बॉलीवूड हॉलीवूड बातम्या सामाजिक लैंगिक अत्याचार

मी टू हे सध्या काय आहे, मला समजले नाही?

2 उत्तरे
2 answers

मी टू हे सध्या काय आहे, मला समजले नाही?

7
#MeToo चळवळ आहे तरी काय आणि याची सुरुवात झाली तरी कशी ?_* 
 --------------------------------------- 
 _गेल्यावर्षी ऑक्टोबर पासून #MeToo हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. #MeToo चळवळीने लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्याला वाचा फोडण्याचं काम सुरु केलं. भारतात या चळवळीने थोडा बहुत वाद उभा राहिला पण म्हणावं तसं परिणामकारी वादळ उठलं नाही. मध्ये ही चळवळ जवळजवळ बंद पडली होती. मग गेल्याच महिन्यात तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आणि भारतात #MeToo पुन्हा ट्रेंड होऊ लागला._ 

*_💁‍♀#MeToo चा जन्म_* 
 नागरी हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या तराना बर्क या १९९७ साली शारीरिक शोषणाला बळी पडलेल्या मुलींसाठी काम करत होत्या. त्यांनी अवघ्या १३ वर्षाच्या मुलीच्या तोंडून तिच्या लैंगिक अत्याचाराची कहाणी ऐकली. या मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने लैंगिक अत्याचार केला होता. या लहानगीच्या तोंडून हा भीषण प्रकार ऐकल्यानंतर तराना बर्क यांच्या तोंडून एकच प्रतिसाद निघाला MeToo.१९९७ ते २००६ पर्यंत त्यांच्या डोक्यात हा शब्द घोळत राहिला. या शब्दांनी त्या अस्वस्थ होत होत्या. शेवटी त्यांनी या दोन शब्दांचा वापर करून MeToo चळवळ उभारली. या चळवळीला खरी धार मिळाली ती २०१७ साली. 

*_😱एक ट्विट आणी चळवळीचा वणवा पेटला_*
 या चळवळीची पहिली ठिणगी पडली ती ऑक्टोबर, २०१७ रोजी.एलिसा मिलानो या हॉलीवूडच्या अभिनेत्रीने एक ट्विट केलं होतं. ‘जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार झाला असेल तर या ट्विटला me too असं उत्तर द्या’. या एका ट्विट नंतर ट्विटरवर दिवसभरात २ लाख लोकांनी #MeToo हॅशटॅग वापरला. फेसबुकवर २४ तासात ४७ लाख लोकांनी #MeToo पोस्ट केलं.हार्वे वाइनश्टीन या हॉलीवूडच्या ऑस्कर विजेत्या निर्मात्यावर २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.या घटनेला प्रतिसाद म्हणून एलिसा मिलानो या अभिनेत्रीने स्वतःचा अनुभव तर शेअर केलाच पण सोबतच इतरांना आपले अनुभव शेअर करण्याचं आवाहन केलं. शारीरिक शोषणाला बळी पडलेल्या प्रत्येक महिलेने फक्त #MeToo लिहिलं तरी स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचाराचा प्रश्न किती गंभीर आहे याची इतरांना कल्पना येईल हा या मागचं उद्देश होता. 

*_❗स्त्रियांवरचे अत्याचार हा वर्षानुवर्षांचा खितपत पडलेला प्रश्न. आता तरी या चळवळीने भविष्यात होणारे असे हीन प्रकार बंद होणे हेच या चळवळीचं यश असेल._* 

उत्तर लिहिले · 15/10/2018
कर्म · 10125
0

मी टू (MeToo) हे एक सामाजिक चळवळ आहे.

लैंगिक गैरवर्तन आणि लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ह्या चळवळीची सुरुवात झाली.

ह्या चळवळीमुळे अनेक महिला आणि पुरुषांनी त्यांच्यासोबत घडलेले लैंगिक शोषण, गैरवर्तन उघडपणे सांगितले.

2006 मध्ये अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या टॅराना बुर्क (Tarana Burke) यांनी ‘मी टू’ची सुरुवात केली.

नंतर 2017 मध्ये अभिनेत्री एलिसा मिलानो (Alyssa Milano) हिने ह्या चळवळीला सोशल मीडियावर #MeToo ह्या हॅशटॅगने प्रोत्साहन दिले, ज्यामुळे हे जागतिक स्तरावर पसरले.

या चळवळीचा उद्देश लोकांना लैंगिक गैरवर्तन आणि अत्याचाराबद्दल बोलण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

ह्या चळवळीमुळे अनेक पिडीतांना न्याय मिळवण्यास मदत झाली आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1620

Related Questions

#metoo चा अर्थ काय होतो?
मी टू म्हणजे काय? काय प्रकरण आहे?
हल्ली वर्तमानपत्रात येत असलेले "मी too" प्रकरण काय आहे?
माझं वय 19 वर्षे आहे आणि एका विवाहित स्त्रीला माझ्यावर प्रेम झालं आहे, तीच वय 24 वर्षे आहे व तिने मला जबरदस्तीने किस पण केलं, ती आमच्या रिलेशनशिपमध्ये आहे, मी काय करू?