कला शब्द लोककला

नौटंकी शब्द खूप ऐकला, नौटंकी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

नौटंकी शब्द खूप ऐकला, नौटंकी म्हणजे काय?

6
नौटंकी ह्या शब्दाला आपल्यापैकी जवळजवळ सगळेच जण हस्यास्पद दृष्टीने पाहतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु नौटंकी हा शब्द बरचं काही दर्शवितो.

नौटंकी हे एक नाटकाचा, अभिनयाचा प्रकार आहे जसा महाराष्ट्रात लावणी, दक्षिणेकडे कथकली, कुचीपूडी, भरतनाट्यम आहेत. फरक ऐवढाच की लावणी, भरतनाट्यम ह्या शैलीत नाचणे जास्त बाधित असते तसे नौटंकीमध्ये अभिनय जास्त महत्त्वाचा असतो.

नौटंकी उत्तर भारत, नेपाळचा काही भाग ह्या भागात अभिनय करुन नाचगाणे करुन काहीतरी संदेश लोकाँना दिला जातो. हा संदेश लोकहितासाठी, जनजागृतीसाठी असतो. महाराष्ट्रात आणि बर्याच ठिकाणी नाटक मंडळी जसं एक बोध देणारं नाटक सादर करतात आणि जनजागृती घडवून आणतात तसं तिकडे नौटंकी कार करतात.

नौटंकीचा अर्थ तोच की अभिनय करुन आपला संदेश पोहोचवणे.

म्हणुन ऐखाद्या मुलाला शाळेत जायचं नसेल तर तो लगेच पोट दुखण्याचे नाटक करतो तेव्हा आपण सहज त्याला म्हणतो "कारटं किती नौटंकी करतयं".. किंवा एखादे काम करण्याचा आपल्याला कंटाळा आला कि आपण पण लगेच नाटक करतो. झोप येतेय, डोकं दुखतयं, पाय दुखतयं, मग इतर आपल्याला म्हणतात "हा.बस..बस.. नाटक नको, नौटंकी कूठला!!" तो हाच प्रकार... :-)
उत्तर लिहिले · 19/10/2018
कर्म · 75305
0
नौटंकी म्हणजे काय?

नौटंकी हा उत्तर भारतातील एक पारंपरिक लोकनाट्य प्रकार आहे. हे नाव 'नौटंकी' नावाच्या एका प्रसिद्ध नाटिकेद्वारे पडले.

नौटंकीची वैशिष्ट्ये:
  • खुले रंगमंच: हे नाटक खुल्या रंगमंचावर सादर केले जाते, ज्यामुळे प्रेक्षक कोणत्याही बाजूने नाटक पाहू शकतात.
  • संगीत आणि नृत्य: नौटंकीमध्ये संगीत आणि नृत्याला खूप महत्त्व दिले जाते. ढोल, नगाडे आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचा वापर केला जातो.
  • वेशभूषा: कलाकार भडक आणि रंगीबेरंगी वेशभूषा करतात.
  • भाषा: नौटंकीची भाषा सोपी आणि लोकांना समजण्या जोगी असते.
  • विषय: प्रेम, शौर्य, आणि पौराणिक कथांवर आधारित नाटके सादर केली जातात.

इतिहास: नौटंकीची सुरुवात 18 व्या शतकात उत्तर प्रदेशात झाली. अधिक माहितीसाठी येथे पहा.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1180

Related Questions

कीर्तन, भवाडा, आढीजागरण, रामलीला, दंडार, वाघ्यामुरळी, दशावतारी खेळ अशा कोणत्याही एका लोकांशी संबंधित कलाप्रयोगाचे अवलोकन करून त्या प्रयोगाची वैशिष्ट्ये वीस ओळीत लिहा.
आपल्या परिसरात सादर होत असलेल्या लोकनाट्याचा प्रयोग काळजीपूर्वक पाहा. त्या लोकनाट्याच्या सादरीकरणाचे तंत्र समजून घेऊन लोकनाट्यप्रयोगाच्या टप्प्यांचे दर्शन घडविणारे संक्षिप्त टिपण तयार करा?
आपल्या परिसरात सादर होत असलेल्या लोकनाट्याच्या प्रयोगाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्या लोकनाट्याच्या सादरीकरणाचे तंत्र समजावून घेऊन लोकनाट्य प्रयोगाच्या टप्प्यांचे दर्शन घडवणारे सविस्तर टिपण तयार करा.
कीर्तन, भारुड, जागरण, रामलीला, दंडार, वगनाट्य, दशावतार, तमाशा अशा कोणत्याही एका लोककला प्रकाराचे अवलोकन करून त्या प्रयोगाची वैशिष्ट्ये ३० ओळीत लिहा.
भारुड म्हणजे काय? भारुडाची माहिती द्या.
भाट म्हणजे काय?
महाराष्ट्रातील लोकनाट्य प्रकाराची यादी कोणती आहे?