शिक्षण शब्दाचा अर्थ शाळा शैक्षणिक मानसशास्त्र

विद्यार्थ्यांमध्ये पार्शालिटी करणे म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

विद्यार्थ्यांमध्ये पार्शालिटी करणे म्हणजे काय?

3
पारस्लेटी नव्हे इट्स पार्शालिटी(Partiality)..

पार्शालिटी शब्द पार्ट(Part), पार्शीअल(Partial) पासुन घेतला आहेत.

पार्शालिटी म्हणजे भेदभाव.. वेगळं करणे वेगळं समजणे वेगळी वागणूक देणे.

उदाहरणार्थ :

आपल्या वर्गात दोन प्रकारचे विद्यार्थी शिकतात. एक लोकल म्हणजे तिथेच राहणारे आणि उर्वरित अप डाऊन ये जा करणारे. सहाजिक आहे लोकल विद्यार्थ्यांची शिक्षकांनी जास्त ओळख राहील कारण शिक्षकसुद्धा लोकलच त्याच गावात राहणारे.

समजा तुमच्या वर्गाची तोंडीपरीक्षा चालु आहे आणि ते ओळखीचे असल्यामुळे त्यांना सरांनी चांगले मार्क्स दिलेत आणि जे ये जा करतात त्यांना चांगली परिक्षा देऊनसुद्धा कमी मार्क्स दिलेत.

तेव्हा आपण म्हणु "सर अप डाऊन करणाऱ्या विद्यार्थांसोबत पार्शालिटी करतात,भेदभाव करतात"..

ठीक आहे ??
उत्तर लिहिले · 24/9/2018
कर्म · 75305
0

पार्शालिटी (Partiality) म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणे. जेव्हा शिक्षक किंवा संस्था काही विद्यार्थ्यांना इतरांपेक्षा जास्त महत्व देतात, तेव्हा तिथे पार्शालिटी होते.

पार्शालिटी अनेक प्रकारची असू शकते:

  • गुण देताना भेदभाव: काही विद्यार्थ्यांना चांगले गुण देणे, तर काहींना कमी गुण देणे.
  • संधी देताना भेदभाव: काही विद्यार्थ्यांना जास्त संधी देणे, उदाहरणार्थ, कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी फक्त काही ठराविक विद्यार्थ्यांनाच देणे.
  • वर्तणुकीत भेदभाव: काही विद्यार्थ्यांशी चांगले वागणे, तर काहींशी कठोर वागणे.

पार्शालिटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो.

अधिक माहितीसाठी, आपण शैक्षणिक मानसशास्त्रज्ञांकडून (educational psychologist) मार्गदर्शन घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

अध्ययन संक्रमण म्हणजे काय?
अध्ययनाचे मानसशास्त्र म्हणजे काय? अध्ययनावर परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा.
गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती स्पष्ट करा?
वर्ग पातळीवरील पिअरचे कोणकोणते प्रकार आहेत?
विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षक म्हणून आपण कोणती कृती टाळली पाहिजे?
प्रभावी शिक्षणाच्या वर्गीकरणामध्ये, 'काम' कोणत्या स्तरावर येते?
ब्लूमचे प्रभावी वर्गीकरण काय आहे?