3 उत्तरे
3
answers
मराठी भाषाची जननी कोण आहे ?
1
Answer link
पूर्वी मराठी भाषेची जननी संस्कृत भाषा मानली जात असे.याचे कारण म्हणजे मराठीतील बहुतांश शब्द हे संस्कृतमधील शब्दांचे तत्सम किंवा तद्भव शब्द आहेत.परंतु नवीन संशोधनानुसार हे मत पूर्णतः योग्य नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या मते मराठी किंवा अन्य कोणत्याही भाषा मध्ये अन्य भाषांमधून नवीन शब्द येतच असतात.उदा. मराठी मध्ये संस्कृत सोबतच कानडी ,तेलगू,तामिळ,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी,उर्दू या भाषांमधूनही शब्द आले आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला मराठीची जननी मानणे पूर्णतः योग्य होणार नाही. मराठीला केंद्र सरकारमार्फत अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मराठी ही प्राचीन आणि स्वयंभू अशी भाषा आहे हे सिद्ध होईल म्हणजेच मराठीची कोणतीही जननी नाही असे म्हणता येईल.
0
Answer link
संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे. संस्कृत भाषेला देववाणी, गीर्वाणवाणी असेही म्हणतात.
0
Answer link
मराठी भाषेची जननी संस्कृत भाषेला मानले जाते.
संस्कृत ही एक प्राचीन इंडो-आर्यन भाषा आहे. मराठी भाषेवर संस्कृत भाषेचा खूप मोठा प्रभाव आहे. मराठीतील अनेक शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आले आहेत, तर काही शब्दांमध्ये बदल झालेला आहे.
मराठी भाषा ही इंडो-आर्यन भाषा कुटुंबातील एक भाषा आहे. मराठी भाषेचा उगम महाराष्ट्रामध्ये झाला.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: