प्रेम पत्र लिहायचं आहे, कसे लिहायचं?
आज Valentine's Day आहे,अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली असेल आणि अनेकाना आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपल्या प्रेमभावना व्यक्त कराव्या असे मनातून वाटतच असेल.आज आपण प्रेमपत्र कसे लिहावे ते पहाणार आहोत.कवी असो अथवा साधा माणूस सर्वांचा एकच प्रश्न असतो की एक उत्तम प्रेमपत्र कसे लिहावे?या बाबतीत सर्वच सारखेच गोंधळलेले असतात.
मित्रांनो(आणि मैत्रीणींनो सुद्धा) खाली दिलेल्या बाबींचा नीट विचार केलात,तर तुम्ही एक उत्तम प्रेमपत्र लिहू शकता.
१)पत्र लिहिण्यासाठी उत्तम प्रतीचा कागद(बहुधा cream अथवा पांढर्या रंगाचा) वापरा.त्या सोबत काळ्या अथवा चॉकलेटी रंगाची शाई असलेली लेखणी वापरा.निळ्या,हिरव्या अथवा लाल रंगाची शाई असलेली लेखणी अजिबात वापरू नका.लक्षात असू द्या तुम्ही हे प्रेमपत्र ज्या व्यक्तीसाठी लिहित आहात,ती व्यक्ती तुमच्यासाठी खुपच खास आहे.त्यामुळे स्वत:च्या हाताने लिहिलेले पत्र उत्तम.कारण हे तुमचे खाजगी पत्र आहे.
२)आता एका एकांतस्थळी जा आणि soft, romantic संगीत सुरु करा.लिखाणाच्या जागी शांतता असेल तर उत्तमच,आता प्रकाशाची तीव्रता कमी करा(म्हणजे लाईट डिम करा रे)
..हा केलीत...आता तुमचा मूड थोडा romantic बनवा.
३)तुमच्या प्रेमपत्रा वर दिवस,महिना आणि वर्ष यांची नोंद करायला विसरू नका.अश्यामुळे त्या पत्रावरचा खरेपणा तर पटतोच आणि पुढे-मागे आठवणी जागवताना असे संदर्भ लक्षात राहतात.
४)पत्राची सुरुवात नीट करा आणि जास्त औपचारिकता दाखवू नका.तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावाने सुरुवात करा.
उदा. प्रिय*******(इथे ******* मी उदा. म्हणून दिले आहेत,लगेच ते माझ्या प्रिय व्यक्तीचे नाव असेल असा अर्थ काढू नका.)
५)प्रेमपत्राची सुरुवात पत्र लिहिण्याचे काय कारण आहे ते सांगून करा.
उदा.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
प्रिय ****,
गेल्या अनेक रात्री मी तुझ्या आठवणी मध्येच जागवल्या आहेत.कारण माझ्या भावना तुझ्या जवळ व्यक्त करण्यासाठी पुरेसे शब्दच माझ्या जवळ नाहित.दर वेळी तुला माझ्या मनात तुझ्या विषयी काय वाटते ते सांगावेसे वाटते,पण तू समोर आलीस की मी नेमके शब्दच विसरतो आणि काही बरळतो.मी तुला चंद्र,तारे देवू शकत नाही,फक्त इतके मनापासून सांगू शकतो,माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे. I love you "
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
६)पत्र लिहिताना स्वत:च आपल्या आवडत्या व्यक्तीला काय वाटत असेल याचा अंदाज बांधू नका अथवा स्वत:ला कमी लेखू नका.
उदा."तुला माझ्या विषयी असे काहीही वाटत नसेल"
"तुला वाटत असेल मी वेडा आहे."
अशी वाक्य पत्रामध्ये टाळा.कारण त्यातून चुकिचा अर्थ काढला जावू शकतो.
७)पत्राचा मजकुर लिहिताना तुम्ही त्या व्यक्तिच्या प्रेमात का पडलात याची पुरेसी कारणे द्या.
उदा.
*तुम्ही कधी प्रेमात पडलात त्या प्रसंगाची आठवण करून द्या
*त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय चांगले बदल झाले.
*तुम्ही ती व्यक्ती समोर नसताना तिला किती "miss " करता याचे वर्णन करा.
*त्या व्यक्ती शिवाय तुम्ही कसे राहू शकत नाही ते सविस्तर पटवून द्या.
*तुम्हा दोघांमध्ये सारख्या असलेल्या काही गुणांचा उल्लेख करा(पत्रिकेतले गुण नाहित,तुमच्या स्वभावातले गुण)
*ती व्यक्ती सोबत असताना तुम्हाला किती छान वाटत ते सुद्धा लिहा.
*त्या व्यक्ती बरोबर घालवलेल्या काही सुंदर क्षणांची आठवण करून द्या.
*त्या व्यक्तीच्या अश्या वैशिष्ठांचा उल्लेख करा जी त्या व्यक्तींना इतरांपासून वेगळी करतात.
८)प्रेमपत्र हे तुमच्या मनातील हळव्या आणि व्यकत न होणार्या भावना व्यक्त करण्यासाठी लिहायचे असते,त्यामुळे भाषा चांगली असू द्या.वाटल्यास योग्य त्या जागी कवितांच्या ओळींचा वापर करा.इंटरनेटचा वापर केलात तर तुम्हाला योग्य त्या कवितांच्या ओळी ज्या तुमच्या प्रेमपत्रात योग्य बसतील त्या मिळतीलच.
९)खरे ते लिहा..तुम्ही हे प्रेमपत्र तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची जाणिव करून देण्यासाठी लिहित आहात, असे पत्र लिहू नका जे खोटे वाटेल आणि त्या व्यक्तीला ते वाचून हसायला येईल. त्यामुळे मना पासून खरे तेच लिहा.
पहिल्या वेळी पत्र लिहून झाल्यावर ते लगेच पाठवू नका,पुन्हा एकदा ते वाचून काढा,काही चुका असतील तर सुधारा.मगच परत एकदा लिहून काढून ते पाठवा.
१०)पत्राचा शेवट काळजीपुर्वक करा.
उदा. "मला जे म्हणायचे होते ते मी पत्रात लिहिले आहे.आता मी पत्र पुरे करतो आणि स्वप्न पाहतो आपल्या भावी आयुष्याची."
पत्राचा शेवट नेहमी आशावादी करा.
११)नुसते तुमचे नाव लिहून शेवट करू नका. शेवट करताना प्रेम व्यक्त झाले तर ते अधिक परिणामकारक होते.त्यामुळे "तुझ्या प्रेमात आकंठबुडालेला" फक्त तुझा" असे काहीही लिहून पत्राचा शेवट करा. तुम्हाला वाटेल हे जरा अती वाटते..पण अश्या गोष्टीच
प्रेमात जास्त परिणामकारक ठरतात.
१२)मोराचे पिस,सुकलेली फुले,पानांची जाळी असे काहीतरी प्रेमपत्रा सोबत द्यायला विसरू नका.याचा तुमच्या मनातील भावनांशी अर्थ जोडला जावू शकतो.
१३)आता ते पत्र व्यवस्थितपणे लिफाफ्यामध्ये भरा.त्याच्या वर तुमच्या आवडत्या व्यक्तीचा पत्ता टाका. तुमच्या हाताने त्यावर पत्ता लिहा आणि पोस्ट करा.जर व्यक्ती मित्रपरिवारातील असेल तर तुम्ही ते स्वत:हून त्या व्यक्तीला देवू शकता.
१४)आता धडधडत्या हृदयाने उत्तराची वाट बघा.
१५)मित्र-मैत्रिणींनो प्रेमपत्र लिहिणे हे फक्त प्रियकर प्रेयसीसाठीच नाही,तर नवरा-बायकोसाठी पण गरजेचे आहे.माहित आहे जग खुप फास्ट झाले आहे,नेट,फोन मुळे माणसे जोडली गेली आहे..पण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमपत्र लिहिणे आणि आपल्या भावना व्यक्त करणे कधीही गरजेचे.
१६)प्रेम करा,मनापासून करा,तसे करताना कोणताही थिल्लरपणा नको.
१७)आज Valentine's Day आहे चला तर मग आज पासूनच जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपल्या प्रेमभावना व्यक्त करू या..काय म्हणती गेली कित्येक दिवस बायकोला "I love you." म्हणालो नाही..मग आज बोलून बघा...बघा तरी तुमच्या या ३ शब्दांमध्ये काय जादू आहे
धन्यवाद😊😊😊
प्रेम पत्र कसे लिहायचे:
प्रेम पत्र लिहिताना, काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रथम, आपले प्रेम व्यक्त करा. आपण त्या व्यक्तीवर किती प्रेम करतो हे सांगा. दुसरे म्हणजे, आपल्या भावना व्यक्त करा. आपण त्या व्यक्तीबद्दल काय विचार करतो हे सांगा. तिसरे म्हणजे, प्रामाणिक रहा. आपले मनोगत व्यक्त करा.
प्रेम पत्र लिहिण्यासाठी काही टिप्स:
- साधे आणि स्पष्ट शब्द वापरा.
- आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा.
- सकारात्मक रहा.
- आपल्या पत्राला वैयक्तिक स्पर्श द्या.
प्रेम पत्राचा नमुना:
माझ्या प्रिय [व्यक्तीचे नाव],
मला तुम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात आणि माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहात.
मला आठवतं, आपण पहिल्यांदा [ठिकाण] भेटलो होतो. मला तेव्हाच तुमच्याबद्दल खूप आकर्षण वाटलं. तुमचा आवाज, तुमचं हास्य, तुमची बोलण्याची पद्धत, सगळंच खूप सुंदर होतं.
तुमच्यासोबत असताना मला खूप आनंद होतो. आपण एकत्र खूप मजा करतो, खूप हसतो आणि एकमेकांना खूप समजून घेतो. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे असता आणि मला आधार देता.
माझ्या मनात तुमच्यासाठी खूप प्रेम आहे आणि ते मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला आशा आहे की आपण नेहमी सोबत राहू आणि एकमेकांवर प्रेम करत राहू.
तुमचाच,
[तुमचे नाव]
तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणखी काही वाक्ये वापरू शकता:
- ""माझ्या आयुष्यात तुमच्या येण्याने खूप आनंद भरला आहे.""
- ""तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात.""
- ""मला तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही.""