2 उत्तरे
2
answers
प्रकल्पग्रस्त नवीन शासन निर्णय काय आहे?
1
Answer link
1999पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा ⭕*_
*_राज्यातील प्रकल्पग्रस्तांना 1999पूर्वी दिलेल्या वनजमिनी त्यांच्या नावावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला. त्याचा फायदा राज्यातील असंख्य प्रकल्पग्रस्तांना होईल. त्याचबरोबर 2000पूर्वी प्रकल्पग्रस्तांपासून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिलेल्या वनखात्याच्या जमिनी या बिगर वनजमिनी करण्याच्या योजनेला राज्य सरकारने मान्यता दिली आहे._*
*राज्यात 1999 मध्ये पुनर्वसन कायदा झाला. त्यामुळे एखादा प्रकल्प उभारताना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जागा दिली जाते. प्रकल्पग्रस्तांना या जमिनी वापरता येतात पण विकता येत नाहीत. प्रकल्पबाधित म्हणून दिलेली जमीन विकायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घेऊन रेडीरेकनरच्या 50 टक्के शुल्क भरावे लागते आणि परवानगी न घेता विकली तर सरकारला 75 टक्के शुल्क भरावे लागते._* वर्ग दोन प्रकारातील या जमिनी विकता येत नाहीत पण या वर्ग एकमध्ये हस्तांतरित केल्यास विकता येतात. त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्तांना जागा विकता येत नव्हत्या. मात्र राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 1999पूर्वी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या वर्ग दोन वर्गातील जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याचा म्हणजे त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे.
*🔆 बिगर वनजमिनी*
राज्यात 2000पूर्वी वनखात्याच्या अनेक जमिनी महसूल विभागाला देण्यात आल्या होत्या. या जमिनी लष्करातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना तसेच इतरांना देण्यात आल्या होत्या, पण या जमिनींवर वनखात्याच्या शिक्का होता. मात्र या जमिनींवरील वनखात्याचा शिक्का पुसण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेआपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, त्यामुळे या जमिनी आता बिगर वनजमिनी होतील. मात्र त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागेल. त्यासाठी राज्यातील अशा जमिनींची माहिती जिल्हाधिकाऱयांकडून मागवण्यात आली आहे. या सर्व जमिनींचा एकत्रित प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

0
Answer link
मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या Project Affected Persons (PAP) संबंधित नवीन शासन निर्णयांबद्दल माहिती देऊ शकेन.
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१६/२०२३/१६-अ, दिनांक: १६ ऑक्टोबर २०२३ नुसार प्रकल्पग्रस्तांना शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
- या शासन निर्णयानुसार, प्रकल्पग्रस्तांना गट-क व गट-ड संवर्गातील पदांसाठी अर्ज करताना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.
- तसेच, त्यांना परीक्षा शुल्क भरण्यामध्ये सुद्धा सवलत दिली जाईल.
- याव्यतिरिक्त, प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित असलेल्या पदांसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल.
हे फायदे मिळवण्यासाठी काही पात्रता निकष आहेत:
- अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
- अर्जदार किंवा त्याचे कुटुंब प्रकल्पामुळे विस्थापित झालेले असावे.
- अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
टीप:
- शासन निर्णय वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अद्ययावत नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी, तुम्ही सामान्य प्रशासन विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
हे काही महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला अधिक तपशील हवा असल्यास, तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत शासन निर्णय वाचू शकता.