2 उत्तरे
2
answers
गल्फ कंट्री म्हणजे काय?
5
Answer link
गल्फ कंट्री म्हणजे आखाती देश.पर्शियन सागराच्या पश्चिम किनारपट्टीवरील ६ देश बहरीन ,कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती हे देश इतर आखाती देशांचा भाग आहेत. हे देश GCC म्हणजे 'गल्फ को-ऑपरेशन कंट्रीज्' म्हणून देखील ओळखले जातात.
प्रामुख्याने भाषा , परंपरा आणि इतर रीतीरिवाज ह्याबाबतीत हे देश काही प्रमाणात अगदी सारखे आहेत. राज्य व्यवस्थेबद्दल सांगायचे तर काही देशांमध्ये अजूनही पारंपारिक राज्यव्यवस्था अस्तित्वात आहे.
जगातील तेल आणि नैसर्गिक वायू चे उत्पादन करणाऱ्या काही प्रमुख देशांमध्ये GCC देशांचा अंतर्भाव होतो. साहजिकच आर्थिक सुबत्ता निर्माण झाल्यामुळे आणि एकंदरीत स्थानिक लोकसंख्येचे असलेले अल्प प्रमाण त्याचमुळे ह्या देशामध्ये नोकरी - व्यवसाया निमित्त स्थलांतरित होण्याचे प्रमाण खूपच वाढले . काही प्रमाणात ह्याची सुरवात झाली ती भारतीयांकडून आणि काही प्रमाणात महाराष्ट्रीयन लोकांकडून जे साधारणपणे ७० - ८० च्या दशकात ह्या देशांमध्ये आले.

0
Answer link
गल्फ कंट्री (Gulf Country) म्हणजे पर्शियन गल्फच्या (Persian Gulf) आसपास असलेले देश. या देशांमध्ये प्रामुख्याने खालील देशांचा समावेश होतो:
- सौदी अरेबिया (Saudi Arabia): सर्वात मोठा देश आणि तेलाचा मोठा उत्पादक.
- इराण (Iran): पर्शियन गल्फच्या उत्तरेकडील मोठा देश.
- इराक (Iraq): ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा देश.
- कुवेत (Kuwait): तेल उत्पादनासाठी महत्त्वाचा देश.
- संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates): आधुनिक शहरं आणि पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध.
- कतार (Qatar): नैसर्गिक वायूचा मोठा साठा असलेला देश.
- बहरैन (Bahrain): छोटा बेट देश, जो वित्तीय केंद्र म्हणून विकसित झाला आहे.
- ओमान (Oman): ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो.
या देशांना गल्फ कंट्रीज किंवा आखाती देश म्हणून ओळखले जाते. हे देश त्यांच्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या विपुल साठ्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाचे आहेत.