2 उत्तरे
2
answers
दसर्याचा शुभ मुहूर्त व महत्त्व काय?
9
Answer link
🤗 _*चांगल्या गोष्टी शिकवणारा दसरा*_
-------------------------------
👉🏻 अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र आणि त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा'. ह्याच सणाला 'विजयादशमी' असेही म्हणतात.
🍀 दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते...
🙏🏻 दाही दिशांवर मिळालेला विजय म्हणजे दसरा. आजच्या युगात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्वार्थ, अन्याय, हिंसा आणि क्रौर्य या दहा दुर्गुणांवर विजय मिळविण्याचा संकल्प करणे म्हणजे दसरा.
💫 अत्यंत महत्त्वाचा असा कुठलाही उपक्रम सुरू करायलाही दसरा हा उत्तम मुहूर्त मानला जातो. वाहन, गृह किंवा कुठल्याही खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला जातो.
✌🏻 _विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो._
*_🙏जाणून घ्या विजयादशमीचा शुभमुहूर्त आणि महत्त्व!_*
-------------------------------------
_आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. यावर्षी दसरा उद्या १८ तारखेला साजरा करण्यात येणार आहे._
*_🙏दसऱ्याची प्रथा_*
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन,सरस्वती पूजन , अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे.
*_🤔काय आहे दसऱ्याचा अर्थ?_*
दसऱ्याचा अर्थ होतो दशमी म्हणजे दहावी तिथी. ज्योतिषांनुसार, वर्षभरात ३ सर्वात मोठ्या शुभ तिथी असतात. पहिली चैत्र शुक्ल प्रतिपदा, दुसरी कार्तिक शुक्ल प्रतिपदा आणि तिसरी दसरा. असे मानले जाते की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केल्यास लाभ होतो. त्यामुळे या दिवशी अनेकजण नव्या कामांना सुरुवात करतात.
*_🤔कधी आहे शुभमुहूर्त?_*
देशातील काही भागांमध्ये विजयादशमी १८ तारखेला तर काही भागांमध्ये १९ तारखेला साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात आज १८ तारखेलाच दसरा साजरा केला जाणार आहे. दशमीच्या तिथीची सुरुवात १८ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी होणार आहे. ही दशमीची तिथी १९ ऑक्टोबर ५ वाजून ५९ मिनिटांपर्यत असणार आहे.
*_💁♂या दिवसाबाबत मान्यता_*
◼दसऱ्याच्या दिवशी भगवान निलकंठांचे दर्शन करणे शुभ मानले जाते.
◼या दिवशी वाहन, इलेक्ट्रिनिक्स वस्तू, सोनं, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणे शुभ मानलं जातं.
◼दसऱ्याच्या दिवशी नवीन कामाला सुरुवात करणं शुभ मानलं जातं.
◼असे मानले जाते की, या दिवशी कोणत्याही कामाला सुरुवात केल्यास त्यात यश मिळतं.
◼रावण दहनानंतर थोडी राख घरात ठेवणेही शुभ मानले जाते.
-------------
*🤕 नऊ दिवसांचे उपवास सोडताय? या गोष्टींची घ्या काळजी!* -------------------------------------
*१) हलक्या पदार्थांनी करावी सुरुवात*
▪अनेक दिवस पोट रिकामं राहिल्यानंतर सर्वातआधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायला हवं.
▫लस्सी, नारळ पाणी किंवा मोसंबीच्या ज्यूसचं सेवन करावं म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळेल आणि याने तुमची पचनक्रियाही योग्य होईल.
*२) प्रोटीन आहे गरजेचं*
▪उपवास सोडल्यानंतर प्रोटीन असलेल्या आहाराचं सेवन करावं.
▫पनीर, मोड आलेले कडधान्य, डाळीचं पाणी सेवन करु शकता.
*३) मसालेदार पदार्थ टाळा*
▪उपवास सोडल्यावर लगेच मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका.
*४) फास्टफूड टाळा*
▪खूप दिवसांनी तुम्ही उपवास सोडला तर जड पदार्थ खाणे टाळा. कारण उपवास करताना मेटाबॉलिज्म स्लो होतं.
▫त्यामुळे एकाएकी जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

0
Answer link
दसर्याचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व
दसरा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण नवरात्रीच्या समाप्तीनंतर येतो. दसर्याला विजयादशमी देखील म्हणतात. ह्या दिवशी वाईटावर चांगल्याची आणि असत्यावर सत्याची विजय मिळवल्याचा उत्सव साजरा केला जातो.
शुभ मुहूर्त: दसर्याला विशेष शुभ मुहूर्त असतो. ह्या दिवशी नवीन कामं सुरू करणं, शस्त्र पूजा करणं, आणि वाहनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. 2024 मध्ये दसरा 12 ऑक्टोबर रोजी आहे. ह्या दिवशी दुपारच्या वेळेत (1:57 PM ते 2:42 PM) विजय मुहूर्त आहे, जो शुभ मानला जातो.
दसर्याचे महत्त्व:
- पौराणिक महत्त्व: ह्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. त्यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
- शस्त्र पूजा: दसर्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. पूर्वी राजे आणि सैनिक ह्या दिवशी आपल्या शस्त्रांची पूजा करून युद्धाला सज्ज होत असत.
- नवीन सुरुवात: दसरा हा नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. लोक ह्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा नवीन घरात प्रवेश करतात.
- सामाजिक महत्त्व: दसरा हा सण लोकांना एकत्र आणतो. ह्या दिवशी लोक एकमेकांना भेटतात आणि शुभेच्छा देतात.
दसरा हा सण भारतीय संस्कृतीत खूप महत्वाचा आहे. हा सण आपल्याला चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाईटला भेट देऊ शकता:
(टीप: ह्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, कृपया विश्वसनीय स्त्रोतांकडून पडताळणी करा.)