Topic icon

आखाती देश

11
आखात (Gulf)म्हणजे तीन बाजूंना जमीनीने वेढलेली आणि केवळ एकाच बाजूने पाणी असलेली जलीय रचना होय.
  खाली एक प्रतिमा दिली आहे त्यावरून आपल्याला कल्पना येईल की आखात म्हणजे नेमकं काय.
  आणि ह्या आखताला लागून असलेले देश म्हणजे आखाती देश होय. हे सर्व देश हे पर्शियाच्या आखाताला (Persian Gulf) लागून आहेत.

आखाती देश:
कुवैत
ओमान
सौदी-अरेबिया
संयुक्त अरब अमीरात (युएई)
कतार
बहरैन

ह्या सहा देशांना आखाती देश म्हणून संबोधले जाते.

हे देश Gulf Co-operation council च्या अंतर्गत येतात. Gulf Co-operation council ची स्थापना 1981मध्ये इराक - इराण च्या युद्धावेळी करण्यात आली.

उत्तर लिहिले · 5/1/2020
कर्म · 18160
5
गल्फ कंट्री म्हणजे आखाती देश.पर्शियन सागराच्या पश्चिम किनारपट्टीवरील ६ देश बहरीन ,कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती हे देश इतर आखाती देशांचा भाग आहेत. हे देश GCC म्हणजे 'गल्फ को-ऑपरेशन कंट्रीज्' म्हणून देखील ओळखले जातात.
प्रामुख्याने भाषा , परंपरा आणि इतर रीतीरिवाज ह्याबाबतीत हे देश काही प्रमाणात अगदी सारखे आहेत. राज्य व्यवस्थेबद्दल सांगायचे तर काही देशांमध्ये अजूनही पारंपारिक राज्यव्यवस्था अस्तित्वात आहे.
जगातील तेल आणि नैसर्गिक वायू चे उत्पादन करणाऱ्या काही प्रमुख देशांमध्ये GCC देशांचा अंतर्भाव होतो. साहजिकच आर्थिक सुबत्ता निर्माण झाल्यामुळे आणि एकंदरीत स्थानिक लोकसंख्येचे असलेले अल्प प्रमाण त्याचमुळे ह्या देशामध्ये नोकरी - व्यवसाया निमित्त स्थलांतरित होण्याचे प्रमाण खूपच वाढले . काही प्रमाणात ह्याची सुरवात झाली ती भारतीयांकडून आणि काही प्रमाणात महाराष्ट्रीयन लोकांकडून जे साधारणपणे ७० - ८० च्या दशकात ह्या देशांमध्ये आले.
उत्तर लिहिले · 2/11/2018
कर्म · 18160