औषधे आणि आरोग्य अन्न पोषण आणि फिटनेस आहार

रोजच्या आहारात सोयाबीनचे सेवन किती ग्रॅम असायला पाहिजे? सोयाबीन खाण्याचे फायदे आणि खाण्याचे प्रमाण किती असायला पाहिजे? सोयाबीनमुळे नपुंसकत्व येते, हे खरं आहे काय?

3 उत्तरे
3 answers

रोजच्या आहारात सोयाबीनचे सेवन किती ग्रॅम असायला पाहिजे? सोयाबीन खाण्याचे फायदे आणि खाण्याचे प्रमाण किती असायला पाहिजे? सोयाबीनमुळे नपुंसकत्व येते, हे खरं आहे काय?

10
सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. अहारामध्ये सोयाबीनचा नियमीत वापर केल्याने हडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. एका अभ्यासात असेही सांगितले आहे की, सोयाबीनमध्ये आईसोफ्लेवोंस नावाचे एक रसायन असते. हे रसायन इस्ट्रोजन हार्मोन सारखे असते. महिलांना ओस्टियोपोरोसिसपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे रेसायन फायदेशीर ठरते.

सोयाबीनचे फायदे शोधन्यासाठी संशोधकांनी सुमारे २०० महिलांवर प्रयोग केले. या २०० महिलांना सहा महिन्यांपर्यंत सोयाबीन प्रोटीनयुक्त आहार दिला. त्यानंतर संशोधकांनी या महिलांच्या हाडांचे संशोधन केल्यास त्यांच्या हाडांमधे अधिक भक्कमपणा व नेहमीच्या तूलनेत अधी निरोगीपणा दिसून आला. 

जाणून घ्या सोयाबीनचे फायदे

१ जर आपणास काही मानसीक अजार असेल तर आपल्या अहारात सोयाबीनचा जरूर समावेश करा. सोयाबीन मानसीक संतूलनावर प्रचंड प्रभावी असते.

२ हृदयाच्या आजारवरही सोयाबीन फायदेशीर असते. हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी सोयाबीनचा वापर अहारात करावा असा सल्ला डॉक्टरही देतात.

३  उच्च रक्तदाबावरही सोयाबीन फायदेशीर ठरते. जे लोक सोयाबीनचे नियमीतपणे सेवन करतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४ सोयाबीनपासून लेसीथिन मिळते जे आरोग्याला फारच फायदेशीर असते.

५ सोयाबीनपासून बनवलेले ताक प्यायल्याने पोटांचे विकार कमी होतात.

महत्वाची टीप : गरोदर महिलांनी सोयाबीनचे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 5/12/2018
कर्म · 5495
6
एका अभ्यासानुसार असं समोर आलंय की एका सरासरी प्रौढाने दररोज 15 ते 25 ग्राम सोया प्रोटीनचे सेवन केले पाहिजे.
आता सोयाबीन मध्ये पाहायला गेलं तर 100 ग्राम सोयाबीन मध्ये 33 ते 36 ग्राम प्रोटीन मिळू शकतात मग यानुसार आपण सोयाबीन चे सेवन करू शकतात, किंवा दिवसातून 2 ते 3 वेळा सोयाबीनयुक्त अन्नाचे सेवन करायला पाहिजे.
उत्तर लिहिले · 4/12/2018
कर्म · 18160
0

सोयाबीन सेवनाचे प्रमाण आणि फायदे:

  • प्रमाण: रोजच्या आहारात 25 ते 50 ग्रॅम सोयाबीन घेणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. Healthline
  • उदाहरण: एक वाटी सोयाबीनची भाजी किंवा डाळlegumes and pulses.]
  • सोयाबीनमध्ये प्रथिने (proteins) भरपूर असतात.

सोयाबीन खाण्याचे फायदे:

  • हृदयविकारांसाठी उपयुक्त: सोयाबीनमुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची (cholesterol) पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
  • हाडे मजबूत होतात: सोयाबीनमध्ये असलेले कॅल्शियम (calcium) हाडांना बळकटी देते.
  • मधुमेहासाठी फायदेशीर: सोयाबीन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • वजन कमी करण्यास मदत: सोयाबीनमध्ये फायबर (fiber) असल्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते.

सोयाबीन आणि नपुंसकत्व:

  • सोयाबीनमुळे नपुंसकत्व येते हा एक गैरसमज आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की सोयाबीनचे умеренное सेवन पुरुषांच्या आरोग्यासाठी हानिकारक नाही. Harvard School of Public Health
  • सोयाबीनमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स (phytoestrogens) असतात, जे एस्ट्रोजेन (estrogen) नावाच्या हार्मोनसारखे काम करतात, परंतु त्यांचा प्रभाव खूप सौम्य असतो. त्यामुळे पुरुषांमध्ये हार्मोनल (hormonal) असंतुलन निर्माण होण्याची शक्यता कमी असते.

निष्कर्ष:

सोयाबीन हे एक पौष्टिक अन्न आहे आणि त्याचे умеренное सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नपुंसकत्वाच्या संदर्भात असलेले गैरसमज निराधार आहेत.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

सतत टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते? योगासनाचे फायदे व मर्यादा कसे स्पष्ट कराल? भारतीय घटनेतील मूलभूत तत्त्वे कोणती?
मला भूक लागत नाही, थोडे जेवलो तरी पोट भरल्यासारखे वाटते. झोप तर खूप जास्त आहे, जर घरचे गावी गेले तर २ दिवस मी झोपेतून उठत नाही. झोप जास्त असल्याने दिवसभर थकवा राहतो, कामात मन लागत नाही, झोप कमी करण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी काय करू? कृपया मला योग्य उपाय सांगा.
दूध पिऊन व्यायाम केल्यास काय फायदे होतात?
माझे वय 22 वर्षे आहे आणि माझे वजन फक्त 48 kg आहे. वजन वाढवण्यासाठी मार्केटमध्ये कितीतरी फूड सप्लिमेंट उपलब्ध आहेत. नेमके कोणत्या कंपनीचे घ्यावे, काय बघून घ्यावे आणि वापर कसा करावा? आणि उंची किती वयापर्यंत वाढते?