व्यायाम शारीरिक व्यायाम आरोग्य

सर्वांनी आपली प्रतिक्रिया नोंदवा. काही लोकांच्या मते जोर, बैठका (व्यायाम) काढल्याने उंची वाढत नाही, हे खरे आहे का?

5 उत्तरे
5 answers

सर्वांनी आपली प्रतिक्रिया नोंदवा. काही लोकांच्या मते जोर, बैठका (व्यायाम) काढल्याने उंची वाढत नाही, हे खरे आहे का?

10
प्रथम आपण सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे की,  कोणत्याही प्रकारचा व्यायाम उंची कमी होण्याची किंवा कमी होण्यासाठी समर्थन करत नाही. ही एक अफवा आहे आणि कोणीतरी म्हटल्यामुळे मनात भीती धरून बैठका बद्दल गैरसमज करून घेतले आहे.
सामान्यतः पाहायला गेले तर पेहलवान व्यक्ती तर दर दिवसाला बैठकी घालतात जोर लावतात पण त्यांचे शरीर हे धिप्पाड उंच आणि मजबूत असते.
काहींची उंची अनुवांशिकतेने कमी जास्त होते तर काहींची उंची शरीरात मिळालेल्या पोषक आहार मूळे संतुलन असते.
पुन्हा एकदा सांगते की जोर/बैठका काढल्याने उंची खुंटत नाही. उलटपक्षी याचे चांगले फायदे आहेत. मांडी, पायांचे स्नायू बळकट होतात. याने शरीरातील हार्मोन्स वाढतात. हार्मोन्स वाढणे म्हणजे शरीराच्या ग्रोथ साठी उत्तम असते.
         प्रत्येक व्यायामाचे देखील नियम असतात. ते योग्य प्रकारे केल्यास शरीरावर चांगला परिणाम मिळतो पण चुकीची पद्धत वापरली तर शरीरावर उलट परिणाम दिसू लागतो.
व्यायाम करताना एखादे वजनदार वस्तू मानवेल असाल तर जमेल इतपत उचलावे. अधिक पेक्षा ही अधिक उचलण्याचा प्रयत्न केल्यास ग्रोथ प्लेटला हानी होऊ शकते. म्हणून मार्गदर्शक, एक्स्पर्ट, ट्रेनर तथा अनुभविक व्यक्तींकडूनच व्यायाम करून घ्यावे.
हे माझे मत आहे.🙂
उत्तर लिहिले · 30/11/2018
कर्म · 458560
1
आता आम्ही आमच्या प्रतिक्रिया दिल्या तुम्हाला काय वाटतंय ते सांगा????


शारिरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम. 

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही छान राहते.


व्यायाम केल्याने शरीर सर्वगुणसंपन्न होते .आणि जोर ,बैठक हा पण व्यायामाचाच एक भाग आहे याचा उंचीशी काहीही संबंध नसतो
उत्तर लिहिले · 29/11/2018
कर्म · 14865
1
जोर आणि बैठका (squats) काढल्याने उंची वाढत नाही, हे काही प्रमाणात खरे आहे.

तर्क:

  • आनुवंशिकता (Genetics): उंची मुख्यतः आनुवंशिकतेवर अवलंबून असते. आई-वडिलांकडून मिळालेल्या जनुकांनुसार (genes) व्यक्तीची उंची ठरते.
  • वृद्धी विकास (Growth Plates): उंची वाढणे हे हाडांच्या टोकांवर असलेल्या वाढीच्या प्लेट्सवर (growth plates) अवलंबून असते. ह्या प्लेट्स वयात येईपर्यंत उघड्या असतात आणि त्यानंतर हळू हळू बंद होतात.
  • व्यायामाचा परिणाम: जोर आणि बैठका हे स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम आहेत. यांचा थेट हाडांच्या वाढीवर परिणाम होत नाही.

अपवाद:

  • पोषक आहार: योग्य आहार आणि व्यायाम लहान वयात आवश्यक आहे. योग्य पोषण आणि शारीरिक हालचालींमुळे शरीर निरोगी राहते, ज्यामुळे वाढीस मदत होते.
  • शारीरिक स्थिती: काहीवेळा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास मणक्यावर दाब येऊ शकतो, ज्यामुळे उंची कमी वाटू शकते. योग्य मार्गदर्शन आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष:

जोर आणि बैठकांसारख्या व्यायामामुळे उंची थेट वाढत नाही, परंतु ते शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. उंची वाढणे हे मुख्यतः आनुवंशिकतेवर आणि वाढीच्या प्लेट्सवर अवलंबून असते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1080

Related Questions

लहान मुलाला दात येत असताना त्रास झाल्यास काय करावे?
बी. फार्मसी विषयी माहिती?
हातपाय व पाठ कंबर दुखण्याचे काय कारण असू शकते?
पाण्याशी संबंधित आजारांचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा?
व्हिटॅमिन डी व कॅल्शियम कोणकोणत्या पदार्थांमधून व आणखी कशामधून मिळू शकते?
माझे वय ३७ वर्ष आहे आणि माझे समोरील खालचे दोन दात हलतात, ते पक्के करण्यासाठी काही उपाय सांगा आणि याचा वजनाशी काही संबंध असू शकतो का?
माझं वय ३७ वर्ष आहे आणि माझे वजन फक्त ४३ किलो आहे, तरी वजन वाढवण्यासाठी काय खावे व काही आयुर्वेदिक उपाय सांगा?