दूरचित्रवाणी शब्दाचा अर्थ दूरदर्शन मल्टीमीडिया तंत्रज्ञान

मल्टिमीडिया (MMS) म्हणजे काय, याचे फायदे कोणते?

2 उत्तरे
2 answers

मल्टिमीडिया (MMS) म्हणजे काय, याचे फायदे कोणते?

9
📙 *मल्टीमीडिया (Multimedia)* 📙
************************************

विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लागणार्‍या नवनवीन शोधांमुळे दळणवळण आणि संपर्कयंत्रणेत अनेक बदल घडत आहेत. कोणतीही वस्तू माणूस किंवा एखादा लहानात लहान कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी काहीतरी माध्यम असणे आवश्यक असते. संगणकाच्या बाबतीतही असेच आहे. संगणकाकडे असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्यातरी माध्यमाची गरज असते. तसेच आपल्याकडील माहिती संगणकाला द्यायची असेल तरी माध्यम हे हवेच आणि अर्थातच एकापेक्षा जास्त माध्यमे म्हणजेच मल्टिमीडिया.

हल्ली मीडिया आणि मल्टिमीडिया या शब्दांची आपल्याला एवढी सवय झाली आहे की, आपण कोठे ना कोठे तरी हे शब्द उच्चारतोच. आपल्याला दिसणाऱ्या टीव्ही, टेपरेकॉर्डर, ऑडिओ सिस्टीम, संगणक इत्यादींच्या जाहिरातींमध्ये हा शब्द दिसला नाही, तर ती जाहिरातच नाही, असे विनोदाने म्हणावे लागेल. पण बऱ्याचदा आपण मल्टीमीडियाला एक सी.डी. ड्राइव्ह आणि आवाजाची सुविधा एवढ्यापुरती मर्यादित करून त्याचा अर्थच बदलण्याचा गोंधळ करतो.

संगणकाच्या बाबतीत मल्टीमीडिया म्हणजे खरे तर कोणतीही दोन किंवा जास्त माध्यमे एकत्रितपणे एका ठिकाणी संगणकाच्या नियंत्रणात उपलब्ध असणे. भले मग तो लिहिलेला मजकूर असेल किंवा एखादे चित्र. एखादी ध्वनीफित (गाणे) किंवा एखाद्याचे बोलणे (भाषण), एखादी चित्रफीत किंवा संगणकाच्या प्रोग्रामच्या मदतीने दिसणारे द्रुकश्राव्य सादरीकरण या सगळ्यांना मिळून मल्टीमीडिया म्हणता येते.

मल्टिमीडियाचा होणारा प्रसार आणि त्याने साधली जाणारी परिणामकारकता यांमुळे मल्टिमीडियाचा वापर व्यापार, जाहिरात, करमणुक, शिक्षण आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. संगणकाच्या मल्टीमीडियावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार त्याचा वापर करू शकतो, बदल करू शकतो.

संगणकाचा एखादा प्रोग्राम वापरून आपण एखादे चित्र, आकृती वगैरे काढू शकतो. त्याची प्रिंटरच्या साहाय्याने छपाई करू शकतो. एखादा मजकूर स्कॅनरच्या साह्याने छापील रूपातून संगणकाच्या पडद्यावर चित्रित करून त्याचे डिजिटल (द्विमान) स्वरूपात रूपांतर करता येते. व्हिडिओ कॅमेरा वापरून तयार केलेली एखादी चित्रफीत असेल, तर त्यातील चित्र व ध्वनी एकत्रित संकलित करून त्याच्या अनेक प्रतिदेखील करता येतात. विद्यार्थी त्यांच्यासाठी उपलब्ध माहितीची ध्वनिचित्रफीत वापरून अभ्यास करू शकतात. एवढेच काय, परीक्षासुद्धा देऊ शकतात. काही शिक्षक किंवा शैक्षणिक साहित्य बनवणारे साध्या सादरीकरणाच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने चित्र, आकृत्या, फोटो संकलित करून त्याला स्वतःच्या किंवा निवेदकाच्या आवाजाची जोड देऊन एखादा शैक्षणिक कार्यक्रम देखील तयार करतात. कधीकधी मूळ आवाजात काही बिघाड किंवा त्रुटी आली असेल, तर संगणकाच्या प्रोग्रामच्या साह्याने तेवढा भाग काढून टाकून पुन्हा आवाजाची नव्याने जुळवाजुळव करून निवेदन ध्वनिमुद्रित करता येते. तसेच रेकॉर्ड केलेली चित्रफितदेखील अशाच प्रकारे संकलित करून नंतर चित्र व ध्वनीच्या एकत्रीकरणाने एकच चित्रफित (चित्रपट) तयार करता येते, मूळच्या त्रुटी कोठे होत्या, यांचा नंतर लवलेशही असत नाही !

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
मोबाईलवर एमएमएस सेवा कशी चालू करायची?
अधिक माहिती साठी
उत्तर लिहिले · 18/12/2018
कर्म · 569245
0

मल्टिमीडिया (MMS) म्हणजे मल्टीमीडिया मेसेजिंग सर्व्हिस. हे एक तंत्रज्ञान आहे जे मोबाईल फोन वापरकर्त्यांना टेक्स्ट मेसेजसोबत (text message) फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ (audio) पाठवण्याची परवानगी देते.

मल्टिमीडिया (MMS) चे फायदे:

  • संदेश अधिक आकर्षक: टेक्स्ट मेसेजच्या तुलनेत MMS अधिक आकर्षक आणि माहितीपूर्ण असतात.
  • भावना व्यक्त करणे: फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येतात.
  • व्यवसाय उपयोगी: व्यवसायांसाठी जाहिरात आणि मार्केटिंग (marketing) करण्यासाठी MMS एक प्रभावी साधन आहे.
  • ग्रुप मेसेजिंग: एकाच वेळी अनेक लोकांना MMS पाठवता येतात.

MMS वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये MMS सेवा सुरू असणे आवश्यक आहे आणि तुमच्या प्लॅनमध्ये MMS पाठवण्याची सुविधा उपलब्ध असावी.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1620

Related Questions

माझ्या भावाचा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमधून ब्लॉक झाला आहे, तर मी तो अनब्लॉक कसा करू शकतो?
माझ्याकडून माझ्या भावाचा नंबर ब्लॉक झालेला आहे, तर मी तो कसा अनब्लॉक करावा?
जर कोणाचा मोबाईल नंबर ब्लॉक झाला असेल तर अनब्लॉक कसा करावा?
मोबाईल नंबर अनलॉक कसा करावा?
मोबाईल नंबर अनलॉक कसा करायचा?
मोबाईल नंबर अनब्लॉक कसा करावा?
मोबाईलमधील जुने डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ कसे परत मिळवता येतील?