2 उत्तरे
2
answers
धनगर समाजाची लोकसंख्या किती आहे?
2
Answer link
धनगर
धनगर ही महाराष्ट्रातील एक भटकी जमात आहे. या समाजातले लोक पाळीव दुभते प्राणी चरावयास नेण्याचे व त्यांच्या देखभालीचे काम करतात व त्यात मिळणाऱ्या पैशांतून उदरनिर्वाह करतात.[ संदर्भ हवा ] यांची एकंदर लो. सं अन्दाजे ६७३४३९. कोंकण, उत्तर महाराष्ट्रात धुळे,सोलापूर (मंगळवेढा),बारामती, नंदुरबार, जळगाव,औरंगाबादमहाराष्ट्र, मध्य प्रदेश, वऱ्हाड व मध्यभारत यांमध्यें हे लोक आढळतात. मेंढ्या चारणे, विकणें व घोंगडया विणणें हे त्यांचे व्यवसाय असून ते शेळ्या-मेंढ्या, गुरे-ढोरे पाळून त्यांवर उदरनिर्वाह करतात. उत्तर भारतातील धनगर हे मजुरी इत्यादी कामेंहि करतात.यांपैकीं कांहीं जरी स्थायिक असले तरी, कांहीं अजून भटकेच आहेत. या लोकांच्या उत्पत्तीसंबंधीं निरनिराळीं मतें आहेत. तरी या जातींतील देवकांवरून हे लोक मूळचे आर्य असावे असें दिसतें. .
0
Answer link
धनगर समाजाची नेमकी लोकसंख्या सांगणे कठीण आहे, कारण भारत सरकारद्वारे अधिकृतपणे जात आधारित जनगणना आकडेवारी जाहीर केली जात नाही.
महाराष्ट्र राज्याच्या शासकीय संकेतस्थळानुसार, धनगर समाज हा महाराष्ट्रातील एक विशेष मागास प्रवर्ग (Special Backward Category - SBC) आहे.
इतर माहिती:
- काही अंदाजानुसार, धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात सुमारे ९% आहे. [अविश्वसनीय स्रोत]
- धनगर समाज स्वतःला अनुसूचित जमाती (Scheduled Tribes - ST) मध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहे.
अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे, दिलेली माहिती ही केवळ अंदाजे आहे.
टीप: जाती आधारित जनगणनेच्या आकडेवारीसाठी, भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.