मातीमध्ये मिसळून टाकावे.
-
रोपे लावण्याची पद्धत: रोपे खड्ड्याच्या मध्यभागी लावावी आणि मातीने खड्डा व्यवस्थित भरावा. लागवड झाल्यावर रोपांना पाणी द्यावे.
जमिनीची मशागत:
-
पूर्व मशागत: लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. जमिनीतील ढेकळे फोडून जमीन सपाट करावी.
-
नांगरणी: जमिनीची नांगरणी करून घ्यावी, ज्यामुळे माती भुसभुशीत होईल.
-
खत: जमिनीमध्ये पुरेसे शेणखत टाकावे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल.
-
पाणी व्यवस्थापन: लागवडीनंतर नियमितपणे पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा.
अधिक माहितीसाठी: तुम्ही कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा कृषी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
आशा आहे, ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.