सण दिवाळी देव तिथी

देवदिवाळी कधी साजरी होते?

2 उत्तरे
2 answers

देवदिवाळी कधी साजरी होते?

1
🎇❣🌀🎇❣🌀🎇❣🌀
  *_m⃠a⃠h⃠i⃠t⃠i⃠_*


_*⭕ आज देवदिपावली अर्थात धाकटी दिवाळी      ⭕*_








🎇❣🌀🎇❣🌀🎇❣🌀
____________________________

💢 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💢
____________________________
*_दि. ८ डिसेंबर  २०१८_*
             *_मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेस देव दिवाळी हा सण साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे बलिप्रतिपदेला जनसामान्यांची दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत असली तरी देवांची दिवाळी मात्र त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला येते._*
╔══╗
║██║      _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशीही समजूत प्रचलित आहे.*
या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते.
*_ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_*
मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.
त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
हा सण कोकणचा काही भाग, कोल्हापूर जिल्हातील राधानगरी तालुक्यात *वाळवे खुर्द* व पश्चिम भागात मोठया प्रमाणात साजरा करतात.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖_*      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_
0

देवदिवाळी, ज्याला देव दिवाळी किंवा त्रिपुरा पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते, हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

देवदिवाळी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.

Gregorian calendar नुसार, देवदिवाळी सहसा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येते.

या दिवशी, भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दानधर्म करतात.

वाराणसीमध्ये, गंगा नदीच्या किनाऱ्यावर विशेष उत्सव आयोजित केला जातो, ज्यात हजारो दिवे लावले जातात.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कोणत्या मराठी महिन्यात दिवाळी सण येतो?
दिवाळीतील एका दिव्याचा भावार्थ हिंदीमध्ये स्पष्ट करा?
पिठोरी अमावस्या म्हणजे काय?
नारळी पौर्णिमा म्हणजे काय?
रक्षाबंधन म्हणजे काय?
गुरुपौर्णिमा/व्यास पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) बद्दल माहिती?
वसंत पंचमी म्हणजे काय?