संस्कृती सण अध्यात्म पूजा दसरा

दसरा दिवशी खंडेपूजन कधी आणि कसे करतात, आपट्याची पाने कधी आणि कसे पुजतात?

2 उत्तरे
2 answers

दसरा दिवशी खंडेपूजन कधी आणि कसे करतात, आपट्याची पाने कधी आणि कसे पुजतात?

4
आपट्याच्या पानाबदल


आपटा : अश्मंतक : Bauhinia racemosa
नऊ रात्री देवीचा जागर झाला की दहावा दिवस असतो विजयादशमीचा. या दिवशी सोने वाटण्याच्या प्रतीक स्वरूपात आपटा या वृक्षाची पाने वाटण्याचा प्रघात आहे.
प्रभू श्रीरामाचे पूर्वज असलेले दानशूर रघुकुल या राजाचे शासन असताना वरतंतू नावाचे श्रेष्ठ ऋषी (शिक्षक) होते, त्यांच्याकडे असणाऱ्या कौत्स्य नामक शिष्याने 14 विद्यांमध्ये नैपुण्य प्राप्त केले. गुरुदक्षिणा घ्यावी असा आग्रह केल्यावर वरतंतू मुनींनी 14 विद्या म्हणून 14 कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या. दानशूर रघुराजाकडे कौत्स्य या शिष्याने याचना केली, व राजाने कुबेराकडून आपट्याच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव घडविला. कौत्स्य याने प्रामाणिकपणे त्यातील 14 कोटी मुद्रा गुरूंना दिल्यावर आपट्याच्या वृक्षावरील शिल्लक राहिलेल्या मुद्रा राजाने संपूर्ण प्रजेमध्ये घरी न्यायला सांगितल्या. हा दिवस दसऱ्याचा असल्याने दरवर्षी आपट्याची पाने वाटण्याची प्रथा रूढ झाली.
आपट्याला आयुर्वेदात अश्मंतक (अश्म: पाप यांचा अंत करणारा), युग्मपत्र(जुळी पाने), अम्लपत्रक( चवीला आंबट) ही पर्यायी नावे आहेत.
आपटा तुरट, मधुर आणि आंबट रसाचा असून गुणांनी लघु आणि शीत वीर्याचा आहे.
आपटा ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे, याची पाने, खोडावरील साल, शेंगा, फुले, मूळ अशा सर्वांचा व्याधी नाशासाठी उपयोग होतो.
मधुमेह आणि विविध मूत्रविकारासाठी आपटा वापरला जातो, याने मूत्रवाटे पडणारी खर तसेच मुतखड्यासारखे व्याधी बरे होतात(अश्म म्हणजे दगड किंवा खडा- मूत्र मार्गातील खडा फोडणारा तो अश्मंतक.)
जलोदर सारख्या आजारांत आपटा, कुटज व भृंगराज याचा रस सेवन केल्याने पोटाचा घेर कमी येतो.{©लेखक: डॉ कल्याणकर किरण)
वारंवार अतिसार होणे ग्रहणी, प्रवाहिका, आमांश (चिकट आव पडणे) यासारखी लक्षणे असताना याच्या पानाचा रस व मिरेपूड वापरावी. पोटाचा मुरडाही या औषधाने थांबतो.
सोरायसिस, इसब, खरूज, तारुण्यपिटीका अशा त्वचविकारांत आपट्याच्या सालीचा काढा उपयुक्त आहे, याने रक्तशुद्धी सह रक्तवृद्धी सुद्धा होते.
तोंड आले असता, आपट्याचा सालीचा काढा गुळण्या करण्यासाठी वापरावा.
वारंवार होणारे गर्भपात टाळण्यासाठी आयुर्वेदात 10 मासानुमासिक काढे वर्णिले आहेत, यातील द्वितीय मास काढा हा आपटा, तीळ, मंजिष्ठा व शतावरी या औषधांनी तयार केला आहे.दुसऱ्या महिन्यातील गर्भस्त्राव टाळण्यास याचा उपयोग होतो.
विजयादशमी निमित्त ही आपट्याची पाने कशी वाटावीत याचे फार सुंदर वर्णन शास्त्रांत पुढील प्रमाणे केले आहे.
शुचिर्भूत होऊन सकाळी आपट्याच्या झाडाजवळ जावे व पुढील मंत्र म्हणावा.
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या इष्टांचे(मित्र, नातेवाईक ई.) दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर.
नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. ही पाने लहानांनी ज्येष्ठांना द्यावी आणि आशीर्वाद घ्यावे असा संकेत आहे.
दुर्दैवाने आपट्याचा तुटवडा भासत असल्यामुळे सध्या बाजारात आपट्याच्याच कुळातील “कांचनार” नावाच्या वृक्षाची पाने विकली जातात आणि अज्ञानापोटी बरीच मंडळी हि पाने विकत घेतात आणि खूप मोठी मोठी सोन्याची पाने मिळाली म्हणून आनंदात असतात. मात्र वापरात जितकी महत्वाची पाने आहेत तितकीच विकत न घेता अधिक प्रमाणात घेतल्यामुळे कांचनाराच्या पानांची आणि पर्यायाने निसर्गाची हानी होते.दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिराबाहेर, रस्त्यांवर, घराबाहेर आपट्याच्या पानांचा अक्षरश: कचरा होतो.अश्मन्तक-कांचनार सारख्या वनस्पतींची लागवड करुन त्यांचे जतन करणे हीच आताच्या काळातील खरी विजयादशमीची पूजा ठरेल. चला तर मग या वर्षापासून सोने लुटूया वृक्ष रोपणाचे, प्रेमाचे, ज्ञानाचे आणि आरोग्याचे.
उत्तर लिहिले · 18/10/2018
कर्म · 123540
0

दसरा हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी शस्त्र पूजा आणि आपट्याच्या पानांची पूजा करण्याची प्रथा आहे.

खंडे पूजन:
  • कधी: दसऱ्याच्या दिवशी खंडे पूजन केले जाते. विजयादशमीच्या मुहूर्तावर हे पूजन केले जाते.
  • कसे:
    1. शस्त्रांना स्वच्छ धुऊन घ्या.
    2. शस्त्रांना हळद-कुंकू लावून त्यांची पूजा करा.
    3. देवांना नैवेद्य दाखवा.
    4. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या हस्ते शस्त्रांची पूजा करा.
आपट्याच्या पानांची पूजा:
  • कधी: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे.
  • कसे:
    1. आपट्याची पाने तोडून ती स्वच्छ धुऊन घ्या.
    2. पानांना हळद-कुंकू लावून त्यांची पूजा करा.
    3. आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटा.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 3520

Related Questions

कुळाचार म्हणजे काय?
प्रथम ऋतुगमन विधी?
प्रथम रजस्वला विधी माहिती?
श्री संत जनार्दन स्वामी महाराज वेरूळ आश्रम बद्दल माहिती ?
पंक्तीमध्ये मीठाला साखर का म्हणतात?
बैल पोळा हा सण का साजरा केला जातो?
लोकल ट्रेन मध्ये भजनात वाजविल्या जाणाऱ्या वाद्याला काय म्हणतात?