2 उत्तरे
2 answers

गावाचा सरपंच कसा असावा निबंध लिहा?

4
सरपंच म्हणजे कुठल्याही गावाचा मानबिंदू.  गाव म्हणजे एक रथ आणि सरपंच जणू काही त्या रथाचा सारथी! प्रत्येक गावाचे राजकारण असो नाही तर समाजकारण असो त्याची सुरुवात आणि शेवट हा ज्या व्यक्तीच्या पाशी होतो ती व्यक्ती म्हणजे सरपंच. प्रगत गावांमध्ये तर लाखो रुपये खर्च केले जातात सरपंच बनायला पण तो कसा असावा ह्याचा विचार आपण काही केला आहे का ? नसेल तर तो नक्कीच केला पाहिजे 
असा असावा सरपंच 

➡ समाजसेवेची आवड असणारा असावा.
➡ विकास हेच ध्येय मानणारा असावा .
➡ सर्व समाज समभाव मानणारा असावा.
➡ प्रत्येक कार्यक्रमात मीच झेंडा वंदन करणार असे म्हणणारा नसावा.
➡ ग्रामसेवकाचा पाठिराखा असावा.
➡ घरकूल,गोठा,शोषखड्डा,फळबाग, शेततळी,सिंचन विहिर,शिलाई मशिन दुधाळ जनावरे, कुक्कूट पालन अशा अनेक योजनांचे आमीष दाखवून लोकांकडून शे-पाचशे रूपये उकळणारा नसावा.
➡ रोज एका युवकाला पार्टी देऊन व्यसनाला लावणारा नसावा.
➡ तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात दबदबा असलेला असावा.
➡ पक्षपात करणारा नसावा.
➡ विरोधकांना सामावून घेणारा असावा.
➡ शासकीय योजना लोकार्पण करणारा असावा.
➡ शासकीय विविध योजना आणणारा असावा...
➡ आयत्या पिठावर रेगोट्या ओढणारा नसावा.
➡ स्वतःच्या कानाचा असावा.
➡ दुस-याच्या कामाचे श्रेय स्वत: न घेणारा नसावा.
➡ गावच्या विकासाचे ठराव विनाविलंब करणारा नसावा.
➡ अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा असावा.
➡ प्रकरणाचे भांडवल करून दिशाभुल करणारा नसावा.
➡ शासकीय कामांची ठेकेदारी न करता दर्जा राखणारा असावा.
➡ सभापती,जि.प.सदस्य,आमदार,खासदार यांच्या सतत संपर्कात राहणारा असावा.
➡ एकदा पाच वर्षे सरपंचपद भोगून पुन्हा मीच सरपंच होणार म्हणणारा नसावा.
➡ युवकांन/महिलांना संधी देणारा असावा.
➡ शेवटी काय सुशिक्षित व सक्षम असावा.

उत्तर लिहिले · 5/1/2019
कर्म · 34255
0

गावाचा सरपंच कसा असावा यावर निबंध:

सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असतो. तो गावचा नेता असतो. त्यामुळे तो कसा असावा याबद्दल काही विचार खालीलप्रमाणे:

1. शिक्षण आणि ज्ञान:

  • सरपंच किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • त्याला शासकीय योजनांची आणि कायद्यांची माहिती असावी.

2. चारित्र्य:

  • सरपंच हा प्रामाणिक, विश्वासू आणि निस्वार्थी असावा.
  • त्याचे चारित्र्य चांगले असावे.
  • तो कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा.

3. नेतृत्व क्षमता:

  • सरपंचाकडे लोकांना एकत्र आणण्याची आणि त्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता असावी.
  • त्याच्यात निर्णय घेण्याची क्षमता असावी.
  • तो आपल्या गावकऱ्यांच्या समस्या व अडचणी समजून घेणारा असावा.

4. विकास दृष्टी:

  • सरपंचाला आपल्या गावाला विकासाच्या मार्गावर न्यायची दृष्टी असावी.
  • गावामध्ये नवीन योजना आणण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची क्षमता त्याच्यात असावी.

5. संवाद कौशल्य:

  • सरपंचाचे संवाद कौशल्य चांगले असावे.
  • त्याला लोकांना आपले विचार समजावून सांगता यायला हवे.

6. इतर गुण:

  • सरपंच हा सहनशील आणि समजूतदार असावा.
  • गावातील लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्याची त्याची भूमिका असावी.
  • गावासाठी वेळ देण्याची तयारी असावी.

अशा गुणांनी युक्त असलेला सरपंच गावासाठी निश्चितच एक चांगला नेता सिद्ध होऊ शकतो आणि आपल्या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5240

Related Questions

प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? प्रत्यक्ष लोकशाहीच्या विविध मार्गांची माहिती स्पष्ट करा?
राजकीय पक्षाच्या निर्मितीची कारणे स्पष्ट करा?
सन 1948 च्या राष्ट्रसंघ आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
मानव अधिकाराचा जिनेवा करार 1949 सविस्तरपणे स्पष्ट करा?
मानो अधिकारांसह अधिकारासाठीच सार्क संघटनेचे कार्य?
संयुक्त राष्ट्र संघाची आमसभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
संयुक्त राष्ट्रांची महासभा सविस्तरपणे स्पष्ट करा?