3 उत्तरे
3
answers
मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे काय, ते कशासाठी वापरतात?
13
Answer link
📙 *मायक्रोओव्हन* 📙
***********************
मायक्रोओव्हन या अतिलघुतरंगांच्या रेडिओलहरींवर या ओव्हनचे काम चालते. या ओव्हनच्या निर्मितीच्या अाधी काहीही शिजवायचे वा भाजायचे असेल, तर उत्सर्जित ऊर्जा व प्रत्यक्ष उष्णता यांचा वापर केला जात असे. म्हणजेच भांडे तापवून पदार्थ शिजवणे किंवा पदार्थच प्रत्यक्ष विस्तवावर धरणे या सोप्या पद्धतीचा वापर होत होता.
मायक्रोवेव्हची माहिती पूर्वीही होती. पण त्यांची निर्मिती करणे व त्यांचा नियंत्रित उपयोग करणे याबद्दल साशंकता होती. आजही या लहरींचा मानवी शरीरावर कदाचित दुष्परिणाम होऊ शकेल, अशी साशंकता क्वचित काही जण व्यक्त करतातच. पण बऱ्याच प्रयोगांती त्यांचा वापर सुरक्षित आहे, असे नक्की झाल्यावर या लघुतरंग रेडिओलहरींचा वापर आपल्या स्वयंपाकघरात सुरू झाला आहे.
हा ओव्हन दिसायला अगदी आपल्या नेहमीच्या ओव्हनसारखाच दिसतो. चौकोनी बंद पेटी, पुढे काचेचे दार, मध्यभागी पदार्थ ठेवायची जागा व प्लगला जोडायची विजेची वायर हे जरी दिसत असले, तरी सारखेपणा इथेच संपतो. मुख्य म्हणजे या ओव्हनमधील फक्त पदार्थ सोडला, तर कोणताही भाग गरमच होत नाही. शिवाय याचे काम फार फार तर तीन ते सात मिनिटे चालते. याचे महत्त्वाचे कारण यामागचे तत्त्व. प्रत्येक पदार्थामध्ये पाण्याचा अंश असतो. शिजवायचा पदार्थ या ओव्हनमध्ये ठेवला की लघुतरंगलहरींमुळे या पदार्थातील सर्व रेणूंमध्ये स्पंदने निर्माण होतात. या विलक्षण वेगाने होणाऱ्या स्पंदनांमुळे पदार्थात रेणुंतील घर्षणाने उष्णता निर्माण होते व पदार्थातील पाण्याच्या अंशाची वाफ तयार होऊन या वाफेवरच तो पदार्थ झपाट्याने शिजू लागतो. ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्णही होते. प्रक्रिया फार झपाट्याने पूर्ण होत असल्याने या ओव्हनवर आपोआप बंद होणारे नियंत्रक लावलेले असतात. त्यावर लावलेल्या वेळेनुसार ओव्हन आपोआप बंद होतो.
पदार्थ बाहेर काढून पाहिल्यास फक्त पदार्थच गरम झालेला आढळतो. याउलट त्यामानाने च्या ताटलीत व भांड्यात पदार्थ असेल, ती कितीतरी गारज असते. जेमतेम पदार्थाच्या उष्णतेमुळे गरम होईल, एवढीच ती गरम होते. मायक्रोओव्हनचा उपयोग मुख्यत: झटपट अन्न शिजवण्यास होतो; एवढेच नाही, तर अन्नाची चव जास्त चांगली राहते. कमीत कमी तेलाचा वापर करून पदार्थ उत्तम तयार करू होऊ शकतो. उदाहरणार्थ, कटलेट तळण्यासाठी भरपूर तेल लागणार असेल, तर येथे कटलेटला जेमतेम तेलाचा हात लावून ठेवल्यासही ते छान कुरकुरीत व स्वादिष्ट लागते.
मांस, मासे, कोंबडी यांसारखे पदार्थ शिजवण्यासाठी इतर पद्धतीत वेळ जास्त लागतो. याउलट या ओव्हनमध्ये मसाला लावून या गोष्टी मायक्रोओव्हनमध्ये जेमतेम पंधरा मिनिटांत खायला तयार होऊ शकतात. या ओव्हनचा उपयोग ज्याला फास्टफूड म्हणता येईल, त्यासाठी खूप केला जातो. दिसायला, वापरायला, वेळेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी अशी ही वस्तू आहे. स्वयंपाकघरातील सर्वात मोठी प्रगती कोणती, असे विचारले तर मायक्रोओव्हन असे निर्धास्तपणे सांगता येईल.
भारतीय संदर्भात मायक्रोओव्हन मात्र कुठे तरी कमी पडणार आहे. खाण्याच्या सवयी बदलणे हे फारच क्वचित शक्य होते. त्यामुळे भारतीय जेवणातील पोळ्या व भाकरी याला या पर्यायाचा वापर करता येणार नाही. तसेच या प्रकारच्या ओव्हनमध्ये कोणतीही धातूची भांडी वापरता येत नाहीत, तर सिरॅमिकची भांडीच वापरावी लागतात. म्हणजे स्वयंपाकाच्या भांड्यांतही बदल आवश्यक ठरतो. तिसरी बाब म्हणजे पदार्थ फोडणीला टाकणे व मग शिजवणे अशा दोन टप्प्यांमध्ये या ओव्हनचा उपयोग फक्त दुसऱ्या टप्प्यातच होऊ शकतो.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

ओव्हन हा बेकिंगसाठी वापरला जातो. याला झाकण असते. यात तापमान नियंत्रक व टायमर या सुविधा असतात. विजेवर चालणाऱ्या या उपकरणात एक जाळी व दोन ट्रे किंवा सलग दोन/तीन कप्पे असतात. पदार्थ बेक करण्याआधी ओव्हन प्री-हिट करणे गरजेचे असते.
हल्ली बाजारात घरगुती ओव्हनसुद्धा मिळू लागले आहेत. छोटे, स्वस्त व अतिशय आकर्षक असे विविध कंपन्यांचे ओव्हन सहज उपलब्ध होतात.
मायक्रोवेव्ह
मायक्रोवेव्ह हा नवीन उपकरणाचा प्रकार गेल्या काही वर्षांत येऊनही खूपच लोकप्रिय झाला आहे. यात तुम्ही कोणताही पदार्थ फक्त गरमसुद्धा करू शकता, जसेच शिजवूही शकता. अवघ्या एका मिनिटांत पदार्थ गरम होऊ शकतो. विजेवर चालणाऱ्या या उपकरणात फक्त त्यासाठी तयार केलेली भांडीच वापरता येतात. ही भांडी काचेची किंवा विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकची असतात. प्लास्टिकची भांडी वापरताना त्यावर मायक्रोवेव्ह वापरासाठी योग्य असल्याची खूण पाहूनच वापरावीत; अन्यथा ते भांडे वितळण्याची व पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. धातूची भांडी वापरू नयेत. गॅसचा वापर न करता अतिशय कमी वेळात यात पदार्थ करता येतात. मायक्रोवेव्हमध्ये फक्त पोळी, भाकरी हे पदार्थ करता येत नाहीत. बाकी कुठलाही पदार्थ यात होऊ शकतो. विशेषत: भरली वांगी वा भरलेली भोपळी मिरची यांसारखे पदार्थ जे सारखे हलवले तर त्यातील मसाला बाहेर येतो, असे पदार्थ यात चांगले होतात. यात रवा, दाणे चांगले भाजले जातात. तसेच लाडूसाठी बेसन, कणीक, तांदळाचे/मुगाचे पीठ लवकर व सारखे भाजले जाते आणि ढवळून हात भरून येत नाहीत.
चहा/कॉफी/दूध गरम करणे हा मायक्रोवेव्हचा रोज अनेकदा होणारा मोठा उपयोग. तसेच थंडीत वा पावसाळ्यात गरम पाणी प्यावेसे वाटते तेव्हा जेमतेम 30 सेकंदांत पेलाभर पाणी गरम करता येते. तसेच आजारी माणसांना, जंतुसंसर्ग टाळण्यासाठी, काचेची ताटली मायक्रोवेव्हमध्ये गरम करून ती निजर्तुंक करता येते. मायक्रोवेव्हचा एक प्रकार आहे कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह. यात केक चांगला होतो. तसेच मुलांना अतिशय आवडणारा पिझ्झाही उत्तम होतो. (DMNP)

0
Answer link
मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave oven):
मायक्रोवेव्ह ओव्हन हे एक विद्युत उपकरण आहे जे मायक्रोवेव्ह रेडिएशन वापरून अन्न गरम करते किंवा शिजवते. हे ओव्हन अन्नातील पाण्याचे रेणू आणि इतर ध्रुवीय रेणूंस उत्तेजित करते, ज्यामुळे ते कंपन करतात आणि उष्णता निर्माण होते. याच उष्णतेमुळे अन्न लवकर गरम होते.
मायक्रोवेव्ह ओव्हनचे उपयोग:
- अन्न गरम करणे: मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग शिळे अन्न (leftovers) लवकर गरम करण्यासाठी करतात.
- शिजवणे: भाज्या, पास्ता, आणि तत्सम पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये शिजवता येतात.
- डीफ्रॉस्ट करणे: फ्रिजरमधील गोठलेले अन्न मायक्रोवेव्हमध्ये लवकर डीफ्रॉस्ट (thaw) करता येते.
- पॉपकॉर्न बनवणे: मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पॉपकॉर्नचे पॅकेट ठेवून झटपट पॉपकॉर्न बनवता येतात.
- पेये गरम करणे: चहा, कॉफी, दूध मायक्रोवेव्हमध्ये गरम करता येतात.
मायक्रोवेव्ह ओव्हन हे जलद आणि सोपे असल्यामुळे अनेक घरांमध्ये आणि व्यावसायिक ठिकाणी वापरले जाते.
टीप: मायक्रोवेव्हमध्ये धातूची भांडी वापरणे टाळावे, कारण त्यामुळे स्पार्किंग (sparking) होऊ शकते.