Topic icon

दसरा

0
दसरा हा भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण नवरात्रीच्या समाप्तीनंतर येतो आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
दसरा: माहिती
  • अर्थ: दसरा हा शब्द 'दश' म्हणजे दहा आणि 'हरा' म्हणजे हरणे या दोन शब्दांनी बनलेला आहे. याचा अर्थ दहा वाईट गोष्टींवर विजय मिळवणे असा होतो.
  • इतिहास: या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला होता. त्यामुळे हा दिवस विजय दिवस म्हणूनही ओळखला जातो.
  • सांस्कृतिक महत्त्व: दसऱ्याच्या दिवशी लोक नवीन कपडे परिधान करतात, शस्त्र पूजा करतात आणि एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात.
  • कृषी महत्त्व: हा सण शेतीत नवीन पीक आल्यानंतर साजरा केला जातो, त्यामुळे तो कृषी जीवनात आनंदाचा आणि समृद्धीचा संदेश देतो.
दसरा कसा साजरा करतात?
  • रावण दहन: अनेक ठिकाणी रावणाच्या मोठ्या पुतळ्यांचे दहन केले जाते, जे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
  • शस्त्र पूजा: दसऱ्याच्या दिवशी लोक आपल्या घरातील शस्त्रे आणि उपकरणे यांची पूजा करतात.
  • सीमोल्लंघन: या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे, ज्यामध्ये गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमीच्या झाडाची पूजा केली जाते.
  • आपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात, जी समृद्धी आणि সৌभाग्याचे प्रतीक मानली जातात.
महाराष्ट्रामध्ये दसरा: महाराष्ट्रामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोक पारंपरिक वेशभूषा करतात.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:
उत्तर लिहिले · 18/8/2025
कर्म · 2580
5
घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठावे.
घरातील वाहने, तुमचे उद्योगाचे सामान जसे की दुकानाचे काउंटर, जर तुमचे वर्कशॉप असेल तर त्यातले मशीन हे सगळे स्वच्छ करून त्यांची हळदी कुंकू व फुले वाहून पूजा करावी.
घरातील शस्त्रांची पूजा करावी. दसऱ्याला सरस्वती पूजनाचे महत्व असते, तेही करावे.
याबरोबरच मोठ्या व्यक्ती लहानांना आपट्याची पाने देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा. दसऱ्याला आपट्याच्या पानांना सोने म्हणतात.

दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा!
उत्तर लिहिले · 25/10/2020
कर्म · 61495
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या या शुभदिनी, तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश येवो, ह्याच माझ्या प्रार्थना.

शुभ दसरा!

- उत्तर एआय

या दिवसाचा इतिहास आणि महत्व जाणून घेण्यासाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2580
4
आपट्याच्या पानाबदल


आपटा : अश्मंतक : Bauhinia racemosa
नऊ रात्री देवीचा जागर झाला की दहावा दिवस असतो विजयादशमीचा. या दिवशी सोने वाटण्याच्या प्रतीक स्वरूपात आपटा या वृक्षाची पाने वाटण्याचा प्रघात आहे.
प्रभू श्रीरामाचे पूर्वज असलेले दानशूर रघुकुल या राजाचे शासन असताना वरतंतू नावाचे श्रेष्ठ ऋषी (शिक्षक) होते, त्यांच्याकडे असणाऱ्या कौत्स्य नामक शिष्याने 14 विद्यांमध्ये नैपुण्य प्राप्त केले. गुरुदक्षिणा घ्यावी असा आग्रह केल्यावर वरतंतू मुनींनी 14 विद्या म्हणून 14 कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या. दानशूर रघुराजाकडे कौत्स्य या शिष्याने याचना केली, व राजाने कुबेराकडून आपट्याच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव घडविला. कौत्स्य याने प्रामाणिकपणे त्यातील 14 कोटी मुद्रा गुरूंना दिल्यावर आपट्याच्या वृक्षावरील शिल्लक राहिलेल्या मुद्रा राजाने संपूर्ण प्रजेमध्ये घरी न्यायला सांगितल्या. हा दिवस दसऱ्याचा असल्याने दरवर्षी आपट्याची पाने वाटण्याची प्रथा रूढ झाली.
आपट्याला आयुर्वेदात अश्मंतक (अश्म: पाप यांचा अंत करणारा), युग्मपत्र(जुळी पाने), अम्लपत्रक( चवीला आंबट) ही पर्यायी नावे आहेत.
आपटा तुरट, मधुर आणि आंबट रसाचा असून गुणांनी लघु आणि शीत वीर्याचा आहे.
आपटा ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे, याची पाने, खोडावरील साल, शेंगा, फुले, मूळ अशा सर्वांचा व्याधी नाशासाठी उपयोग होतो.
मधुमेह आणि विविध मूत्रविकारासाठी आपटा वापरला जातो, याने मूत्रवाटे पडणारी खर तसेच मुतखड्यासारखे व्याधी बरे होतात(अश्म म्हणजे दगड किंवा खडा- मूत्र मार्गातील खडा फोडणारा तो अश्मंतक.)
जलोदर सारख्या आजारांत आपटा, कुटज व भृंगराज याचा रस सेवन केल्याने पोटाचा घेर कमी येतो.{©लेखक: डॉ कल्याणकर किरण)
वारंवार अतिसार होणे ग्रहणी, प्रवाहिका, आमांश (चिकट आव पडणे) यासारखी लक्षणे असताना याच्या पानाचा रस व मिरेपूड वापरावी. पोटाचा मुरडाही या औषधाने थांबतो.
सोरायसिस, इसब, खरूज, तारुण्यपिटीका अशा त्वचविकारांत आपट्याच्या सालीचा काढा उपयुक्त आहे, याने रक्तशुद्धी सह रक्तवृद्धी सुद्धा होते.
तोंड आले असता, आपट्याचा सालीचा काढा गुळण्या करण्यासाठी वापरावा.
वारंवार होणारे गर्भपात टाळण्यासाठी आयुर्वेदात 10 मासानुमासिक काढे वर्णिले आहेत, यातील द्वितीय मास काढा हा आपटा, तीळ, मंजिष्ठा व शतावरी या औषधांनी तयार केला आहे.दुसऱ्या महिन्यातील गर्भस्त्राव टाळण्यास याचा उपयोग होतो.
विजयादशमी निमित्त ही आपट्याची पाने कशी वाटावीत याचे फार सुंदर वर्णन शास्त्रांत पुढील प्रमाणे केले आहे.
शुचिर्भूत होऊन सकाळी आपट्याच्या झाडाजवळ जावे व पुढील मंत्र म्हणावा.
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या इष्टांचे(मित्र, नातेवाईक ई.) दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर.
नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. ही पाने लहानांनी ज्येष्ठांना द्यावी आणि आशीर्वाद घ्यावे असा संकेत आहे.
दुर्दैवाने आपट्याचा तुटवडा भासत असल्यामुळे सध्या बाजारात आपट्याच्याच कुळातील “कांचनार” नावाच्या वृक्षाची पाने विकली जातात आणि अज्ञानापोटी बरीच मंडळी हि पाने विकत घेतात आणि खूप मोठी मोठी सोन्याची पाने मिळाली म्हणून आनंदात असतात. मात्र वापरात जितकी महत्वाची पाने आहेत तितकीच विकत न घेता अधिक प्रमाणात घेतल्यामुळे कांचनाराच्या पानांची आणि पर्यायाने निसर्गाची हानी होते.दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिराबाहेर, रस्त्यांवर, घराबाहेर आपट्याच्या पानांचा अक्षरश: कचरा होतो.अश्मन्तक-कांचनार सारख्या वनस्पतींची लागवड करुन त्यांचे जतन करणे हीच आताच्या काळातील खरी विजयादशमीची पूजा ठरेल. चला तर मग या वर्षापासून सोने लुटूया वृक्ष रोपणाचे, प्रेमाचे, ज्ञानाचे आणि आरोग्याचे.
उत्तर लिहिले · 18/10/2018
कर्म · 123540
9
🤗 _*चांगल्या गोष्टी शिकवणारा दसरा*_
-------------------------------
👉🏻 अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र आणि त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा'. ह्याच सणाला 'विजयादशमी' असेही म्हणतात.

🍀 दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते...

🙏🏻 दाही दिशांवर मिळालेला विजय म्हणजे दसरा. आजच्या युगात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्वार्थ, अन्याय, हिंसा आणि क्रौर्य या दहा दुर्गुणांवर विजय मिळविण्याचा संकल्प करणे म्हणजे दसरा.

💫 अत्यंत महत्त्वाचा असा कुठलाही उपक्रम सुरू करायलाही दसरा हा उत्तम मुहूर्त मानला जातो. वाहन, गृह किंवा कुठल्याही खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला जातो.

✌🏻 _विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो._

*_🙏जाणून घ्या विजयादशमीचा शुभमुहूर्त आणि महत्त्व!_*
-------------------------------------
_आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. यावर्षी दसरा उद्या १८ तारखेला साजरा करण्यात येणार आहे._

*_🙏दसऱ्याची प्रथा_*
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन,सरस्वती पूजन , अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे.

*_🤔काय आहे दसऱ्याचा अर्थ?_*
दसऱ्याचा अर्थ होतो दशमी म्हणजे दहावी तिथी. ज्योतिषांनुसार, वर्षभरात ३ सर्वात मोठ्या शुभ तिथी असतात. पहिली चैत्र शुक्ल प्रतिपदा, दुसरी कार्तिक शुक्ल प्रतिपदा आणि तिसरी दसरा. असे मानले जाते की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केल्यास लाभ होतो. त्यामुळे या दिवशी अनेकजण नव्या कामांना सुरुवात करतात.

*_🤔कधी आहे शुभमुहूर्त?_*
देशातील काही भागांमध्ये विजयादशमी १८ तारखेला तर काही भागांमध्ये १९ तारखेला साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात आज १८ तारखेलाच दसरा साजरा केला जाणार आहे. दशमीच्या तिथीची सुरुवात १८ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी होणार आहे. ही दशमीची तिथी १९ ऑक्टोबर ५ वाजून ५९ मिनिटांपर्यत असणार आहे.

*_💁‍♂या दिवसाबाबत मान्यता_*

◼दसऱ्याच्या दिवशी भगवान निलकंठांचे दर्शन करणे शुभ मानले जाते.

◼या दिवशी वाहन, इलेक्ट्रिनिक्स वस्तू, सोनं, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणे शुभ मानलं जातं.

◼दसऱ्याच्या दिवशी नवीन कामाला सुरुवात करणं शुभ मानलं जातं.

◼असे मानले जाते की, या दिवशी कोणत्याही कामाला सुरुवात केल्यास त्यात यश मिळतं.

◼रावण दहनानंतर थोडी राख घरात ठेवणेही शुभ मानले जाते.


-------------
*🤕 नऊ दिवसांचे उपवास सोडताय? या गोष्टींची घ्या काळजी!*           -------------------------------------

*१) हलक्या पदार्थांनी करावी सुरुवात*
▪अनेक दिवस पोट रिकामं राहिल्यानंतर सर्वातआधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायला हवं. 
▫लस्सी, नारळ पाणी किंवा मोसंबीच्या ज्यूसचं सेवन करावं म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळेल आणि याने तुमची पचनक्रियाही योग्य होईल.

*२) प्रोटीन आहे गरजेचं*
▪उपवास सोडल्यानंतर प्रोटीन असलेल्या आहाराचं सेवन करावं.  
▫पनीर, मोड आलेले कडधान्य, डाळीचं पाणी सेवन करु शकता.

*३) मसालेदार पदार्थ टाळा*
▪उपवास सोडल्यावर लगेच मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका.

*४) फास्टफूड टाळा*
▪खूप दिवसांनी तुम्ही उपवास सोडला तर जड पदार्थ खाणे टाळा. कारण उपवास करताना मेटाबॉलिज्म स्लो होतं.
▫त्यामुळे एकाएकी जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
उत्तर लिहिले · 18/10/2018
कर्म · 569245
3
“दसरा सण मोठा – नाही आनंदाला तोटा”

नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खंडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा.

“दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा” असं जे म्हटलं जात ते काही उगाच नाही. देवीनं महिषासुराशी युद्ध करून त्याला मारला तोच हा दिवस. प्रभू रामरायांनी रावणाचा वध केला तो हा दिवस. रजपूत काय किंवा मराठे वीर काय ह्यांनी युद्ध मोहिमांना प्रारंभ केला तोच हा दिवस.

दसऱ्याच दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.

दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशीत केली जातात.

ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.

source: marathimati.com

उत्तर लिहिले · 30/9/2017
कर्म · 13530