सण दसरा

विजयादशमी का साजरी केली जाते?

“दसरा सण मोठा – नाही आनंदाला तोटा”

नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खंडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा.

“दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा” असं जे म्हटलं जात ते काही उगाच नाही. देवीनं महिषासुराशी युद्ध करून त्याला मारला तोच हा दिवस. प्रभू रामरायांनी रावणाचा वध केला तो हा दिवस. रजपूत काय किंवा मराठे वीर काय ह्यांनी युद्ध मोहिमांना प्रारंभ केला तोच हा दिवस.

दसऱ्याच दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.

दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशीत केली जातात.

ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.

source: marathimati.com

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

विजयादशमी का साजरी केली जाते?

Related Questions

दसरा सणाविषयी माहिती?
दसरा पूजन कसे करावे?
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा?
दसरा दिवशी खंडेपूजन कधी आणि कसे करतात, आपट्याची पाने कधी आणि कसे पुजतात?
दसर्‍याचा शुभ मुहूर्त व महत्त्व काय?
दसरा का साजरा करतात?
दसर्‍याबद्दल रावण दहन आणि दीक्षाभूमी धम्मचक्र दिनाबद्दल माहिती मिळेल का?