औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय आरोग्य आहार

मला गजकर्ण झाला आहे, काय खावे व काय खाऊ नये?

2 उत्तरे
2 answers

मला गजकर्ण झाला आहे, काय खावे व काय खाऊ नये?

4


*नायटा, गजकर्ण*



नायटे निरनिराळया प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर,जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई,एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी.

अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात

लक्षणे हे दोन्हीही आजार कंबर, पोट, मांडया,जांघा, इत्यादी भागांत जास्त करून होतात. यामुळे खूप खाज सुटते. गजकर्ण व नायटयाची वाढ वेगाने होते, पण कातडीवर बधिरता मात्र नसते. यावरून कुष्ठरोगापासून हे आजार वेगळे ओळखता येतात. (कुष्ठरोगात चट्टयांना खाज सुटत नाही व कमी अधिक बधिरता येते.)

उपचार

स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. - (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.)

गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन नायटा मलम (व्हिटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (10 दिवसांत) होतो.

आयुर्वेद

गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे. (अ) गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोळा घासावा.(ब) या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमट पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे 10दिवस घ्यावे.

नायटयासाठी आणखी एक पर्यायी बाह्य उपाय म्हणजे बहाव्याची कोवळी पाने वाटून सकाळ- संध्याकाळ लेप द्यावा.

उत्तर लिहिले · 16/11/2018
कर्म · 9150
0
गजकर्ण (ringworm) झाल्यास काय खावे आणि काय टाळावे याबद्दल काही सूचना खालीलप्रमाणे:

काय खावे:

  • व्हिटॅमिन सी (Vitamin C): लिंबू, संत्री,आवळा यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • आहार Fiber: आपल्या आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये भरपूर असावीत.
  • प्रोबायोटिक्स (Probiotics): दही, ताक यांसारख्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारतात.
  • हळद: हळदीमध्ये कर्क्यूमिन (curcumin) असते, ज्यामुळे ते अँटी-इंफ्लेमेटरी (anti-inflammatory) आणि अँटी-फंगल (anti-fungal) असते. हळद दुधात किंवा जेवणात नियमितपणे घ्यावी.
  • लसूण: लसणामध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे लसूण खाणे फायदेशीर आहे.

काय टाळावे:

  • साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ: जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ (processed foods) रोगप्रतिकारशक्ती कमी करतात.
  • मैदा: पांढरा ब्रेड आणि मैद्याचे पदार्थ टाळा.
  • दुग्धजन्य पदार्थ: काही अभ्यासांनुसार, दुग्धजन्य पदार्थ गजकर्ण वाढवू शकतात.
  • ऍलर्जी निर्माण करणारे पदार्थ: काही लोकांना विशिष्ट अन्नपदार्थांची ऍलर्जी (allergy) असते, ज्यामुळे गजकर्णाची समस्या वाढू शकते. त्यामुळे ऍलर्जी निर्माण करणारे पदार्थ टाळा.

इतर महत्वाचे उपाय:

  • त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा.
  • नियमितपणे औषधोपचार करा.
  • डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हे काही सामान्य उपाय आहेत, पण तुमच्यासाठी योग्य उपाय तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860

Related Questions

केसतोडा यावर औषध कोणते?
ऍसिडिटीवर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर सोपे घरगुती उपाय काय आहेत?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकर्णाचे चट्टे उठले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?