3 उत्तरे
3
answers
नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व काय आहे?
7
Answer link
दरवर्षी नवरात्रीला नऊ वेगवेगळ्या रंगांचे महत्व असते. लोक ज्या त्या दिवशी त्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करतात. मग या वर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग कोणते ? आणि या रंगांचा काय फायदा होतो. खास करून नवरात्रात नऊदिवस नऊ वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील देवीला परिधान केले जातात, अलंकाराने सजवले जाते.आपलं आयुष्य हे खूप रंगानी सजलेले आहे. त्यातील प्रत्येक रंगाचे वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात . १० ऑक्टोबर पासून यावर्षीचे नवरात्र सुरू झाली आहे. तर मग चला, या वर्षीचे नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याची वैशिष्ट्ये वाचू या ._
*_💁♀१० ऑक्टोबर – निळा रंग_*
विश्वासाचं, श्रद्धेचं, सुस्वभावाचं, आत्मीयतेचं प्रतिक म्हणजे निळा रंग. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे म्हणजेच २४ तास प्रगतीकडे वाटचाल करणारा निळा रंग. शांततेचा प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता हि या रंगाची खास वैशिष्टे. मेंदूवर निळ्या रंगाचा चांगला प्रभाव पडत असतो. वाईट स्वप्न आणि विचार यांना निळा रंग काढून टाकत असतो. निळा रंग हा बौद्धिक क्षमता वाढवण्याचे काम करत असतो. समुद्र आणि आकाश यामध्ये निळ्या रंगाची अनुभूती मिळते. वातविकारांच्या लोकांसाठी निळा रंग लाभदायक ठरतो. स्वयंपाक घरात हा रंग वापरणे टाळावे. देवी नारायणीशी संबंधित असा सुस्वभावी निळा रंग आहे.
*_💁♀११ ऑक्टोबर – पिवळा रंग_*
प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो उदारणार्थ – फुल, हळद, देवाची वस्त्र, पूजेच्या वेळी पिवळे पितांबर नेसतात, मुलीच्या लग्नात पहिली साडी हि पिवळीच नेसवतात आणि सूर्यकिरणांशी संबधीत असा हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करणारा पिवळा रंग आहे. म्हणजेच पिवळा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांतेतेसाठी पिवळा रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते. आपल्यामध्ये विश्वास आणि मैत्रीची भावना वाढवण्याचे काम पिवळा रंग करत असतो. तर असा नवरात्रीचे नऊ रंग मधला दुसरा पिवळा रंग.
*_💁♀१२ ऑक्टोबर – हिरवा रंग_*
नवरात्रीचे नऊ रंग मधला तिसरा रंग हिरवा. हिरव्या रंगाची देणगी हि आपल्याला निर्सगाकडूनच मिळालेली आहे. तसेच भारताच्या राष्ट्रीय ध्वजात खालच्या भागात गडद हिरवा रंग आहे. या रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले अतुट नाते दर्शवितो आणि निष्ठा व समृद्धीचा देखील बोध होतो. सौभाग्याचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाची ओळख आहे.
*_💁♀१३ ऑक्टोबर – राखाडी रंग_*
राहू आणि केतू हे नवग्रहांमधील दोन ग्रह आहेत त्यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. तो कमी करण्यासाठी आपल्याला राखाडी रंगाचे रत्न परिधान करावे लागते. स्थिरतेचा, सुरक्षतेचा, कौशल्याचा, शिस्तबद्ध्तेचा असा हा करडा रंग आहे. न्युट्रल रंग म्हणजे राखाडी. या रंगासोबत कोणताही रंग शोभून दिसतो.
*_💁♀१४ ऑक्टोबर – भगवा रंग_*
नवरात्रीचे नऊ रंग मधला पाचवा रंग भगवा. भगव्या या रंगाला केशरी या नावाने देखील ओळखले जाते. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात वरच्या भागात केशरी रंग आहे. त्याग, धैर्य, बुद्धी, पराक्रम हे या रंगाचे प्रतीक आहे. उगवत्या सूर्याच्या रंग, अग्नीच्या ज्वालांचा रंग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा ध्वज भगवा (केशरी) आहे. केशरी रंगाचा देखील ट्रेंड बदल असून याला फेस्टिव्ह कलर म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथात एक भगवा ध्वज होता. ऊर्जेचा, साहसाचा, शक्तीचा रंग म्हणजे केशरी रंग
*_💁♀१५ ऑक्टोबर – पांढरा रंग_*
स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि शांततेचा प्रतीक म्हणून पांढरा रंग ओळखला जातो. पांढरा रंग हा कोमल आणि पारदर्शक असतो. सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र चंद्राला जास्त प्रिय असल्याचे मानले जाते. पांढऱ्या रंगाने डोळ्यांना, मनाला शांत वाटते आणि व्यक्तींच्या स्वभावात सकारात्मक दृष्टीकोनात बदल, मोकळेपणा, इतरांना समजून घेण्याची भावना तयार होते. पांढरे वस्त्र परिधान केलेल्या लोकांना समाजकार्याची आवड असते आणि अशी व्यक्ती संघर्षाकडे न वळता उत्कृष्ट सवांदाकडे वळतात. पांढऱ्या रंगामुळे घर स्वच्छ आणि मोठे वाटते .
*_💁♀१६ ऑक्टोबर – लाल रंग_*
वैज्ञानिकदृष्ट्या लाल रंग शरीराची ऊर्जा प्रभावित करतो. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचा प्रतीक मानला जातो. लाल रंग धोका आणि सावधपणा दर्शविण्यासाठी वापरला जातो कारण लाल रंग हा अतिशय आकर्षक असतो. लाल रंगाचा वापर घरातल्या कोणत्याही शुभ कार्यासाठी प्रथम केला जातो. मग ते कोणाचे कपडे किंवा पूजेची फुले असो. याशिवाय पूजामध्ये देखील लाल रंगांची फळे दिली जातात. लाल रंगा मध्ये खूप ऊब असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाल रंग आत्मविश्वास वाढवतो.
*_💁♀१७ ऑक्टोबर – आकाशी रंग_*
आकाश आणि जलतत्वाचे प्रतीक म्हणजे आकाशी रंग. आकाशी रंगाची लक्षणे हि प्रामाणिक, खरेपणा, विश्वासाची असतात. सात्विकतेचा म्हणून आकाशी रंगाची ओळख आहे.
*_💁♀१८ ऑक्टोबर – गुलाबी रंग_*
नवरात्रीचे नऊ रंग मधला देवीच्या साडीचा आजचा रंग गुलाबी. लाल आणि पांढऱ्या रंगांच्या मिश्रणाने गुलाबी रंग बनतो. सौंदर्य प्रतीक असा गुलाबी रंग आहे. प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, भावनेचा, सृजनतेचा प्रतिकतेचा म्हणजे गुलाबी हा रंग. हा रंग स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी निशाणीसाठी वापरला जातो. प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबी रंगाला महत्त्व आहे.

नवरात्रीत यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग?
यंदा नवरात्री उद्या 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नऊ दिवसांसाठी नऊ रंगांचं वेगळंच महत्त्व असते. चला, तर त्याबाबत अधिक जाणून घेऊयात...
1. पिवळा : प्रतिपदेचा पहिला दिवस असल्याने या दिवसाचा रंग पिवळा असतो.
2. हिरवा : हा रंग निसर्गाचा आणि समृद्धीचाअसल्याचे मानले जाते.
3. राखाडी : सूक्ष्मतेच्या दृष्टिकोनातून हा एक अद्वितीय रंग आहे.
4. नारंगी : हा रंग उन्हाळ्याचे प्रतिनिधित्व करतो.
5. पांढरा : हा रंग शुद्धता आणि निरागसपणाचे प्रतीक आहे.
6. लाल : हा रंग आरोग्य, जीवन, अनंत धैर्य आणि तीव्र उत्कटतेचे प्रतीक आहे.
7. रॉयल ब्लू : हा रंग उत्तम आरोग्य आणि समृद्धी आणतो.
8. गुलाबी : हा रंग सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे.
9. जांभळा : हा रंग स्थिरता एकत्र करतो.
0
Answer link
नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे:
-
पहिला दिवस - नारंगी (Orange):
नारंगी रंग उत्साह आणि आनंदाचे प्रतीक आहे.
-
दुसरा दिवस - पांढरा (White):
पांढरा रंग शांती आणि शुद्धतेचे प्रतीक आहे.
-
तिसरा दिवस - लाल (Red):
लाल रंग ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
-
चौथा दिवस - निळा (Blue):
निळा रंग शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक आहे.
-
पाचवा दिवस - पिवळा (Yellow):
पिवळा रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे.
-
सहावा दिवस - हिरवा (Green):
हिरवा रंग नवीन सुरुवात आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
-
सातवा दिवस - करडा (Grey):
करडा रंग संतुलन आणि तटस्थतेचे प्रतीक आहे.
-
आठवा दिवस - जांभळा (Purple):
जांभळा रंग शक्ती आणि महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे.
-
नववा दिवस - मोरपंखी (Peacock Green):
मोरपंखी रंग सौंदर्य आणि विशिष्टतेचे प्रतीक आहे.
हे रंग केवळ प्रतीकात्मक नाहीत, तर ते आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करतात.