2 उत्तरे
2
answers
#metoo चा अर्थ काय होतो?
12
Answer link
#MeToo ही लैंगिक छळवणुकीच्या विरोधातली एक मोहीम आहे. या हॅशटॅगचा आधार घेत लैंगिक छळवणुकीला बळी पडलेले (विशेषत: कामाच्या ठिकाणी) लोक आपली व्यथा मांडत आहेत.
या अभियानामुळे त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी बरीच मदत झाली आहे.
मागच्या वर्षी हॉलिवुड दिग्दर्शक हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक छळवणुकीचा आरोप केल्यावर या अभियानाने जोर पकडला.
त्यात सामान्य लोकांसकट अनेक प्रसिद्ध लोकांची नावं समोर आली आहेत. वाईनस्टीन यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं.
MeToo आंदोलन सर्वप्रथम २००६साली अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील तराना बुरके या आफ्रिकन- अमेरिकन मानवाधिकार कार्यकर्तीने सुरू केले आहे.
पुढील माहिती खालील लिंक वर वाचू शकता.
http://www.bolbhidu.com/what-is-the-me-too-movement/

0
Answer link
#MeToo हे एक आंदोलन आहे. लैंगिक गैरवर्तन आणि लैंगिक छळाच्या विरोधात हे आंदोलन आहे.
2006 मध्ये अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या 'ताराना बुर्के' यांनी #MeToo चळवळ सुरू केली.1 लैंगिक हिंसाचाराचा अनुभव घेतलेल्या लोकांना एकत्र आणणे हा या चळवळीचा उद्देश होता.
अभिनेत्री 'ॲलिसा मिलानो' ने 2017 मध्ये #MeToo हा हॅशटॅग वापरून लोकांना त्यांच्या लैंगिक शोषणाचे अनुभव सांगण्यास प्रोत्साहित केले, त्यानंतर हे आंदोलन जगभर पसरले.2
या चळवळीमुळे अनेक पीडित व्यक्तींनी पुढे येऊन त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांबद्दल आवाज उठवला.