2 उत्तरे
2
answers
हल्ली वर्तमानपत्रात येत असलेले "मी too" प्रकरण काय आहे?
5
Answer link
'Me Too' (मी टू) . सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा हॅशटॅग नेमका आहे तरी काय हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना नक्कीच पडला असेल. जगभरात स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाविरुद्ध ,शारीरिक शोषणाविरुद्ध #Me Too च्या माध्यमातून वाचा फोडली जातेय. सोशल मीडियावर नावारूपास येणाऱ्या या चळवळीमुळे स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य नव्याने समोर येत आहे.
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक शोषण होऊ शकते, परंतु याबाबतीत फारसे मोकळेपणाने बोलले जात नाही. आपल्याला आलेला वाईट अनुभव इतरांना सांगितल्यावर चारचौघांत चर्चा होईल, या भीतीने अनेकदा मुलींना गप्प केले जाते. परंतु, केवळ विषय टाळला म्हणून घटना घडायच्या थांबत नाहीत. #Me Too द्वारे नेमक्या याच संवेदनशील विषयावर सोशल मीडियावर मोकळेपणाने बोलेले जात आहे. हॉलिवूड असो वा बॉलिवूड आपल्याला आलेले अनुभव प्रत्येकजण शेअर करतंय.
>> कॅम्पेनची सुरुवात
ऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर हॉलिवूडमधील २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप केला. या मुद्दयावर बोलताना हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिसा मिलानो हिनं माझ्यासोबतही असे घडले आहे म्हणत #Me Too ट्विट केले आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले.
>> काय आहे #Me Too
अभिनेत्री एलिसा मिलानो हिने शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य जगासमोर येण्यासाठी ट्विट केले. 'आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक शोषण झालेल्या महिलांनी जर #Me Too लिहून स्टेटस शेअर केला, तर कदाचित स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव लोकांना होईल,' असे ट्विट तिने केले आणि जगभरातील महिला याविषयी आपली मतं मांडू लागल्या.
>> भारतातही ट्रेडिंग
या कॅम्पेनमध्ये हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव शेअर केले. भारतातही हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून भारतातील अनेक मुली आपल्याला आलेले असे वाईट अनुभव लोकांसमोर मांडतायेत.

0
Answer link
मी टू (Me Too) प्रकरण:
'मी टू' हे एक सामाजिक आंदोलन आहे. यात लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तणूक झालेल्या व्यक्ती पुढे येऊन आपले अनुभव सांगतात.
सुरुवात:
- 2006 मध्ये अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या तराना बुर्के यांनी 'मी टू' चळवळ सुरू केली.
- अभिनेत्री एलिसा मिलानोने 2017 मध्ये #MeToo हा हॅशटॅग वापरून लोकांना त्यांच्या कथा सांगण्यास प्रोत्साहित केले, ज्यामुळे हे आंदोलन जगभर पसरले.
भारतातील 'मी टू':
- भारतात 2018 मध्ये 'मी टू' चळवळीला जोर चढला. अनेक महिलांनी त्यांच्यासोबत झालेले लैंगिक अत्याचार आणि गैरव्यवहार उघड केले.
- यामध्ये अनेक पत्रकार, अभिनेत्री आणि इतर क्षेत्रातील महिलांनी आपले अनुभव सांगितले.
परिणाम:
- या चळवळीमुळे लैंगिक गैरव्यवहार आणि अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यास लोकांना प्रेरणा मिळाली.
- अनेक आरोपींना त्यांच्या पदावरून दूर करण्यात आले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली.
'मी टू' हे प्रकरण लैंगिक समानता आणि न्यायासाठी महत्त्वाचे ठरले आहे.